सह्याद्रीने महाराष्ट्रावर भरभरून प्रेम करत आला आहे. अनेक डोंगर रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे. सातपुडा पर्वतरांग, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग महाराष्ट्रात पहायला मिळते. सर्व डोंगररांगा विविधतेने नटलेल्या असून प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच डोंगररांगांमध्ये नावाने आजोबा (Ajoba Fort) पण रुपाने कणखर असलेला गड बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये थाट मानेने उभा आहे. बालाघाटच्या डोंगर रांगेत एकीकडे रतनगड आणि दुसरीकडे हरिश्चंद्रगड या दोन गडांच्या मधोमध ‘आजापर्वत’ किंवा आजोबाचा डोंगर आपल्या रांगड्या पहायला मिळतो.
मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे अनेक गडांची माहिती तरुण पिढीला झाली. त्यामुळे दर शनिवार आणि रविवार मोठ्या संख्येने तरूणवर्ग गड किल्ले आणि डोंगर दर्यांमध्ये शांतता शोधण्यासाठी आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी (ठराविक) जात असतो. या भटक्यांसाठी आजोबाचा गड हा एक नवीन पर्याय ठरू शकतो. पण या आजोबा गडाचा नेमका ठावठिकाणा आहे तरी कुठे ? चला तर म जाणून घेऊया सविस्तर.
आजोबा गड आणि इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा स्वराज्यातील कुठल्याही मावळ्याचा आजोबा गडाशी संबंध आल्याची इतिहासात नोंद नाही. त्याच बरोबर आजोबा गड स्वराज्यात होता का नाही याचीही नोंद आढळून आलेली नाही. मात्र, या गडाच्या रोचक नावा संदर्भात एक एक आख्यायिका प्रचलित आहे. या आख्यायिकेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या गडावर वाल्मिकी ऋषींचे वास्तव्य होते. त्या काळात वाल्मिकी ऋषींनी ‘रामायन’ हा ग्रंथ लिहला होता. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभु श्री राम आणि सीता यांची जुळी मुळे लव आणि कुश यांचा जन्म याच गडावर झाला होता. लव कुश हे लहान असताना त्याचे वाल्मिक ऋषींसोबत आजोबा आणि नातवाचे नाते निर्माण झाले होते. तसेच लव कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा या नावाने हाक मारत असतं. त्यामुळे या गडाला आजोबागड असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. वाल्मिकी ऋषींच्या नावामुळे खऱ्या अर्थाने गडाला नाव आजोबा असे पडले. याच वाल्मिकी ऋषींचे मंदिर गडावर आहे. त्याच बरोबर काळभैरवाचे आणि महादेवाची सुद्धा मंदिर गडावर आहे. या मंदिरांव्यतिरिक्त गडावर काही वीरगळी व समाधी शिळा आहेत. याच ठिकाणी भक्तांसाठी भक्त निवास व ध्यान कक्ष उभारण्यात आले आहे.
वाल्मिकी आश्रमाकडे जाण्याचा रस्ता अर्धा पक्का आणि अर्धा मातीचा आहे. त्यामुळे दुचाकी किंवा जीप असेल तर थेट आश्रमापर्यंत गाडी घेऊन जाता येतं. आश्रम पाहून झाल्यानंतर आश्रमाच्या समोरच एक पायऱ्यांची वाट तुमचं लक्ष वेधून घेईल. या पन्नास पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला पाण्याचे टाकं निदर्शणास येईल. या टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वर्षभर पाणी असते. मात्र, हे पाणी पिण्या योग्य आहे का नाही याबाबत खात्री नाही.
आश्रमाच्या मागून एक वाट तुम्हाला खिंडीत घेऊन जाते. ही वाट धबधब्याची वाट म्हणून प्रसिद्ध आहे. आश्रम पासून खिंडीत जाण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागू शकतो. खिंडीत गेल्यानंतर बाजूला एक गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी 15 फुटांचा छोटा रॉक पॅच आहे. या ठिकाणी लोखंडी शिडी बसवण्यात आली आहे. शिडीवरून आपल्याला गुहेत जाता येते. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत लवकुश यांच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. त्याच बरोबर याच ठिकाणी लव कुश यांचा पाळणा लावलेला आहे.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्याच्या प्रामुख्याने तीन वाटा आहेत. पहिल्या दोन वाटा तुम्हाला गडाच्या पायथ्याला असणार्या देहेणे या गावातून गडावर घेऊन जातात. पहिला मार्ग म्हणजे कल्याण-मुरबाड-टोकवडे-देहेणे या मार्गे गडावर जाण्यासाठी साधारण एक ते दोन तास लागू शकातात. कल्याम ते देहेणे हे अंतर साधारण 89 ते 91 किलोमीटरच्या आसपास आहे. तर दुसरा मार्ग म्हणजे रेल्वने तुम्ही येणार असाल तर तुम्हाला आसनगाव रेल्वे स्थानकावर उतरून गडावर येता येईल.
गडावर जेवणाची राहण्याची सोय आहे का
गडाच्या जेवणाची कोणताही सोय नाही. परंतु गडाच्या पायथ्याला असणाऱ्या आश्रमामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. त्याच बरोबर या ठिकाणी बारमाही पाण्याचा झरा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय गडावर होऊ शकते. तरीही गडावर येताना सोबत पिण्याचे पाणी घेऊन यावे. गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची सोय आपली आपणच करावी. पण गडावर कसलाही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच बरोबर गडावर सापांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामुळे पावलापावलावर खबरदारी घ्यावी.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.