Raw Agent – ‘रॉ’ एजंट कसं बनायचं? जाणून घ्या सविस्तर…

जगभरातील सर्व देशांमध्ये गुप्तचर संस्था कार्यरत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या संस्थांवर महत्त्वाची जबाबदारी असते. अत्यंत गोपनीय पद्धतीने या संस्था काम करतात. त्यामुळे Raw Agent ची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर केली जात नाहीत. मात्र, सध्या अजित डोवाल आणि रविंद्र कौशिक यांच्या बद्दल माहिती झाल्यामुळे. या दोघांचीही तरुणांमध्ये क्रेझ पहायला मिळते. त्यांनी घेतलेले बेधडक निर्णय आणि पाकिस्तानला घडवलेली अद्दल यामुळे त्यांच नाव चर्चेत आलं. त्यामुळे Raw Agent’s कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तरुणांना या क्षेत्र बद्दल आकर्षण वाटू लागले. या ब्लॉगमध्ये रॉ एजंट्स बद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.

Raw Agent म्हणजे काय ? | what is raw agent

RAW (Raw Agent Meaning) म्हणजे Research And Analysis Wing आणि या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीला Raw Agent म्हटले जाते. देशाच्या सुरक्षेसाठी 21 सप्टेंबर 1968 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गोपनीय माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करण्याची जबाबदारी रॉ एजंट्सवर असते. देशातील आणि परदेशातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून गुप्त माहितीची शोध घेण्याच काम रॉ एजंट करतो. त्याचबरोबर भारताच्या आण्विक कार्यक्रमाच्या सुरक्षेतही रॉ एजन्सी सहभागी असते. पोलीस, भारतीय सेना, हवाई दल ज्या प्रमाणे देशात आणि देशांच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावतात. त्याच प्रमाणे पण, त्याच्या पेक्षा अवघड परिस्थितीत जोखीम पत्करून आणि आपली ओळख लपवून रॉ एजंट्स देशाची सेवा करत असतात.

रॉ एजंटवर असणीर मुख्य जबाबदारी म्हणजे, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचे रक्षण करणे होय. या अंतर्गत ज्या देशांपासून आपल्या देशाला धोका आहे. तो धोका काय आहे, हे ओळखून त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी रॉ एजंटवर असते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याची मुभा रॉ एजंटला दिली जाते. जसे की, शत्रू देशांमध्ये गुप्त ऑपरेशन्स राबवणे, त्या देशातील राजकीय आणि लष्करी हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे. त्याचबरोबर संबंधित देशाच्या आर्थिक घडामोडींवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी रॉ एजंट पार पाडतो. या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करून भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी रणनीती आखणे, त्याची माहिती वरिष्ठांना कळवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज पडल्यास देशाच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणे.

भारतातील काही रॉ एजंट्सची नावे | Indian Raw Agents List

तुम्ही वरती वाचलं असेल की, गुप्तचर संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींची नावे सार्वजनिक केली जात नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रमुख व्यक्तींची नावं सार्वजनिक करण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे त्या सर्वांची नावे ही त्यांच्या निवृत्ती नंतर जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आर.एन.काव यांचे नाव आहे. आर.एन.काव हे रॉ चे संस्थापक आणि पहिले प्रमुख आहेत. 1968 ते 1977 या कालखंडामध्ये त्यांनी RAW चे प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे.

त्यानंतर पाकिस्तानची झोप उडवणाऱ्या अजित डोवाल यांच्या नावाचा समावेश आहे. अजित डोभाल यांनी RAW मध्ये ऑपरेटिव्हची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहून भारत सरकारने त्यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदाची जबाबदारी सोपवली आहे. या दोन RAW Agent नंतर संजीव त्रिपाठी आणि विक्रम सूद यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हे दोघेही त्यांच्या त्यांच्या कारकि‍र्दीमध्ये माजी प्रमुख राहिले आहेत. त्याबरोबर रविंद्र कौशीक यांचे नाव सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.

RAW Agent कसे बनावे | How To Become a Raw Agent

RAW Agent बनण्यासाठी कठोर परिश्रम, शारीरिक आणि मानसिक क्षमता, अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य, कठीण परिस्थीतीमध्ये राहण्याची तयारी, वेळेप्रसंगी पडेल ते काम करण्याची सुद्धा तयारी या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणाची असली पाहिजे. ट्रेनिंग दरम्यान या सर्व गोष्टींचा विचार करूनच RAW Agent ला तयार केले जाते. RAW एजंट बनण्यासाठी दोन पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडते. पहिला टप्पा म्हणजे Union Public Service Commission म्हणजेच UPSC ची परीक्षा उत्तीर्ण होणे.

RAW Agent होण्यासाठीची सर्वात पहिली अट म्हणजे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेमधून तुम्ही वाणिज्य, कला अथवा विज्ञान शाखेतून पदवी पूर्ण केलेली असावी. पदवी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी UPSC परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागणार आहे. UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रामुख्याने भारतीय प्रशासन सेवा (IAS), पोलीस सेवा (IPS) किंवा परराष्ट्र सेवा (IFS) या प्रशासकीय सेवांमध्ये संबंधित उमेदवार कार्यरत असावा. कारण या सेवेत चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना RAW मध्ये जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर इतर केंद्रीय सरकारी सेवांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा RAW मध्ये काम करण्याची संधी असते.

