Business Analyst – आपल्या करिअरच्या कक्षा वाढवा, या क्षेत्रात आहे मोठी संधी

तंत्रज्ञानाच्या या जगात टिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या अंगी कौशल्य निर्मीती करणे काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने जग पुढे चालले आहे. त्याच वेगाने विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या कौशल्यांना धारधार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने Business Analyst या अभ्यासक्रमाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जोडीने उज्जवल भविष्य घडविण्याची चांगली संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झाली आहे.

बिझनेस अ‍ॅनिलिस्ट म्हणजे काय? What is business analyst

 

Business Analyst ला मराठीमध्ये व्यवसाय विश्लेषक असे म्हटलं जात. व्यवसाय कोणताही असो मार्गदर्शन, योग्य ज्ञान आणि सहकाऱ्यांशिवाय व्यवसायामध्ये यशस्वी होता येत नाही. यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेल की व्यवसायाचे योग्य विश्लेषण करण्याची महत्वाची जबाबदारी या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीवर असणार आहे. व्यवसायाच्या वृद्धीसाठी शक्य होतील त्या सर्व गोष्टी व्यवसाय विश्लेषक करत असतो. प्रोडक्ट्समध्ये आढळणारी कमतरता, ग्राहकांची आवड, मार्केटमध्ये कोणता ट्रेंड सुरू आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन कंपनीच्या हिताचा निर्णय घेण्याचं काम बिझनेस अॅनिलिस्ट या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला करावे लागते.

या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला प्रामुख्याने कंपनीच्या उज्जवल भविष्यासाठी स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग करावी लागते. त्याचबरोबर कंपनी आयटी बेस असेल तर त्या पद्धतीने नियोजन करून कंपनीच्या हिताच्या गोष्टी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. जसे की टेक्नोलॉजीमध्ये कंपनीच्या पॉलिसीनुसार काय बदल केला पाहिजे या गोष्टीचा सखोल अभ्यास व्यवसाय विश्लेषकाला करावा लागतो. जेणेकरुन कंपनीचे उद्धीष्ट साध्य करणे शक्य होईल. थोडक्यात सांगायचे म्हणजे, कंपनी अथवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची महत्वाची जबाबदारी व्यवसाय विश्लेषकावर असते.

व्यवसाय विश्लेषक कोणती जबाबदारी पार पाडतो?

व्यवसाय विश्लेषक म्हणजे काय, हे तुम्हाला समजले असेल. त्यामुळे त्याच्या जबाबदारी संदर्भात थोडा का होईना तुम्हाला अंदाज आला असलेचं. व्यवसाय विश्लेषकाची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे व्यवसायाच्या हितासाठीच विचार करणे आणि त्या विचारांना कंपनीच्या पॉलिसीनुसार कृतीची जोड देणे. ग्राहकांच्या गरजेनुसार प्रॉडक्ट्स किंवा कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये शक्य असल्यास गरजेचे बदल करणे. या सर्व गोष्टी करताना कंपनीच्या पॉलिसीमुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची सुद्धा काळजी व्यवसाय विश्लेषकाला घ्यावी लागते.

ग्राहकांची आवड, प्रोडक्ट्सची मागणी त्या अनुषंगाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा व्यवसाय विश्लेषकावर असते. त्यासाठी शक्य तो अभ्यासक्रम निर्माण करावा लागला तर तो सुद्धा करावा लागतो. त्याचबरोबर ग्राहकांचा कंपनीच्या प्रोडक्ट संदर्भात काय मत आहे. यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करणे. त्यानुसार ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात शक्य ते बदल करण्यासाठी प्रक्रिया राबवणे. त्याबरोबर व्यवसायाच्या विकासासाठी कस्टमर फ्रेंडली डिझायनिंग करणे या गोष्टी सुद्धा यामध्य समाविष्ट आहेत.

कौशल्य आणि व्यवसाय विश्लेषक | What is business Analyst Skills

व्यवसाय विश्लेषक होण्यासाठी काही महत्त्वाच्या कौशल्यांची आवश्यकता असते. क्षेत्र कोणतेही असो कौशल्य असल्याशिवाय आपल्या कामामध्ये लवचिकता येत नाही. त्यामुळेच व्यवसाय विश्लेषक म्हणून काम करताना काही मूलभूत कौशल्य तुमच्या अंगी असली पाहिजेत.

व्यवसाय विश्लेषक हा टेक्नॉलॉजी फ्रेंडली असला पाहिजे. त्यासाठी त्याला Computer Programming, Big Data Mining, Diagram, Data Crunching आणि Wireframing सारख्या या घटकांची माहिती असावी. या सर्व गोष्टी हाताळताना लॉजिकल विचार करून योग्य निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. फक्त निर्णय घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला सतत नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता तुमच्या अंगी निर्माण करावी लागणार आहे.

Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसाय विश्लेषकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे गरज पडली तर रिस्क घेण्याची तयारी सुद्धा व्यवसाय विश्लेषकाची असली पाहिजे. याव्यतिरिक्त SPSS, SA, Sage And Mathematica या सॉफ्टवेअरची सखोल माहिती त्याला असवी. त्याबरोबर सांख्यिकीय विश्लेषणासाठी R चे ज्ञान आणि प्रोग्रामींगमध्ये Python चे ज्ञान व्यवसाय विश्लेषकाला असले पाहिजे. तसेच MS office Suite, viz. MS Excel, MS Visio, MS World आणि MS PowerPoint या एमएसच्या जगात व्यवसाय विश्लेषकाने प्राविण्य मिळवलेले असावे.

व्यवसाय विश्लेषकाला डेटा व्हिज्यु्अलायझ करता आला पाहिजे. त्यासाठी व्यवसाय इंटेलिजन्स घटकांची माहिती असली पाहिजे. जसे की, Qlik View, Power BI, SAP BI आणि Tableau. याबरोबर व्यवसाय विश्लेषक अवघड डेटाचे विश्लेषण करण्यास सक्षम असला पाहिजे. त्यासाठी त्याच्याकडे SQL आणि यासंबंधित डेला मॅन्युपूलेशन भाषांचे प्रॅक्टीकल ज्ञान असले पाहिजे.

व्यवसाय विश्लेषक कसे व्हावे?  How To Become Business Analyst

व्यवसाय विश्लेषक म्हणजे काय, त्याला कोणत्या पद्धतीचे काम करावे लागते आणि त्याच्यावर काय जबाबदारी असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आता तुमच्या मनात सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, तो म्हणजे व्यवसाय विश्लेषका बद्दल माहिती तर मिळाली, पण व्यवसाय विश्लेषक व्हायचं कसं. तस त्यासाठी इथून पुढे लक्ष देऊन वाचा.

व्यवसाय विश्लेषक होण्यासाठी चार टप्प्यांमध्ये तुम्हाला विविध गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. सर्वात पहिलं म्हणजे सुरुवातीचा टप्पा, या टप्प्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काहीही माहित नसतं. तर या टप्प्यामध्ये तुम्हाला अनुभव घेण्यासाठी संधी मिळेल तिथे इंटर्नशीप करणे, सेमीनार अटेंड करणे, व्हॉलंटर म्हणून भूमिका पार पडावी लागेल. पुस्तकी ज्ञानासोबत तुमची बोलण्याची पद्धत, विचार करण्याची क्षमता आणि समस्येचे निराकरण करण्याचे कौशल्य तुमच्या अंगी निर्माण करावे लागेल. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवले आहे, त्यांच्याशी ओळख करून त्यांच्याकडून सुद्धा मूलभूत गोष्टी शिकाव्या लागतील. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसाय विश्लेषक म्हणून प्रॉपर ट्रेनिंग घेण्यासाठी एखाद्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे.

Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र

या नंतर सुरुवात होते ती कंप्युटरबेस नॉलेजची म्हणजेच व्यवसाय विश्लेषक हा टेक्नॉलॉजी फ्रेंडली असला पाहिजे त्यासाठी काही सॉफ्टवेअर स्किल्स त्याच्या अंगी असले पाहिजेत. जसे की, Component Assembly Model, Prototype Model, Scrum Spiral Model, JAD Model, RAD Model इ. बेसिक नॉलेज शिकण्यासाठी तुम्ही एखाध्या सरकार मान्यताप्राप्त संस्थेमधून BA मध्ये पदवी हाताळून आधुनिक स्किल्स शिकण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

व्यवसाय विश्लेषकाकडे टेक्निकल भाषांचे सखोल ज्ञान असले पाहिजे. त्यासाठी त्याने Scripting Languages, Querying Languages, Spreadsheet, Statistical Language, Programming And Big Data Tools या विषयांमध्ये प्राविण्य किंवा पदवी पूर्ण केलेली असावी. त्याबरोबर Certified Business Analysis Professional (CBAP), Certified Business Analysis Thought Leader (CBATL) आणि Certified Analysis Thought Leads (CBATL) हे कोर्सेसेचे प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असेल, तर एक उत्तम व्यवसाय विश्लेषक म्हणून चांगली संधी भविष्यात निर्माण होऊ शकते.

व्यवसाय विश्लेषक होण्यासाठी शैक्षणिक पात्रता | Business Analyst Qualification

व्यवसाय विश्लेषक होण्यासाठी विविध संस्थांमध्ये शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. असे असले तरी ज्याच्याकडे कौशल्य आणि स्किल्स जास्त आहेत अशा उमेदवारावर जबाबदारी सोपवण्याला कंपन्या प्राधान्य देतात. प्रामुख्याने व्यवसाय विश्लेषक होण्यासाठी संबंधित उमेदवाराने कोणत्याही व्यवसाय प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, वित्त किंवा यांसारख्या संबंधित क्षेत्रांमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदीव पूर्ण केलेली असावी. तर काही कंपन्यांमध्ये व्यवसाय विश्लेषक या पदावर काम करण्यासाठी MBA किंवा संबंधित क्षेत्रामध्ये मास्टर डिग्री करणाऱ्या उमेदावाराला प्राधान्य दिले जाते.

Business Analyst jobs

व्यवसाय विश्लेषक म्हणून सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर कोणत्या पदावर काम करणार याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर सध्या विविध कंपन्यांमध्ये Senior Business Analyst, Project/Business Managers, Business Process Architects आणि Product Head/Owner अनुभवानुसार यासारख्या पदांवर काम करण्याची संधी व्यवसाय विश्लेषकाला मिळू शकते.

What is Business Analyst Salary

क्षेत्र कोणतेही असो पगार हा अनुभवानुसार दिला जातो. तसेच या क्षेत्रामध्ये सुद्धा व्यवसाय विश्लेषकाला 0-3 वर्षांचा अनुभव असेल तर वर्षांला 4 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. ज्या व्यक्तीला 3 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे अशा व्यक्तीला वर्षांला 7 लाख रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तसेच ज्या व्यक्तीला 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल त्याला वर्षाला 16 लाख रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तुमच्याकडे जर अधिक प्रमाणपत्र, कौशल्य आणि मुलाखत या सर्व गोष्टींचा विचार करून पगाराच्या रकमेमध्ये फरक पडू शकतो. म्हणजेच पगार वर्षाला 16 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो.

जगभरातील अव्वल दर्जाच्या कंपन्या व्यवसाय विश्लेषकांना चांगले मानधन देऊन आपल्या कंपनीमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. ज्या कंपन्या टेक्नॉलॉजी बेस आहेत जसे की, Amazon, Google, IBM, Salesforce, Microsoft या कंपन्या व्यवसाय विश्लेषकांच्या शोधात असतात. तसेच कंन्सल्टींग फर्म्स जसे की, Deloitte, Accenture, PwC, EY, KPMG, Cognizant, HCL, Oracle, Gartner या कंपन्या सुद्धा व्यवसाय विश्लेषकांच्या शोधत असतात. याव्यतिरिक्त Financial Institutions, Healthcare Organizations, Retail Companies, Government And Non-Profits NGOs, Manufacturing and consumer Goods, Startup And Tech Firms, Telecommunications या क्षेत्रातील कंपन्या सुद्धा व्यवसाय विश्लेषकांच्या शोधात असतात.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment