डिजिटल मार्केटिंग / Digital Marketing Information in Marathi

जगाच्या कानाकोपऱ्यात बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) वेगाने कोणते क्षेत्र पुढे जात आहे? असा प्रश्न कोणी विचारला तर, त्याचे उत्तर एकच असेल ते म्हणजे तंत्रज्ञान (Technology). तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील घडामोडींवर लक्ष ठेवता येते आणि त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये लवचीकता पहायला मिळत आहे. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing Information in Marathi) या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही उत्पादनाची स्मार्ट मार्केटींग करण्यास मदत होतं असल्याचे सिद्ध झाले आहे. आजच्या जगात सर्व काही ऑनलाईन (Online) झाले आहे. इंटरनेटच्या मदतीने तंत्रज्ञान हाताळणे सोपे झाले आहे. लहाणांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल पहायला मिळत आहेत.4जी आणि 5जी इंटरनेच्या मदतीने घरबसल्या जगातील घडामोडी, तंत्रज्ञानातील प्रगती, ऑनलाईन शॉपिंग, तिकीट बुकिंग, सर्व प्रकारचे रिचार्ज, ऑनलाईन खरेदी विक्री इ. करणे सहज आणि सोप्पे झाले आहे. म्हणजेच सर्व काही डिजिटल झाले आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यवसायीक सुद्धा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा अवलंब मोठ्या प्रमाणात करत आहेत.

इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व गोष्टी एका क्लिकवर आपल्याला हव्या त्या ठिकाणी मिळत आहेत. गेल्या काही वर्षांमधील बाजारातील आकडेवारी पाहिली तर जवळपास 70 ते 80 टक्के खरेदीदार उत्पादन, एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापुर्वी ऑनलाईन माहिती काढतात आणि त्यानंतरच ती सेवा किंवा वस्तू खरेदी करतात. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग सर्वच कंपन्यांसाठी किंवा व्यवसायांसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.

डिजिटल मार्केटिंग विषयी तुरळक माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करतो. आता डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय याची सविस्तर माहिती आपण घेऊ.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय / What Is Digital Marketing In Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम इसवी सन 2000 पुर्वी आणि इसवी सन 2000 नंतर जगभरातील नागरिक आपला माल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करत होते ते माहित असणं गरेजचं आहे. डिजिटल मार्केटिंग हि संज्ञा 2002 साला नंतर अधिक लोकप्रिय झाली आहे. त्याअगोदर व्यावयायीक आपली उत्पादने किंवा माल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी पोस्टर, टेम्प्लेट, जाहिराती, वर्तमानपत्र अशा विविध पद्धतींचा अवलंब करुन मालाची विक्री करत असतं. पण या जाहिरातींना मर्यादा असल्यामुळे त्या फार ग्राहकांना आकर्षीत करु शकत नव्हत्या. त्यामुळे 2002 सालानंतर जाहिरातींच्या पद्धतींमध्ये अमूलाग्र बदल झालेला पहायला मिळाला. मोबाईलचा वापर वाढला आणि मोबाईलमुळे इंटरनेट,सोशल मिडीया,विविध अॅप्स इत्यादी विकसीत झाल्यामुळे जाहिराती करणे अधिक सोपो आणि सहज झाले. इंटरनेट आणि सोशल मिडीयामुळे व्यावसायीक हव्या त्या पद्धतीने जाहिराती नागरिकांपर्यंत पोहचवतं आहेत. अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात आधूनिक पद्धतीने जाहिराती बनवने सहज आणि सोप्पे झाले आहे. डिजीटल मार्केंटींगचा थोडक्यात अर्थ काय तर आपल्या उत्पादनाची जाहिरात आपल्या मोबाईल आणि संकणकासारख्या डिजिटल उपकरणांद्वारे जागतिक सत्तरावर करणे.

डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता का आहे / Why is Digital Marketing Necessary

तंत्रज्ञानामध्ये कशापद्धतीने बदल होतं गेला याची थोडक्यात माहिती तुम्हाला समजली असेल. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग एकमेकांशी जोडलं गेलं आहे. एकमेकांना भेटायला लोकांना वेळ नाही पण सोशल मीडियाच्या माध्यममातून तासंतास बोलायला आणि मनोरंजनपर गोष्टी पहायला वेळ आहे. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर डिजिटल मार्केटिंगने सु्द्धा आपले स्थान या आधुनिक युगात निर्माण केले आहे. घरबसल्या आपल्याला पाहिजे ती वस्तू आपण मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने मागवू शकतो. डिजिटल मार्केटिंगमुळे व्यावसायीक डिजिटल जाहिराती करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे ग्राहकाला सुद्धा घरबसल्या आपल्याला पाहिजे त्या वस्तूची हवी ती माहिती मोबाईलवर पाहता येते. व्यावसायीक सुद्धा ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग करण्यावर अधिक भर देत आहेत. कारण डिजिटल मार्केटिंगमुळे एकाच उत्पादनाचे किंवा वस्तूचे अनेक प्रकार कमी वेळात ग्राहकांना दाखवता येतात त्यामुळे ग्राहकाचा वेळ वाचतो. ग्राहकाला बाजारात जाण्याची गरजं पडत नाही. तसेच व्यापारी सुद्धा कमी वेळात अधिक लोकांशी जोडला जातो आणि त्याच्या उत्पादनाची योग्यता ग्राहकांपर्यंत पोहोचते.

4जी आणि 5जी च्या या जगात प्रत्येकजणं गुगल, फेसबुक, युट्यूब आणि इंन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया माध्यमांसहित अनेक सोशल मीडिया माध्यामांचा वापर करत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक फ्लॅटफॉर्म तयार झाला आहे. त्यामुळे वृत्तपत्रे,पोस्टर्स इ. अशा पद्धतींच्या जाहीरातींची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार कोणते आहेत / Types Of Digital Marketing Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे तुम्हाला आता समजले असेल. डिजिटल मार्केटिंगची विविध प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्या विविध प्रकारांच्या सहाय्याने डिजिटल मार्केटिंग बद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.डिजिटल मार्केटिंगची आठ प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सोशल मिडीया, एसइओ, इमेल मार्केटींग, युट्यूब, एफिलिएट मार्केटिंग, पीपीसी मार्केटींग आणि अॅप्स मार्केटिंग.

1) सोशल मीडिया / Social Media Marketing Marathi (SMM)

जन्माला आलेल्या मुलाचे आधार कार्ड काढाण्याच्या आगोदर त्याचे सोशल मीडियावर अकाउंट काढले जाते. त्यामुळे सोशल मीडियाचे आणि लोकांचे नाते घट्ट झाल्याची प्रचिती तुम्हाला सर्वांना आली असेल. जवळपास 2 अब्जापेक्षा अधिक लोकं जगभरात सोशल मीडिया वापरतात. त्यामुले व्यापारी सुद्धा सोशल मीडिया मार्केटींगची मोठ्या प्रमाणात मदत घेतात. सोशल मीडिया मार्केटींग म्हणजे तुमचा ब्रॅंड तयार करण्यासाठी, विक्री वाढवण्यासाठी, आपल्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणे म्हणजेच सोशल मीडिया मार्केटींग.

इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, प्रिंटरेस्ट, यूट्यूब आणि स्नॅपचॅट हे प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवरील प्रोफाईल तयार करुन ग्राहकांना आकर्षीत करणारी सामग्री प्रकाशीत करणे, फॉलोवर्स वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच त्यांना गुंतवून ठेवणे आणि आपले उत्पादन खरेदी करण्यासाठी उत्तेजीत करणे या गाष्टी सोशल मीडिया मार्केटींगच्या सहय्याने केल्या जातात. थोडक्यात सोशल मीडियाच्या मदतीने आपला व्यवसाय राज्यातील, देशातील किंवा जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच सोशल मीडिया मार्केटीग. त्यासाठी ब्लॉग पोस्ट, क्रिएटीव्ह इमेज, व्हिडिओ इत्यादींच्या सहाय्याने मार्केटिंग केली जाते.

2) एसईओ मार्कोटींग / What Is SEO In Digital Marketing

SEOचे संक्षिप्त स्वरुप म्हणजे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (Search Engine Optimization) आणि SEO Marketing डिजिटल मार्केटिंगचा एक महत्वपूर्ण प्रकार आहे. SEO म्हणजे विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरुन वेबसाईट किंवा ब्लॉगला सर्च इंजिनमध्ये रँक करण्यासाठी ज्या प्रक्रीयेचा वापर केला जातो ती प्रक्रिया म्हणजे SEO. एक प्रकारे SEO (एसईओ) हा ऑनलाईन व्यवसाय करु इच्छिनाऱ्या सर्वांना मदत करणारा मित्र आहे अस म्हणावं लागेल. कारण SEO (एसईओ)च्या मदतीने आपण आपल्या बेवसाईटला सर्च इंजिनमध्ये रँक करु शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाचक किंवा ग्राहक आपल्या वेबसाईटशी जोडले जातातं. एखाद्या उत्पादनाची माहिती काढणे, रेस्टॉरंट शोधणे किंवा सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्यासाठी एखादं ठिकाण शोधणे या सर्व गोष्टींसाठी आपल्याला माहितीची आवश्यकता असते. अशावेळी सर्च इंजिनची मदत घेतली जाते आणि SEOच्या मदतीने आपल्याला ज्या गोष्टीची माहिती हवी आहे ती माहिती काही सेकंदांमध्ये मिळते.

एसईओ/SEO मध्ये सामान्यत: पुढील गोष्टींचा समावेश असतो.

आपल्याला जो ब्लॉग किंवा उत्पादन वाचकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर महत्वाचे शब्द (Keyword) माहिती असणे गरजेचे आहे. जो किवर्ड जास्तीत जास्त सर्च केला जातो तो शब्द आपल्या वेबसाईटमध्ये असला पाहिजे. SEOसाठी किवर्ड रिसर्च खूप महत्वाचे आहे.
याव्यतीरिक्त Content Creation And Optimization, Technical Optimization आणि Link Building या घटकांचा समावेश SEOमध्ये केला जातो.
थोडक्यात आपला ब्लॉग किंवा उत्पादन आपल्या वाचकांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसईओ/SEO महत्वाचं आहे.

3) इमेल मार्केटिंग / Email Marketing / What Is Email Marketing

इमेल मार्केटिंग / Email Marketing हा एक लोकप्रीय आणि शक्तिशाली मार्केटिंगचा प्रकार आहे. आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत डिजिटल मार्केटिंग तसेच डायरेक्ट मार्केटिंगच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी इमेल मार्केटिंग महत्वपूर्ण भुमिका पार पाडते. उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी तसेच ग्राहकांशी चांगले नातेसंबंध निर्माण करण्यासाठी इमेल मार्केटिंगचा चागल्या पद्धतीने वापर होतो. ग्राहकांना आपल्या उत्पादनाच्या भोवती गुंतवून ठेवण्याचे महत्वपूर्ण काम इमेल मार्केटिंगच्या माध्यमातून केले जाते.

इमेल हे एक पावरफूल मार्केटिंग टुल आहे. जेव्हा व्यवसायासंबंधी इमेल आपण ग्राहकांना पाठवतो तेव्हा तो मेल त्यांच्या इनबॉक्समध्ये जातो. जोपर्यंत तो इमेल ग्राहक वाचत नाही तोपर्यंत तो इमेल डिलीट होत नाही. त्यामुळे एकप्रकारे आपण पाठवलेल्या उत्पादनाची जाहिरात ग्राहकापर्यंत पोहोचतेच. इमेल मार्केटिंगमुळे ग्राहकांशी आपले एक नाते तयार होते. त्यामुळे आपल्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या आपोआप वाढते. वेबसाईटला जेवढे जास्त ग्राहक भेट देणार तेवढ्या ग्राहकांना आपल्या उत्पादनाची माहिती मिळणार. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगमध्ये इमेल मार्केटिंग एक महत्वाची भूमिका पार पाडते.

4) युट्यूब मार्केटिंग / YouTube Marketing / What Is YouTube Marketing And How Does It Work

डिजिटल मार्केटिंगमध्ये युट्यूब मार्केटिंग (YouTube Marketing) हा मार्किटिंगच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. उत्पादने,सेवा किंवा विविध ब्रँडचा प्रचार करण्यासाठी तसेच जाहिरात करण्यासाठी लागणारे एक व्यासपीठ म्हणजे YouTube होय. युट्यूबच्या माध्यामतून आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सोपी होऊन जाते. यामध्ये YouTubeवर लोकांना आवेडल तसेच आपल्या उत्पादनाची जाहिरात होईन अशा पद्धतीचे उच्च गुणवत्तेचे आणि आकर्षक व्हिडिओ कंटेंट तयार करणे समाविष्ट आहे.

नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपली वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी YouTubeवर जाहिरातींचा वापर फायदेशीर ठरतो. तसेच किवर्ड्स सुद्धा यासर्व घटकांमध्ये महत्वाची भुमीका पार पाडतात. तसेच SEO हा घटक युट्यूब मार्केटिंगमध्ये महत्वाची भुमिका पार पाडतो.

5) एफिलिएट मार्केटिंग / Affiliate Marketing / What IS Affiliate Marketing

डिजिटल मार्केटिंगचे काही प्रकार पाहिल्यानंतर एफिलिएट मार्केटिंग हा सुद्धा त्यातीलचं एक महत्वाचा प्रकार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या उत्पादनचा किंवा कंपनीच्या सेवेचा प्रचार करता आणि प्रचार करण्यासाठी Affiliate Link तयार केली जाते. तुमच्या Affiliate Link द्वारे जर कोणी खरेदी केली तर तुम्हाला कमिशन दिले जाते. कमीशनची रक्कम वेगवेगळी असू शकते. उदाहरण द्यायचे झाले तर, एक सामान्य विक्रेता हा फक्त एकाच कंपनीची उत्पादने विकत असतो. पण एक Affiliate Marketer म्हणून विचार केला तर, तुम्ही विविध कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांकडून कमिशन मिळते. भारतातील एफिलिएट मार्केटर्स (Affiliate Marketing) साधारणपणे महिन्याला 15 ते 19 हजार रुपये कमवतात. तुमच्या Affiliate link द्वारे किती ग्राहक उत्पादन खरेदी करतात यावर तुम्हाला मिळणारे उत्पादन अवलंबून आहे.

6) पीपीसी मार्केटिंग / Pay Per Click / What is PPC Marketing

डिजिटल मार्केटिंगमध्ये पीपीसी मार्केटिंग म्हणजेत पे-पर-क्लिक हा मार्केटिंगचाच एक प्रकार आहे. पे-पर-क्लिक नुसार आपल्या वेबसाईटवर जी जाहिरात आपल्या ग्राहकांना किंवा वाचकांना दिसते. त्या जाहिरातीवर प्रत्यक्षात क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जाहिरातीसाठी पैसे जाहिरातदार देतात. जेवढे जास्त क्लिक तेवढे जास्त पैसे या तत्वावर पीपीसी मार्केटींग चालते. प्रत्येक जाहिरातीमधून मिळणाऱ्या पैशांची रक्कम वेगवेगळी असू शकते. तसेत किवर्ड्स सुद्धा पीपीसी मार्केटींगमध्ये महत्वाची भुमिका पार पाडतात.

आपल्या वेबसाईटला ऑर्गैनिकरित्या भेट देणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी किवर्ड हे महत्वाचे असतात. त्यामुळे पीपीसी मार्केटींगमधून जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी योग्य आणि जास्त पे करणारे किवर्ड शोधणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण जेवढे जास्त आपले किवर्ड सर्च होणार तेवढे जास्त आपल्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढणार. याचा फायदा म्हणजे आपल्या वेबसाईटवर जाहिरातींची संख्या वाढते. त्यामुळे अधिक नफा मिळवण्याची संधी सुद्धा निर्माण होते.

Google Advertise हे सर्वात जास्त वापरले जाणारे PPC Advertise Network आहे. यासाठी योग्य किवर्ड निवडणे महत्वाचे आहे. Google Advertise वापरल्याने सर्वाधिक इंप्रेशन मिळते, म्हणून गुगल जाहिरातींद्वारे PPC मार्केटिंगचे योग्य नियोजन करता यायाल हवे. त्यासाठी लोकप्रीय आणि जास्तीत जास्त सर्च होणारे किवर्ड शोधणे गरजेचे आहे. उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी, वेबसाईटला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यामाध्यमातून विक्री वाढवण्याचे पीपीसी मार्केटींग / PPC Marketing हे एक प्रभावी डिडिटल मार्केटिंग तंत्र आहे.

7) अॅप्स मार्कटिंग / What Is Apps Marketing Marathi

आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे इंटरनेट तसेच विविध अॅप्स वापणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. या सर्व गोष्टींमध्ये अॅप्स मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंगमध्ये महत्वाची भुमिका पार पाडत आहे. मोठमोठ्या कंपन्या त्यांचे स्वत:चे अॅप्स बनवून लोकांपर्यंत पोहचवत आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून त्यावर आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे याला अॅप्स मार्केटिंग असे म्हंटले जाते.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणत्या महत्वपूर्ण घटकांचा समावेश केला जातो याची माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डिजिटल मार्केटिंगची माहिती तर मिळाली, पण आता याचा कोर्स कसा करायचा? तर काळजी करू नका. पुढे त्याबद्दल सविस्तर लिहण्यातं आले आहे.

डिजिटल मार्केटिंग कोर्स / Google Digital Marketing Course / Offline Digital Marketing Course / Online Digital marketing Course Marathi

डिजिटल मार्केटिंग कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणचे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन. दोन्ही प्रकारे तुमच्या सोईनुसार तुम्ही कोर्स करू शकता.

1) Google Digital Marketing Course Marathi

गुगलच्या माध्यामातून सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण संधी गुगलने निर्माण केली आहे. Google Digital Marketing Course हा गुगल कंपनीद्वारे सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑफर केलेला कोर्स आहे. विशेष म्हणजे हा कोर्स विनामुल्य (Free) आहे. या कोर्ससाठी कोणत्याही पद्धतीचे मुल्य आकारले जात नाही. ज्यांना डिजिटल मार्केटिंगचा डि सुद्धा माहित नाही. अशा नवीन विद्यार्थ्यांनी हा कोर्स आवर्जून केला पाहिजे.

या कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण कोर्स ऑनलाईन आहे. त्यामुळे घरबसल्या तुम्ही डिजिटल मार्केटिंगची संपूर्म माहिती मिळवू शकता. या अभ्यासक्रमामध्ये 26 विषयांचा समावेश आहे. Google प्रशिक्षकांनी हा कोर्स तयार केलेला आहे. ऑनलाईन व्हिडीओच्या माध्यमातून लेक्चर घेतले जातात. संपूर्ण कोर्स हा 40 तासांचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या सोईप्रमाणे आपण व्हिडिओ पाहू शकतो. एक व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता.

कोर्स विनामुल्य असल्यामुळे तुम्हाला कोर्ससाठी फक्त नोंदणी करावी लागते. यासाठी इमेल आयडी किंवा गुगल अकाउंट असणे आवश्यक आहे. व्हिडिओ लेक्चर पूर्ण झाल्यानंतर एक परिक्षा गुगलच्या माध्यमातून घेतली जाते. ती परिक्षा पास झाल्यानंतर गुगलकडून प्रमाणपत्र दिले जाते.

2) Offline / Online Digital Marketing Course Marathi

भारताचा विचार केला तर संपूर्ण भारताता ऑफलाईन तसेच ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगचे क्लासेस घेणाऱ्या मोठमोठ्या संस्था कार्यरत आहेत. सविस्तर डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान घेण्यासाठी या संस्था विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरत आहेत. तसेच बऱ्याच संस्थांच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंगचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नामांकीत कंपन्यांमध्ये प्लेसमेंट सुद्धा दिल्या जातात. त्यामुळे प्रशिक्षण ते थेट नोकरी या तत्वावर बऱ्याच संस्था काम करत आहेत. गुगल या सर्च इंजिनवर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला तुम्ही राहत असणाऱ्या भागातील नामांकीत संस्थांची माहिती मिळून जाईल.

मुंबईमधील काही नामांकीत डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार्या संस्था

डिजिटल स्कॅलर, फ्रीलांसर्स अकादमी, डिजिटल मार्केटिंग शाळा, ऑप्ट्रॉन तंत्रज्ञान, लिप्स इंडिया, ऑपरेटिंग मीडिया, टीबीएस डिजिटल मार्केटिंग संस्था, DMTI

टीप – प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची जाहीरात करणे किंवा तुम्हाला फसवणे हा आमचा हेतू नाही. या सर्व संस्थांची योग्य माहिती जाणकारांकडून घ्या आणि त्यानंतर पुढील निर्णय घ्या. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी प्रशिक्षण संस्था जॉईन करण्यापुर्वी जाणकारांची मदत नक्कीच घ्या तसेच गुगल रिव्यूव पहा, प्रत्यक्ष संस्थेला भेट द्या, त्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा. सर्व माहिती काढल्यानंतरच फी भरा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कंमेंटमध्ये नक्की सांगा किंवा काही बदल सुचवायचा असेल तरीही कंमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्वाचं माहिती शेअर करायला विसरू नका.