Ajay Banga – पुण्यात जन्मलेले World Bank Group चे अध्यक्ष, कोण आहेत अजय बंगा? वाचा सविस्तर…

UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा उत्तीर्ण होण्यासाठी बरीच वर्ष खडतर मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच वेळा वयाच्या 30, 35 किंवा चाळीसीमध्ये सुद्धा परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार देशामध्ये आहेत. परंतु, जर तुमचे स्वप्न RAW Agent होण्याचं असेल, तर तुम्हाला वयाची 30 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच UPSC परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. कारण RAW मध्ये काम करण्यासाठी 21 ते 30 या वयोगटातील तरुण अधिकार्‍यांची निवड केली जाते. त्याबरोबर अनुभवाचा विचार केला तर, RAW Agent होण्यासाठी उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांचा प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभव गाठीशी असावा. उमेदवाराची चपळाई तपासण्यासाठी आणि तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे. हे तपासण्यासाठी प्रशिक्षणाच्या काळात कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्या घेतल्या जातात.

भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवाराच्या पार्श्वभुमीचा विचार केला जातो. म्हणजेच उमेदवाराला थेट क्लास 1 अधिकाऱ्याकडून नियुक्त केले जाते. त्यासाठी उमेदवाराने लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे फाऊंडेशन कोर्ससाठी प्रवेश घेतलेला असावा. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर RAW द्वारे कॅम्पस मुलाखत घेतली जाते. त्यानंतर उमेदवाराची एक वर्षांच्या Lien Period साठी निवड केली जाते. या कालावधीत उमेदवाराला इच्छा असल्यास त्यांच्या मुळे सेवेत पुन्हा जाण्याची अनुमती असते. Lien Period पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला कायमस्वरूपी सेवेत घेतले जाते.

कौशल्य आणि प्रशिक्षण 

RAW Agent म्हणजे देशाच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी. त्यामुळे या पदावर कार्यरत असणारा अधिकारी सुद्धा कौशल्यपूर्ण आणि खडतर तालमीत तयार झालेला असावा लागतो. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे गुप्तचर माहितीचे योग्य विश्लेषण करून अचूक निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्याबरोबर RAW Agent ला अनेक वेळा विविध देशांमध्ये गुप्त पद्धतीने रहावे लागते. त्यामुळे हिंदी, इंग्रजीसह त्या त्या देशांमधील स्थानिक भाषांचे ज्ञान सुद्धा त्याला असले पाहिजे.

विशेष बाब म्हणजे RAW Agent हा लौचिक असला पाहिजे, ज्या देशामध्ये काम करण्याची त्याच्यावर जबाबदारी सोपवण्यात येईल, त्या देशाच्या चालीरिती, तिथली पद्धत, त्यांचा पेहराव अंगीकारण्याची चालाकी त्याच्यामध्ये असली पाहिजे. सर्वात महत्त्वाच म्हणजे गुप्त माहिती गोळा करण्यासाठी लोकांमध्ये मिसळता यायला हवं. सामान्य माणूस म्हणून जीवन जगण्याची कला त्याला आत्मसात करता आली पाहिजे. गुप्त माहिती मिळाली तर कोणालाही त्याची खबर न लागता ती माहिती आपल्या देशात कशी पोहचवता येईल, याची चालाकी सुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे.

RAW मध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाचा खडतर टप्पा सुरू होतो. या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना गुप्तचर माहिती संदर्भात सखोल ज्ञान दिले जाते. सध्या टेक्नॉलॉजीने आपली पाळेमुळे जगभरात पसरवली आहेत. त्यामुळे RAW Agent हा टेक्नॉलॉजी फ्रेंडली असावा यासाठी त्याला Cyber Security, माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध, विविध शस्त्रांची माहिती आणि त्याचे प्रशिक्षण आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे कूटनीती यांसारख्या विविध कौशल्यांचे कठोर प्रशिक्षण त्यांना दिले जाते.

Job Profiles In RAW

रॉ जॉब प्रोफाईल्समध्ये प्रामुख्याने विविध गोष्टींचा समावेश आहे.भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांमध्ये घडणाऱ्या राजकीय तसेच लष्करी घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून त्याचे निरीक्षण करणे त्याचबरोबर इतर राजकीय देशांशी राजकीय संबंध सुरळीत करण्यासाठी सुद्धा रॉ मधील अधिकाऱ्यांची कामगिरी महत्त्वाची ठरते. RAW जॉब प्रोफाईलमध्ये प्रामुख्याने पुढील अति महत्त्वाच्या उद्धिष्टांचा समावेश आहे.

1) परदेशी घडणार्‍या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे
2) दहशतवादविरोधी कारवाया
3) ज्या ज्या वेळी गरज पडेल, त्या त्या प्रत्येक वेळी देशालीत धोरणकर्त्यांना सल्ला देणे
4) परकीय हितसंबंध कसे चांगले राहतील याचा विचार करून धोरणात्मक व्यवहार करणे
5) देशाचा आण्विक प्रोग्राम सुरक्षित ठेवणे

रॉ मध्ये अधिकाऱ्यांची क्रमवारी | Ranks In Raw

RAW एक प्रतिष्ठित संस्था असून RAW Agent म्हणून काम करणे ही अभिमानाची बाब आहे. रॉ मध्ये अनेक प्रकारची रँक आहेत. पदांनुसार अधिकाऱ्यांच्या कामामध्ये जबाबदारीची वाटणी केली जाते. पदनाम श्रेणीनुसार ‘गट अ’ मध्ये प्रामुख्याने सचिव, विशेष सचिव, सहसचिव आणि उपसचिव यांच्या पदांचा समावेश आहे. त्याबरोबर ‘गट ब किंवा क’ मध्ये प्रामुख्याने वरिष्ठ क्षेत्र अधिकारी, श्रेत्र अधिकारी आणि उपक्षेत्र अधिकारी या पदांचा समावेश आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment