Best courses after 12th commerce

12 वी उत्तीर्ण झाला आहात पण पुढे काय कराव? तुम्हाला सुद्धा हा प्रश्न सतावत असेल तर काळजी करू नका. कारण हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. यामध्ये Best Courses After 12th Commerce ची आपण माहिती घेणार आहोत.

Best courses after 12th commerce

1) Chartered Accountancy (CA)

चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजेच CA हा Institute Of Chartered Accountants of India (ICAI) च्या माध्यामातून ऑफर केला जातो. हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. ऑडीटिंग, कर आकारणी आणि आर्थिक व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सीए व्यावयायिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

2) Cost And Management Accountancy (CMA)

The Institute Of Cost Accountants Of India (ICAI) च्या माध्यामातून हा अभ्यासक्रम ऑफर केला जातो. मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये CMAs आर्थिक नियोजन आणि विश्लेषणामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

3) Bachelor Of Business Administration (BBA)

व्यवसायाचे व्यवस्थापण कशापद्धतीने करावे हे शिकण्यासाठी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये मानव संसाधन, वित्त आणि उद्योजकता, जाहिरात यासारख्या विषयांचा समावेश असतो. हा तीन वर्षांचा पदीवपूर्व अभ्यासक्रम आहे.

4) Bachelor Of Economics (B.Econ)

ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रामध्ये आवड आहे. अशा विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची निवड करायला हवी. यामध्ये आर्थिक धोरण, विश्लेषण आणि सांख्यिकी पद्धतींच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी आर्थिक संशोधन, आर्थिक विश्लेषण आणि सरकारी संस्थांमध्ये करिअर करण्यासाठी सज्ज होतात.

5) Bachelor Of Finance And Investment Analysis (BFIA)

ज्या विद्यार्थ्यांना वित्त आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये काम करण्यात स्वारस्य किंवा आवड आहे. अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून BFIA या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा. यामध्ये आर्थिक गुंतवणूकीची धोरणे, जोखीम व्यवस्थापण आणि आर्थिक बाजार कशापद्धतीने काम करतो हे शिकवले जाते. यामुळे विद्यार्थ्यी बँकिंग गुंतवणूक, आर्थिक विश्लेषण आणि स्टॉक मार्केट ट्रे़डिंगमध्ये करिअर करण्यास सक्षम होतो.

6) Bachelor Of Financial Markets (BFM)

बॅचलर ऑफ फायनान्शिअर मार्केट हा सिक्युरिटीज ट्रेडिंग, आर्थिक बाजार आणि गुंतवणूकीचे व्यवस्थापन या घटकांवर लक्ष केंद्रित करणारा अभ्यासक्रम आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी बँकिंग, गुंतवणूक आणि आर्थिक सल्लागार सेवा या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी सक्षम होतात.

7) Bachelor Of Commerce in Accounting And Finance (BAF)

लेखा (Accounting) आणि वित्त (Finance) हा वाणिज्य शाखेतील एक विशेष अभ्यासक्रम आहे. यामध्ये आर्थिक नियोजन, कर आकारणी आणि गुंतवणूक व्यवस्थापन यासारख्या लेखा आणि वित्ताशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश असतो. पदवीपूर्ण केल्यानंतर सरकारी किंवा खासगी लेखा संस्था, आर्थिक सल्लागार आणि कॉर्पोरेट फायनान्समध्ये करिअर करण्याची दारे उघडी होता.

8) Bachelor Of Banking And Insurance (BBI)

ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग आणि विमा क्षेत्रामध्ये आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी BBI हा कोर्स आहे. या कोर्समध्ये प्रामुख्याने बँकेशी संबंधित कामांसाठी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. जसे की बँकिंग ऑपरेशन्स, जोखीम व्यवस्थापन आणि विमा पॉलिसींची सखोल माहिती. या कोर्समध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर विविध बँका, विमा कंपन्या आणि आर्थिक सल्लागार पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.

9) Bachelor Of Commerce in Computer Application (B.Com – CA)

संगणक प्रोग्रामिंग आणि एॅप्लिकेशन्स शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. सर्व गोष्टी डि़जिटल झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या कोर्सच्या माध्यमातून प्रोग्रामिंग आणि अॅप्लिकेशन्समध्ये प्राविण्य मिळवणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर वित्त-संबंधित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटीमध्ये नोकरी करण्याची संधी उमेदवारांना मिळू शकते.

10) Bachelor Of Commerce in E-commerce (BCom – E-Commerce)

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कामे करण्यात स्वारस्य आहे अशा विद्यार्थ्यांनी ई-कॉमर्समधील बी.कॉम ही पदवी घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. या कोर्समध्ये डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स स्ट्रॅटेर्जी आणि ऑनलाइन बिझनेस मॅनेजमेंट यासारख्या विषयांचा समावेश आहे. या कोर्समध्ये यशस्वीरित्या पदवीपूर्ण केल्यानंतर नामांकित ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटिंग आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करण्याची संधी निर्माण होते.

https://marathichowkvishesh.com/mercaht-navy-qualification-admission-courses-eligibilitty-sallary-what-is-merchant-navy-information-in-marathi/

11) Company Secretary (CS)

कंपनी सचिव हा सर्व कायदेशीर आणि आर्थिक नियमांचे पालन करणारा एक जबाबदार व्यक्ती असतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर Coporate Governance, Legal Compliance आणि Company Administration Roles यासारख्या क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याची संधी निर्माण होते.

12) Bachelor Of Commerce in Taxation (B.com – Taxation)

या कोर्समध्ये करप्रणालीशी संबंधित सर्व घटकांची माहिती विद्यार्थ्यांना होते. कर आकराणी कायदे, अनुपालन आणि सल्लागार म्हणून कामाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक करिअरच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कर सल्लागर, कर विश्लेषक इ. पदांवार काम करण्याची संधी निर्माण होते.

13) Bachelor Of Commerce in Entrepreneurship (B.Com – Entrepreneurship)

व्यावसायाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे. या कोर्समध्ये प्रामुख्याने व्यवसायाचे नियोजन, योग्य व्यवसाय कसा निवडावा, व्यवसायासाठी जागा निवडताना काय काळजी घ्यावी त्याचबरोबर स्टार्टअप्स आणि उद्योजकीय कौशल्यांबद्दल सखोल माहिती या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दिली जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुम्ही सक्षम होता.

14) Bachelor Of Hotel Management (BHM)

ज्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये आवड आहे अशा विद्यार्थ्यासाठी BHM हा कोर्स आहे. या कोर्समध्ये हॉटेलमध्ये कोणत्या गोष्टी कशापद्धतीने कार्य करतात ते शिकवले जाते. त्याचबरोबर ग्राहकांची सेवा आणि आदरातिथ्य कसे करावे याचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. जे विद्यार्थी हा कोर्स उत्तीर्ण करतात असे विद्यार्थी प्रामुख्याने हॉटेल्स, क्रूझ जहाजे, रिसॉर्ट्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये आपल उज्वल भविष्य घडवू शकतात.

15) Digital Marketing

जगभरामध्ये सर्व गोष्टी या डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे व्यावसायांची ऑनलाईन उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटींग करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. डिजिटल मार्केटिंगमधील प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर सोशल मिडिया व्यवस्थापन, SEO Expert, ऑनलाईन मार्केटिंग यांसारख्या पदांवर नोकरी करण्याची संधी निर्माण होते.

Leave a comment