Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र

जगाच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञान पोहोचले आहे. लहाणांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सर्वांच्याच आयुष्यामध्ये डीजिटल माध्यमांनी विशेष जागा घेतली आहे. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वाढत आहे. त्याच पद्धतीने त्या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणाऱ्यांची संख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. 2013 मध्ये मोठ्या प्रमाणावर Yahoo वरील डेटा लीक झाल्यामुळे अब्जावधी वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला होता. तसेच 2017 मध्ये WannaCry Ransomware च्या हल्ल्याने 150 हून अधिक देशांतील संगणकांवर विपरीत परिणाम झाला. या घटानांमुळे लाखो डॉलर्सचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे Ethical Hacking ची काळी बाजू जगासमोर आली. या घटनांना आळा घालण्यासाठी Ethical Hacking चा पर्याय पूढे आला.

भविष्यातील संभाव्य धोके पाहता सर्वच कंपन्यांनी Ethical hackers च्या नियुक्तीला प्राधान्य द्यायला सुरूवात केली आहे. Google आणि Facebook सारख्या मोठ्या कंपन्या Ethical Hackers ची नियुक्ती करत आहेत. या हॅकर्सला White Hat Hackers असे सुद्दा म्हंटले जाते.

What Is Ethical Hacking

संगणक हल्लेखोरांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळेच एथिकल हॅकर्सची मागणी वाढत आहे. एथिकल हॅकर्स म्हणजे काय तर Computer मध्ये साठवून ठेवलेली माहिती परवानगीने अथवा नैतिकतेने आपल्या संगणकावर पाहणे किंवा त्यात योग्य ते बदल करणे यालाच एथिकल हँकिंग म्हणतात. थोडक्यात काय तर संगणकांवर होणारे हल्ले रोखणे. सायबर गुन्ह्यांतर्गत हॅकिंग हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळेच एथिकल हॅकिंगला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Why Ethical hacking Is Important

एथिकल हॅकिंग ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे त्याला कायद्याने मान्यता दिली आहे. त्यामुळे त्याची आवश्यकता किती आहे याचा एक अंदाज तुम्हाला आला असेल. हॅकिंग करणारे स्वत:च्या फायद्याकरिता वापरकर्त्यांची महत्वीच माहिती वापरतात. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकासान होत आहे. याच गोष्टींना आळा घालण्यासाठी, संगणकावरिल धोक्यांना आणि त्यांच्या कमकुवततेचे निराकरण करून संगणकाचे जाळे यांची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी एथिकल हॅकिंग गरजेची आहे.

एथिकल हॅकिर हा अनेक तंत्रज्ञान आधारित गोष्टींचा वापर करून माहिती मिळवत असतो. त्यामुळे संगणक-हल्लेखोर हल्ला करत असेल तर तर त्याला शोधण्यासाठी मदत होते. हल्लेखोराचा शोध लागल्यामुळे हॅकिंग होण्यापासून सुटका होते. हॅकिंग होऊ नये म्हणून संगणक-प्रणाली अथवा जाळे यांची सुरक्षितता जास्त महत्वाची असते. यासाठी Hardware Locks देण्यात येतात. त्यामुळे आपली माहिती सुरक्षित राहण्यास मदत होते. या सर्व गोष्टींमुळे एथिकल हॅकिंग महत्वाचे आहे.

भविष्यात एथिकल हॅकर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण हे एक वैविध्यपूर्ण क्षेत्र असून यामध्ये वित्त, सरकार आणि तंत्रज्ञान तसेच आरोग्यसेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी असते. Bureau Of Labor Statistics च्या सर्व्हेनुसार 2030 पर्यंत 30 ते 32 टक्यांच्या अपेक्षित वाढीसह जॉब मार्केटमध्ये एथिकल हॅकर्सची मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. तसेच एका सर्वेक्षणानुसार सायबर सुरक्षेची कौशल्य असणाऱ्या व्यक्तीच्या पगारामध्ये 16 टक्के पर्यंत घसघशीत वाढ होऊ शकते.

Ethical Hacking Course कोणी केला पाहिजे?

