Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या गडावर जाययं? कस जायचं? गड चढायला सोपा असेल का? गडावर राहण्याची-पाण्याची सोय आहे का? गडावर पाहण्यासारखी ठिकाण कोणती आहेत? हा गड लहाण मुलांना घेऊन जाण्यासाठी सुरक्षित आहे का? असे असंख्य न संपणारे प्रश्न नवख्या ट्रेकर्सच्या मनात निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हा ब्लॉग. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा आणि वेळ न दवडता सह्याद्रीच्या कुशीत फिरायला जा.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या दहा गडांवर पावसाळ्यामध्ये आवर्जून गेले पाहिजेत.

1) Raigad fort information in Marathi (रायगड)

किल्ल्याचा इतिहास

रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. गिरीदुर्ग प्रकारातील या गडाला पूर्वी रायरी या नावाने ओळखले जायचे. रायरी या नावा व्यतिरीक्त नंदादीप, बदेनूर, तनस या नावांनी सुद्धा रायगड ओळखला जायचा. तसेच इंग्रज रायगडाला जिब्राल्टर या नावाने ओळखत होते. ‘सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर’ रायगड म्हटल की हिरोजी इंदुलकरांचा नाव प्रथम घ्यावे लागते. कारण स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाला नव रूप देण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्या खांद्यावर होती. हिरोजींनी जिवाच रान केलं, वळेप्रसंगी स्वमालकीची जमीन विकली आणि 12 ते 14 वर्ष प्रचंड मेहनत घेत स्वराज्याची राजधानी उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ या गडावर वास्तव्य होते.

6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पृथ्वीतलावरील सर्वात मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रायगडाच्या मातीत आपला राजा छत्रपती जाहला. आज सुद्धा मोठ्या उत्साहात राजयगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांव्यतिरीक्त छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा रायगडावरच पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्य्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडाला प्रत्येकाने एकदा तरी भेट दिली पाहिजे.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

रायगडावर पाहण्यासारखे मुख्य पाच दरवाजे आहेत. यामध्ये महादरवाजा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा आणि वाघ दरवाजाचा समावेश आहे. तसेच गडावर हिरकणी कडा, भवानी कडा, श्रीगोंदे कडा आणि टकमक टोक या रायगडावरील चार टोकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कुशावर्ता तलाव सुद्धा पाहण्यासारखा आहे.

रायगडावर आल्यानंतर जगदीश्वराच्या आणि शिरकाई देवीच्या मंदिराला आवर्जून भेट द्या. तसेच नगारखाना, राजभवन, राणी वसा, दरबार, धान्य कोठार आणि बाजारपेठ सुद्धा पाहण्यासारखी आहे. रायगडाच्या पायथ्याला पाचाड गावात असणाऱ्या पाचाड वाड्यामध्ये राजमाता जिजाऊंची समाधी पाहण्यासारखी आहे.

गडावर राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था आहे का?

शक्यतो पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये गडावर राहणे टाळावे. वाऱ्याचा वेग आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे गडावर राहणे धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये गडासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून सुचना दिल्या जातात.

गड चढायला कसा आहे

रायगड चढण्यासाठी सोपा आहे. पायऱ्यांची वाट असल्यामुळे गड चढताना कोणतीही अडचण येत नाही. त्याचबरोबर रोप-वे सुविधा उपलब्ध असल्यामुळे वयस्कर व्यक्ती सुद्धा गडावर जाऊ शकतात.

लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे योग्य आहे का?

लहाण मुलांना घेऊन जाण्यासाठी रायगड हा अगदीच चांगला गड आहे. मात्र जास्त पावसाच्या वातावरणात शक्यतो लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे टाळावे.

मुंबईवरुन गडावर कसे जायचे

मुंबई पासून रायगड हे अंतर 160 किमी आहे. मुंबईवरुन रायगडला जाण्यासाठी अंदाजे साडेतीन ते चार तासांचा वेळ लागतो. रायगडला जाण्यासाठी महाराष्ट्र शासनची एसटी सुविधा उपलब्ध आहे.पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या वेळाप्रकामध्ये बदल होत असतो. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट किंवा बस स्थानकामध्ये फोन करून तुम्हाला मुंबईतून बसची सुटण्याची योग्य वेळाची माहिती मिळू शकते.

2) Rajmachi Fort (राजमाची)

किल्ल्याचा इतिहास

पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान या किल्ल्याचे वास्तव्य आहे. 1909 रोजी भारत सरकारने राजमाची या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. प्रामुख्याने व्यापाराच्या दृष्टीने राजमाची किल्ला हा महत्वाचा होता. व्यापारी मार्गावर नियंत्रन ठेवण्यासाठी आणि जकात वसुलीसाठी या कोकण आणि घाटावरील किल्ल्यांचा वापर केला जात असे. या सर्व किल्ल्यांमधील राजमाची हा सर्वात महत्वाचा किल्ला होता.

