About Us
नमस्कार मंडळी, तुमच्या हक्काच्या व्यासपीठावर म्हणजेच आपल्या marathichowkvishesh.com या वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्र म्हणजे संतांच्या वाणीची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची, बाबासाहेब आंबेडकरांच्या धार धार लेखणीची आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी ऐतिहासिक भूमी. या ऐतिहासिक भूमीला सह्याद्रीच्या हिरव्यागार नैसर्गिक शालूने वेढलेले आहे. महाराष्ट्रावर शैक्षणिक असो अथवा नैसर्गिक गोष्टींची मुक्त उधळण झालेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यांमध्ये दडलेला ऐतिहासिक खजिना आणि शिक्षणाचं बाळकडू महाराष्ट्रातील तसेच देशातील नागरिकांना देण्यासाठी हा प्रपंच
मराठी चौक विशेष वेबसाईटची निर्मिती कशासाठी करण्यात आली?
महाराष्ट्राला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. शैक्षणिक क्षेत्र असो अथवा ऐतिहासिक वास्तु, महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. पण महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक गोष्टी आजही प्रकाशझोतामध्ये आलेल्या नाहीत. तसेच त्यांचा पूर्ण आणि योग्य इतिहास नागरिकांना माहित नाही. त्याच इतिहासाची माहिती परिपूर्ण पद्धतीने वाचकांना व्हावी यासाठी मराठी चौक विशेष वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. तसेच इतिहासाच्या जोडीने आधुनिकतेची कस धरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवता यावा यासाठी विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी मराठी चौक विशेष ची निर्मीती करण्यात आली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक खजिना आणि त्याच्या जोडीला शिक्षणाची साथ म्हणजे मराठी चौक विशेष.
परिचय मराठी चौक विशेष मागील चेहर्याचा
आयुष्य सार्थकी लावायला मार्गदर्शक असावा असं जेव्हा वाटलं, तेव्हा आत्मशोधाचा प्रवास “छत्रपती शिवाजी महाराज” या व्यक्तिमत्वापुढे येऊन थांबला. खऱ्या अर्थाने त्यानंतर माझ्यातल्या ‘मी’चे मला दर्शन झाले आणि ‘तो’ मी म्हणजे गणेश सुरेखा मारुती वाडकर. सह्याद्रीच्या कुशीत रमणारा आणि लिखाणाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणारा एक लेखक आणि पत्रकार.