Virat Kohli – किंग कोहलीची झंझावाती कारकीर्द, हे टॉप 10 फॅक्ट्स तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर…

Virat Kohli नावाच वादळ मागील 16 ते 17 वर्षांपासून क्रिकेट विश्वात गोंगावत आहे. सचिन तेंडूलकर यांच्या नंतर आपल्या फलंदाजीची क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं ते Virat Kohli याने. त्यामुळेच किंग कोहली असा उल्लेख त्याचे चाहते आवर्जून करतात. फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विराट कोहलीचा चाहता वर्ग आहे. मैदानामध्ये त्याला खेळताना पाहणं हे कित्येक चाहत्यांच आजही स्वप्न आहे.

दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी त्याने वयाची 36 ओलांडली, जगभरातून चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विराटने आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर काही स्वत:चे विक्रम मोडीत काढले. भारताचा कर्णधार म्हणून सुद्धा त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. कर्णधार म्हणून भारताकडून सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटच्यया वाढदिवसाचे औचित्य साधत त्याचा संपूर्ण प्रवास आणि त्याची अव्वल कामगिरी याबद्दल या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत.

क्रिकेटसाठी शिक्षणाचा त्याग केला

सचिन तेंडूलकर, महेंद्र सिंग धोनी या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश असणाऱ्या विराट कोहलीचा जन्म दिल्लीमध्ये 5 नोव्हेंबर 1988 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. वडील प्रेम कोहली Criminal lawyer, तर आई गृहिणी होती. पाच जणांच्या कुटुंबात विराटचे आई-वडील, विराट, त्याचा मोठा भाऊ विकास आणि मोठी बहीण भावना यांचा समावेश आहे. विराट हा कुटुंबात सर्वात लहान आणि तितकाच खोडकर स्वभावाचा. विराटने पहिल्यांदा वयाच्या तिसऱ्या वर्षी हातात बॅट घेतली ती आजतागायत त्याने ती सोडलेली नाही.

विराटला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. खेळण्यात सुद्धा तरबेज होता. विराटचे वडील प्रेम कोहली यांनी त्याचे कौशल्य ओळखले आणि विराटच्या ट्रेनिंगला सुरुवात झाली. प्रेम कोहली स्वत: त्याला सरावासाठी घेऊन जात असत. क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विराट कोहलीला अभ्यासात रस नव्हता. कसेबसे 12 वी पर्यंतचे शिक्षण त्याने विशाल भारती पब्लिक स्कूल दिल्लीमधून पूर्ण केले. त्यानंतर त्याने शिक्षण सोडून आपला संपूर्ण फोकस क्रिकेटच्या दिशेने वळवला.

राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिला सामना सुमित डोंगरा नावाच्या क्लबमधून खेळला. त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहीले नाही. त्याच्या खेळाचा आलेख सतत उंचावत गेला. त्याने क्लबच्या माध्यमातून मैदानं गाजवण्यास सुरुवात केली आणि 2002 साली त्याला त्याच्या मेहनतीचे पहिले फळ मिळाले.

Under-15 ते Team India

विराट कोहलीचा खेळ आणि खेळातलं अॅग्रेशन पाहून त्याची 2002 साली अंडर-15 संघात निवड झाली. दमदार कामगिरी केल्यानंतर त्याची 2006 साली अंडर-17 संघात निवड करण्यात आली होती. आपल्या खेळाने त्याने सर्वांची मन जिंकली. तसेच निवडकर्त्यांना आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यामुळेच 2008 साली त्याची अंडर-19 विश्वचषकासाठी भारताच्या संघात निवड झाली.

मलेशियामध्ये पार पडलेल्या या विश्वचषकात विराट कोहलीवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विश्वचषक उंचावला होता. विराट कोहलीचा खेळ पाहून त्यांची भारताच्या मुख्य संघात निवड करण्यात आली. श्रीलंकाविरुद्ध त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पहिल्या सामन्यात विराटला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

विराटचा खेळ पाहून अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला होता. त्याच खेळ आणि खेळण्याची शैली पाहून 2011 साली भारतात पार पडलेल्या विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघात त्याची निवड करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने हा विश्वचषक उंचावत आणि इतिहास रचला होता. या विश्व विजेत्या संघाचा विराट कोहली सुद्धा महत्त्वाचा भाग होता.

कर्णधार म्हणून आपल्या नावाचा डंका वाजवला

विराट कोहलीचे 2008 साली IPL मध्ये आगमन झाले. RCB ने विराटला आपल्या ताफ्यात 20 लाख रुपयांची बोली लावत खरेदी केले होते. मात्र, त्या हंगामात विराटला फार चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, 2009 साली झालेल्या आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ अंतीम फेरीपर्यंत धडक मारण्यात यशस्वी ठरला होता. आरसीबीला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात विराट कोहलीचा महत्त्वाचा वाटा होता. खुद्ध अनिल कुंबळे यांनी त्याचे कौतुक केले होते. 2013 साली विराटकडे RCB च्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

विराटने आपल्या आता पर्यंतच्या क्रिकेट कारकि‍र्दीत कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून 2014 ते 2022 पर्यंत जबाबदारी पार पाडली. वनडे कर्णधार म्हणून 2013 ते 2021 पर्यंत आणि टी-20 कर्णधार म्हणून 2017 ते 2021 पर्यंत जबाबदारी पार पाडली. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेक विक्रमांना गवसणी घातली अनेक विक्रम रचले आणि ऐतिहासिक मालिका वियज साजरे केले.

पुरस्कारांवर उमटवली मोहर

विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने अनेक वेळा चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अनेक सामने त्याने भारताला एकहाती जिंकवून दिले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याने आपल्या आतापर्यंतच्या कारकि‍र्दीमध्ये अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. विराट कोहलीला सर्व प्रथम 2012 साली पिपल चॉइस अवॉर्ड फॉर फेव्हरेट क्रिकेटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2013 मध्ये अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट या पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला. 2017 मध्ये आईबीएल इंडियन ऑफ द इयर, पद्मश्री अवॉर्ड त्याला मिळाला. तसेच 2018 साली सर गॅरिफिल्ड सोबर्स ट्रॉफीने विराटला गौरवण्यात आले.

Virat Kohli Top Facts And Records

विराट कोहलीने आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत.

1) आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी विराट कोहली एक खेळाडू आहे.

2) विराट कोहली आयपीएलमध्ये एम. चिन्नास्वामी या एकाच स्टेडियमवर सर्वाधिक 3000 धावा करणारा पहिला खेळाडू आहे.

3) विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिा जिंकली.

4) आयपीएलमध्ये सर्वाधिक 114 झेल घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

5) विश्वचषक पदर्पणात शतक झळकवणारा विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू आहे.

6) वनडे क्रिकेटमध्ये सलग 3 सामन्यांमध्ये 3 शतक झळकवण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

7) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक 6 द्विशतकं ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.

8) वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 9000 धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

9) आयपीएलमध्ये सर्वाधिक 63 अर्धशतक झळकवणारा तो दुसरा खेळाडू आहे.

10) एकाच मालिकेत एक पेक्षा अधिक द्विशतक झळकवणारा तो विनु मंकड यांच्या नंतरचा दुसरा फलंदाज आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment