सर्वप्रथम दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. शालेय जीवनातील प्रवास संपवून तुमचा आता कॉलेजच्या कट्ट्यावर एक नवीन आणि रोमांचकारी प्रवास सुरू होणार आहे. मात्र या प्रवासात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर रस्ता भरकटण्याची शक्यता निर्माण होते. कारण ‘माझा मित्र जी शाखा निवडणार तीच मी निवडणार’ या तत्त्वावर मुलांचा निर्णय होत असतो. मात्र असे निर्णय फसण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावे, करिअरच्या बाबतीत तुमचा निर्णय चुकू नये, या सर्व गोष्टींचा विचार करून Courses After 10th हा ब्लॉग लिहण्यात आला आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर वाणिज्य (Commerce), विज्ञान (Science) आणि कला (Arts) शाखेच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी निर्माण होतात. पण तुम्हाला कोणती शाखा निवडायची आहे वाणिज्य, विज्ञान कि कला? उत्तर सापडत नाहीये ना? ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सापडेल याची मला खात्री आहे.
आपण तिन्ही शाखांचा विचार केला तर विज्ञान शाखेतून जाणार रस्ता हा Physics, Chemistry, Biology आणि Mathematics या विषयांना धरून जाणार असतो. विज्ञान शाखेतून प्रामुख्याने Engineering, Research, Technology आणि Medicine या क्षेत्रांमध्ये भविष्य निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना निर्माण असते.
वाणिज्य शाखेतून जाणार रस्ता हा Accountancy, Business Studies, Mathematic आणि Economics या विषयांना धरून जाणार असतो. वाणिज्य शाखेतून प्रामुख्याने Entrepreneurship, Accountancy, Finance आणि Business Management या क्षेत्रांची निवड विद्यार्थ्यांना करता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना कलेची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांचा रस्ता History, Sociology, Political Science, Literature आणि Psychology या विषयांना धरून जाणार असतो. कला शाखेतून प्रामुख्याने Social Work, Arts, Teaching आणि Journalism या क्षेत्रांची निवड करून आपल्या करिअरला आकार देता येऊ शकतो.
Courses After 10th in Commerce
10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वच विद्यार्थ्यांची आवडती शाखा म्हणजे कॉमर्स. बँकिंग, अकाउंटिंग, फायनान्स किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी बॅचलर ऑफ कॉमर्स हा एक चांगला पर्याय आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी (CMA) आणि कंपनी सेक्रेटरी (CS) व्यवसाय यासारख्या क्षेत्रांमध्ये यश संपादित करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी 10 वी नंतर वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला पाहिजे.
वाणिज्य शाखेशी संबंधित असणारे आणि एक ते दोन वर्षांमध्ये पूर्ण करता येणारे डिप्लोमा कोर्सेस / Diploma Courses After 10th
Diploma In Marketing
Diploma in Business Administration
Diploma in Entrepreneurship
Diploma in Retail Management
Diploma in Company Secretary
Diploma in Marketing
Arts courses after 10th
ज्या विद्यार्थ्यांना कलेची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांनी कला शाखेची निवड करावी. बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) या नियमीत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त फॅशन डिझायनिंग, Visual Arts, Theatre, Graphic Design आणि Performing Arts सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी निर्माण होते.
कला शाखेशी संबंधित असणारे आणि 1 ते 2 वर्षांचा कालावधी असणारे डिप्लोमा कोर्सेस
Interior Design
Animation And VFX
Graphic Design
1 ते 3 वर्षांचा कालावधी असणारे डिप्लोमा कोर्सेस
Fashion Design
3 ते 4 वर्षांचा कालावधी असणारे डिप्लोमा कोर्सेस
Fine Arts (Painting, Sculpture etc.)
Performing Arts (Music, Drama, Dance)
तीन वर्षांचा कालावधी असणारा डिप्लोमा किंवा बॅचलर कोर्स
Mass Communication
courses after 10th in science
जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणात असेच विद्यार्थी विज्ञान शाखा निवडतात असा एक गैरसमज सर्व विद्यार्थांसहीत पालकांमध्ये पाहायला मिळतो. मात्र खरचं ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून आपले भविष घडवायचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी गुणांचा विचार न करता आवर्जून विज्ञान शाखा निवडावी. तुमच्या एका योग्य निर्णयामुळे Engineering, Technology, Medicine and research ets. यासारख्या फिल्डमध्ये करिअर करण्याची संधी निर्माण होते.
1 ते 2 वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण करता येणारे विज्ञान शाखेतील कोर्सेस
Biotechnology (Diploma)
Computer Science (Diploma)
Medical lab Technology
Pharmacy Assistant
3 ते 4 वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण करता येणारे विज्ञान शाखेतली कोर्सेस
Engineering Diploma (Specializations like civil, Mechanical, Computer Science)
तीन वर्षांचा डिप्लोमा + बॅचलर डिग्री
Nursing
List of Courses After 10th (Diploma and Certificate)
Diploma Courses After 10th
Diploma in Medical Lab Technology (MLT) – कालावधी 2 वर्ष
Diploma in Engineering – कालावधी 3 वर्ष
Diploma in Digital Marketing – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
Diploma in Interior Design – कालावधी 1 ते 2 वर्ष
Diploma in Computer Application (DCA) – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
Diploma in Animation and Multimedia – कालावधी 1 ते 2 वर्ष
Diploma in Fashion Designing – कालावधी 1 ते 2 वर्ष
Diploma in Hotel Management – कालावधी 1 ते 2 वर्ष
Diploma in Culinary Arts – कालावधी 1 ते 2 वर्ष
Diploma in Financial Accounting – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
Diploma in Event Management – कालावधी 1 वर्ष
Certificate Courses After 10th
Certificate in Photography – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
Certificate in Graphic Designing – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
Certificate in Web Development – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
Certificate in Beauty and Wellness – कालावधी 6 महिने ते 1 वर्ष
https://marathichowkvishesh.com/courses-after-12th-commerce-b-com-bba-bca/
10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर काय करावे? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न या ब्लॉगमध्ये करण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगले क्षेत्र निवडण्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे माहिती दोनवेळा पूर्ण वाचा, विचार करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सल्ला घ्यायला लाजू नका. तुम्हाला जे क्षेत्र निवडायच आहे. त्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या किंवा तुमच्या ओळखीमध्ये असणाऱ्या व्यक्तीशी नक्की संपर्क साधा. तसेच तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर आपल्या कंमेंट सेक्शनमध्ये बिंदास प्रश्न विचारा.तुम्हाला पुढील उज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.