ज्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सानिध्यात रहायला आवडतं अशा विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंगचा अभ्यासक्रम नक्की केला पाहिजे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारे व्यावसायिक ज्यांना त्यांच्या कौशल्यामध्ये भर घालायची आहे अशा व्यक्तींना सुद्धा एथिकल हॅकिंगचा कोर्स केला पाहिजे. त्याचबरोबर आयटीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ज्यांना करिअरच्या संधी वाढवायच्या आहेत. त्यांनी कौशल्य निर्मीतीसाठी नक्कीच एथिकल हॅकिंगचा कोर्स करण्याचा विचार केला पाहिजे.

Types Of Ethical Hacking

एथिकल हॅकिंगची मुलभूत माहिती तुम्हाला समजली असेल. आता एथिकल हॅकिंगचे प्रकार कोणते हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर एथिकल हॅकिंगचे एकून सहा प्रकार आहेत.

1) Black Box Testing

ब्लॅक बॉक्स टेस्टिंग ही एथिकल हॅकिंगमध्ये सर्वात प्रभावशाली उदाहारणांपैकी एक मानले जाते.

2) White-Box Testing

मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये व्यावयास कशापद्धतीने चालला आहे याची चाचपणी करण्यासाठी आणि हॅकर्सपासून सिस्टीम सुरक्षित ठेवण्यासाठी व्हाईट बॉक्स हॅकिंग महत्वाची भुमिका पार पाडते. त्यासाठीच एथिकल हॅकर्स हे आयटी डिपार्टमेंट सोबत काम करतात. विविध कोडची तपासणी, स्टेटमेंट कव्हर करणे आणि डेटा-फ्लोचे विश्लेषण ही काही व्हाईट-बॉक्स टेस्टींगची उदाहरणे आहेत.

ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट-बॉक्स टेस्टिंग यांच्या व्यतिरिक्त ग्रे-बॉक्स टेस्टिंग, Web Application Hacking, Hacking Wireless networks आणि Web Server Hacking हे अन्य एथिकल हॅकिंगचे प्रकार आहेत.

Eligibility For Ethical Hacking Course

एथिकल हॅकिंग म्हणजे काय याचा अंदाज आता तुम्हाला आला असेल. मात्र एथिकल हॅकर होण्यासाठी पात्रता कोणत्या आहेत. याची माहिती सुद्धा असणे गरजेचे आहे. एथिकल हॅकर होण्यासाठी Information Technology किंवा Computer Science मध्ये बॅचलर डिग्री जसे की BSc, BTech, BE आणि BCA चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. त्याचप्रमाणे जर काही विद्यार्थ्यांनी नेटवर्क सुरक्षा किंवा त्याच सारख्या संबंधित तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा पूर्ण केला असेल तर, असे विद्यार्थी व्यावसायिक करिअर म्हणून एथिकल हॅकिंगची उज्वल भविष्यासाठी निवड करू शकतात.

https://marathichowkvishesh.com/mercaht-navy-qualification-admission-courses-eligibilitty-sallary-what-is-merchant-navy-information-in-marathi/

पदवीपुर्व आणि पदवी नंतर अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थी एथिकल हॅकिंगचा अभ्यासक्रम निवडू शकतात.

Eligibility Criteria for UG Courses Ethical Hacking: पदवीपुर्व एथिकल हॅकिंग कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. भारतातली बऱ्याच महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

Eligibility Criteria for PG Courses Ethical Hacking: पदवी पुर्ण केल्यानंतर एथिकल हॅकिंग कोर्सला प्रवेश घेण्यासाठी. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामध्ये पदवी उत्तीर्ण केलेली असावी. भारतातली बऱ्याच महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

Top Online Ethical Hacking Courses

कमी कालावधीमध्ये एथिकल हॅकिंग शिकण्यासाठी पुढील कोर्स हे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणारे आहेत.

1) Hacking in practice – Certified Ethical Hacking MEGA Course : कालावधी 2 तास
2) Complete Ethical Hacking Bootcamp – Zerot To Mastery : कालावधी 27 तास
3) The Complete Nmap Ethical Hacking Course – Network Security : कालावधी 5 तास
4) Certified Ethical Hacker Certification – कालावधी 40 तास
5) Certified Security Professional – कालावधी 12 आठवडे
6) Ethical Hacking Essentials (EHE) – कालावधी 15 तास
7) CEH V11 Certification Training – कालावधी 40 आठवडे
8) Cyber Forensics – कालावधी 1 तास
9) Metaxone Certified Ethical Hacker – कालावधी 2 महिने

Leave a comment