फोटो सौजन्य -  BCCI

लॉर्ड्सवर इतिहास!

भारताच्या वाघिणींची ऐतिहासिक कामगिरी

यास्तिका भाटियाने झळकावलं शानदार शतक. लॉर्ड्सवर कसोटी शतक ठोकणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू!

फोटो सौजन्य -  BCCI

यास्तिकाने अवघ्या १४५ चेंडूंत कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकलं. तिच्या या खेळीत १४ खणखणीत चौकार सामील होते.

फोटो सौजन्य -  BCCI

पहिल्या डावात भारताच्या २८५ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव १७० धावांवर आटोपला होता

फोटो सौजन्य -  BCCI

दुसऱ्या डावात स्मृती मानधनाने ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिने यास्तिकासोबत ७३ धावांची भागीदारी रचली

फोटो सौजन्य -  BCCI

आघाडीची फळी स्वस्तात बाद झाल्यानंतर यास्तिकाने दीप्ती शर्मासोबत (१०) ५२ धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव सावरला.

फोटो सौजन्य -  BCCI

मधल्या फळीत रिचा घोषने नाबाद ५० धावांची तुफानी खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या ३०० पार पोहचवली.

फोटो सौजन्य -  BCCI

रिचा घोषला सायली सातघरेने १८ धावांची नाबाद साथ दिली, ज्यामुळे हिंदुस्थानला डाव घोषित करता आला.

फोटो सौजन्य -  BCCI

लॉर्ड्स कसोटीत हिंदुस्थान विजयाच्या उंबरठ्यावर आहे. अशाच क्रीडा जगतातील अपडेट्ससाठी फॉलो करा!

फोटो सौजन्य -  BCCI