व्यापाराच्या व्यतिरीक्त लष्करी दृष्ट्‍या सुद्धा हा किल्ला महात्वाचा होता. राजमाची किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्‍या विचार केला तर किल्ल्याच्या एका बाजूस पेठ, भीमाशंकर, गोरखकड, सिद्धगड, चंदेरी आणि ढाकचा किल्ला आहे. तर दुसऱ्या बाजूला मावळ प्रांतातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले नजरेस पडतात. राजमाची हा किल्ला साधारण 2500 वर्षांपूर्वीचा असावा अशी इतिहासात नोंद आहे. तसेच राजमाची या किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’ या नावाने ओळखले जायचे. छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजेत सन 1689 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र त्यानंतर शाहू महाराजांना हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला. त्यानंतर काही काळ बाजीराव पेशवे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे 1818 मध्ये किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. तसेच कातळधार धबधबा, कोंढाणा लेणी ही इतर काही ठिकाणे गडावर पाहण्यासारखी आहेत.

गडावर राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था आहे का?

राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला असणारे उधेवाडी या गावात राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

गडावर जायचे कसे? गड चढायला कसा आहे?

राजमाची किल्ल्यावर जाण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक मार्ग कर्जतवरून जातो तर, एक मार्ग लोणावळ्यावरून जातो. लोणावळ्याहून तुंगार्ली मार्गे पायी राजमाची पर्यंत जाता येते. ही पायवाट 15 कि.मी लांबीची असल्यामुळे किल्ल्यावर जाण्यास साधारण तीन ते चार तास लागतात. पायवाट सरळ असल्यामुळे चालण्यास कोणतीही अडचण येत नाही.

राजमाची किल्ल्यावर जाणार दुसरा मार्ग हा कर्जतहून कोंदीवडे मार्गे आहे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट सुरू होते. या मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात.

राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला गाडीने सुद्धा पोहचता येते. लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव-फणसराई मार्गे गडावर चारचाकी किंवा दुचाकी घेऊन जाता येते. परंतु मातीचा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यामध्ये गाडी घेऊन जाण्यासाठी रस्ता सोईस्कर नाही. दुचाकी गाडी जाऊ शकते मात्र चारचाकी गाडी घेऊन जाणे रिस्की ठरू शकते.

लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे योग्य आहे का?

लहाण मुलांना घेऊन जाण्यासाठी हा गड उत्तम आहे. गडाच्या पायथ्याला जाईपर्यंत चांगली पायवाट असल्यामुळे लहाण मुलांना घेऊन जाण्यासाठी हा किल्ला योग्य आहे. तसेच गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी उत्तम पायऱ्या आहेत. जास्त पाऊस असेल तर लहाण मुलांना घेऊन जाणे टाळावे.

3) कलावंतीणी आणि प्रबळगड

4) Karnala Fort (कर्नाळा)

5) Sudhagad Fort (सुधागड)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला सुधागड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती करण्यासाठी योग्य आहे.

6) Sondai Fort (सोंडाई)

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या आसपास आणि माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असंख्य गडकिल्ले थाटात वसले आहेत. या सर्व गडांचे आपापले वैशिष्ट्य आहे. काही गडांची नावे ही गडावरील देवीच्या नावाने पडली आहेत, तर काही गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिले आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्या मुंबई-पुण्यातील भटक्यांचे आवडते ठिकाण म्हणजे कर्जत. कारण कर्जतमधून वेगवेगळ्या गडांवर जाणाऱ्या असंख्य वाटा पाहायला मिळतात. याच कर्जतजवळ Sondai Fort हा एक छोटा आणि अपरिचित किल्ला आहे. या गडावर जाण्याच्या मुख्य दोन वाटा असल्या, तरी सोंडेवाडी मार्गे गडावर जाताना मोरबे धरणाचा विस्तीर्ण जलाशय नजरेस पडतो. नवख्या ट्रेकर्ससाठी सोंडाई गड एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

7) इर्शाळगड

रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशील इर्शाळगड वसला आहे. मुंबई-पुणे जुन्या हायवेच्या शेजारी हा गड पाहायला मिळतो. तसेच कल्याण-पुणे लोहमार्गावरून प्रवास करताना देवणीचा सुळका, माथेराण, पेब, म्हैसमाळ, प्रबळगड, मलंगगड आणि इर्शाळगडाचे दर्शन होते. मुंबई, पुणे आणि ठाणे पासून ईर्शाळगड हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या संख्येने गिर्यारोहक, सह्याद्रीप्रेमी गडावर येत असतात.

8) Lohgad Fort (लोहगड)

9) Visapur Fort (विसापूर)

10) Peb/Vikatgad (पेब/विकटगड)

सह्याद्रीने महाराष्ट्राला भरभरुन दिले आहे. धबधबे, गडकिल्ले, डोंगररांगा, नद्या शब्द अपुरे पडतील ऐवढी निसर्ग संपदा या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळेच ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार न करता सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मुंबई,नवी मुंबई, पुणे आणि ठाणेकरांसाठी जवळ असणारा किल्ला म्हणचे पेब किंवा विकटकड (Peb Fort Information in Marathi). माथेरानच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या टुमदार गडाला तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा Peb fort information in Marathi

सर्व गडांची सविस्तर माहिती अपडेट करण्यात येत आहे…

Leave a comment