Fashion Designing Course – फॅशन डिझायनर बनण्यासाठी काय करायचं? या क्षेत्रात किती संधी आहे? जाणून घ्या सविस्तर…

विद्यार्थ्यांनी बदलत्या ट्रेंड नुसार स्वत:मध्ये काही बदल करून घेणे गरजेचे असते. 5G च्या या जगात टिकायचे असेल तर स्वत:ला अपग्रेड करण खूप गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या कला कौशल्यांना धारधार करणाराच या आधुनिक जगात टिकू शकतो. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात तरुणांच्या सोबतीने तरुणी सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. Nancy Tyagi या तरुणीने आपल्या कलेच्या जोरावर साऱ्या जगाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. मे 2024 मध्ये पार पडलेल्या Cannes Film Festivalमध्ये तिच्या कलाविष्काराची साऱ्या जगाने दखल घेतली. तसेच तिच्या या कागमिरीमुळे तिला फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्धी सुद्धा मिळाली. अशीच संधी Fashion Designing Course या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. कारण फॅशन इंडस्ट्री ही मागील काही वर्षांमध्ये वेगाने वाढत आहे. त्यामुळे Fashion Designing या कोर्सची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

फॅशन डिझाईन म्हणजे काय? | what is fashion designing course

फॅशन डिझाईन या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच काय तर कपडे, ॲक्सेसरीज आणि पादत्राणे तयार करण्याची कला होय. फक्त कपडे शिवणे म्हणजे फॅशन डिझाईन नाही. तर त्यामध्ये कपडे शिवण्याचे विविध प्रकार, तेच कपडे सुंदर करण्यासाठी आवश्यक असणारे रंगसंगती, चालू ट्रेंडच्या सोबतीने डिझाईन करणे इत्यादी घटकांचा यामध्ये समावेश आहे. फॅशन डिझायनर हा इतिहास, कला, तंत्रज्ञान आणि भारताच्या विविध संस्कृतितून प्रेरणा घेत रंग, फॅब्रिक, पोत आणि सिल्हूट यासारख्या घटकांची मदत घेत असतो. शूजपासून ते कपड्यांपर्यंत आणि साड्यांपासून ते सूटपर्यंतच्या डिझाइनवर काम करण्यासठी फॅशन डिझायनरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी आहे.

Fashion Designer बनण्यासाठी काय करावे

Nancy tyagi

फॅशन डिझाईन हे झपाटण्याने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. त्यामुळे कलेची आवड असणारे असंख्य विद्यार्थी या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. परंतु अपुऱ्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच वेळा त्यांचा भ्रमनिरास होतो. फॅशन डिझायनर बनण्यासाठी काय कराव लागेल याची पुरेशी कल्पना त्यांना नसते. पण तुम्हाला जर फॅशन डिझायनर व्हायच असेल तर सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य, शिक्षण आणि वर्तमान ट्रेंड यांचे सखोल ज्ञान तुमच्या अंगी असले पाहिजे. एक यशस्वी फॅशन डिझायनर होण्यासाठी तुम्हाला चांगले शिक्षण आणि तितकाच चांगल्या पद्धतीचा सराव सुद्धा करावा लागणार आहे.

फॅशन डिझायनर होण्यासाठी तुम्हाला मूलभूत शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कलेची आवड आणि त्या विषयातील जाण असली पाहिजे. फॅशन डिझायनर होण्यासाठी अंडरग्रॅज्युएट पदवी, बॅचलर ऑफ डिझाइन (B.Des.), बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA), बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (B.F.Tech) या पदवीपूर्वी अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला पदवी घ्यावी लागणार आहे. त्याच बरोबर टेक्सटाईल डिझाईन किंवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा तुम्ही करू शकता. फॅशन डिझायनर होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा सुरू होतो.

मुलींनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? After 10th Courses List For Girls

शैक्षणिक पात्रता पूर्ण केली म्हणजे आपण फॅशन डिझायनर झालो, असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गौड गैरसमज आहे. कारण फॅशन डिझायनर होण्यासाठी तुम्हाला शिक्षणाच्या जोडीने कौशल्यांची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी तुमच्या अंगी पुढील कौशल्य असली पाहिजेत. सर्वात महत्त्वाच म्हणजे कापडाची समज तुम्हाला असली पाहिजे. त्यानंतर त्याचा नमुना, शिवणकाम, कलर या गोष्टी कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक प्राविण्यता तुम्हाला विकसीत करावी लागणार आहे. याच बरोबर तुम्हाला मार्केटींग करणे सुद्धा जमले पाहिजे आणि मार्केटिंग करण्यासाठी संवाद कौशल्य कशा पद्धतीने चांगलं करता येईल यावर अधिक भर दिला पाहिजे. आपण तयार केलेलं डिझाइन त्याच आत्मीयतेने प्रेझेंट सुद्धा करता आले पाहिजे. यासाठी संवाद कौशल्य तुम्हाला विकसीत करावे लागणार आहे. तसेच वर्तमान ट्रेंड बद्दल तुम्ही जागरूक असलं पाहिजे. कारण ट्रेंडला धरून तुम्ही पुढे गेला नाहीत तर तुमचे डिझाइन कितीही भारी असले तरी ते Out डेटेट ठरेल आणि त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळणार नाही. मागणी तसा पुरवठा या तत्वाला अनुसरून तुम्हाला तुमच्या कामाचा वेग वाढवावा लागणार आहे.

Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र

शिक्षण आणि कौशल्यांची पात्रता फेरी पूर्ण केल्यानंतर एक नामांकित फॅशन डिझायनर म्हणून आपल्या नावाची छाप पाडण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची काळाजी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ तयार करावा लागेल. पहिल्याच फटक्यात तुमच्या कामाच इंप्रेशन तुमच्या क्लाईंटवर किंवा जिथे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ प्रेंझेंट कराल त्या कंपनीमध्ये पडलं पाहिजे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमचा एक दर्जेदार पोर्टफोलिओ तयार करावा लागणार आहे. कारण बहुतेक कंपन्या पोर्टफोलिओची मागणी करतात. तसेच कामाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला इंटर्नशिप करावी लागणार आहे. कामाचा तगडा अनुभव तुम्हाला प्राप्त करावा लागेल. तरच य इंडस्ट्रीमध्ये तुमचा टिकाव लागू शकेल.

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्स करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी | Online Fashion Design Courses

ऑनलाइन फॅशन डिझाईन कोर्स हा फॅशन उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान शिकण्यासाठी एक लवचिक मार्ग आहे. हा अभ्यासक्रम नवशिक्या, कलेची आवड असणाऱ्या आणि महत्वाकांक्षी विद्यार्थी, व्यवसायिकांसाठी फायदेशीर ठरतो. या ऑनलाईन कोर्समध्ये डिझाइनिंग करण्यासाठी आवश्यक तत्त्वे, पॅटर्न-मेकिंग, गारमेंट बांधकाम, कापडाची समज आणि ट्रेंड विश्लेषण यासारख्या विषयांचा समावेश आहे.

भारतासह जगभरातील नामांकित संस्थांमध्ये फॅशन डिझाइनिंगचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये Coursera, Udemy, Skillshare आणि edX सारखे अनेक नामांकित प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. तसेच पर्सन्स स्कूल ऑफ डिझाईन, सेंट्रल सेंट मार्टिन्स आणि NIFT सारख्या अव्वल दर्जाच्या संस्थांकडून फॅशन डिझाइन कोर्सेस ऑफर करतात. ऑनलाईन कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर हा अभ्यासक्रमाचा कालावधी साधारण काही आठवडे किंवा काही महिन्यांचा असू शकतो. या कालावधीत व्हिडीओच्या माध्यामातून प्रशिक्षण, परस्पर असाइनमेंट आणि डाउनलोड करण्यायोग्य संसाधने विद्यार्थ्यांना दिली जातात. तसेच काही संस्थांमध्ये यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राचा विद्यार्थ्यांना भविष्यात चांगला फायदा होतो.

बऱ्याच ऑनलाइन कोर्सेससला प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या स्पीडचे इंटरनेट आणि काही डिझाइन सॉफ्टवेअरसह संगणकाची आवश्यक असते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शाश्वत फॅशन, डिजिटल डिझाइन टूल्स (Adobe Illustrator, CLO 3D) किंवा फॅशन मार्केटिंग आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणऱ्या अभ्यासक्रमाचा सुद्धा समावेश असतो.

शुल्क किती आकारले जाते | Fashion Designer Course Fees

भारतातील फॅशन डिझाईन कोर्सची फी प्रामुख्याने संस्था, कोर्सचा प्रकार आणि कालावधी यानुसार वेगवेगळी असु शकते. जे विद्यार्थी डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना साधारण 50 हजार ते 2 लाख रुपयां पर्यंत शुल्क आकरले जाऊ शकते. तसेत B.Des किंवा B.F.Tech सारख्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रेवश घेण्यााठी 2 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत फी असून शकते. फॅशन मॅनेजमेंटमधील M.Des किंवा MBA सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क हे 1 लाख ते 4 लाख रुपयां पर्यंत असू शकते. याच बरोबर NIFT, Pearl Academy आणि Symbiosis सारख्या नामांकित संस्थांमध्ये अवाढव्य शुल्क आकारले जाते. मात्र, भारत सरकारच्या माध्यामातून उभारण्यात आलेल्या सरकारी संस्थांमध्ये याच अभ्यासक्रमांसाठी साधारण 5 हजार ते 50 हजार रुपये इतके शुल्क आकरले जाऊ शकते. त्याच बरोबर विविध शिष्यवृत्तीच्या माध्यमातूनही तुम्ही या कोर्सला प्रवेश घेऊ शकता.

फॅशन डिझायनर्सची नियुक्ती करणाऱ्या काही नामांकित संस्था

Anita Dongre, Manish Malhotra, Ritu Kumar

फॅशन डिझायनर्सची नियुक्ती करणाऱ्या भारतातील प्रमुख कंपन्यांमध्ये रेमंड, आदित्य बिर्ला ग्रुप (Allen Solly, Van Heusen), फॅबइंडिया, शॉपर्स स्टॉप, पँटालून (Future Group), रिलायन्स ट्रेंड्स आणि मिंत्रा यांचा समावेश आहे. या नामांकित कंपन्यांव्यतिरिक्त काही प्रतिष्ठित फॅशन डिझायनर्स सुद्धा नवीन फॅशन डिझायनर्सला संधी देतात. यामध्ये प्रामुख्याने सब्यसाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा, रितू कुमार, तरुण तहीलाणी आणि अनिता डोंगरे यांचा समावेश आहे. त्याच बरोबर Flipkart आणि Amazon Fashion सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म देखील तरुण फॅशन डिझायनर्सला संधी देता.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment