मुलींनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? After 10th Courses List For Girls

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. चुल आणि मुल एवढ्यावर मर्यादीत न राहता मोठमोठी स्वप्न पाहण्यास मुलींनी सुरुवात केली आणि ती स्वप्न सत्यात उतरवली. परंतु यासाठी गरज आहे ती योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळेच इयत्ता 10वी नंतर मुलींना भविष्यात काय संधी आहे. तसेच करिअरचे काय पर्याय आहेत याची सविस्तर माहिती मुलींना व्हावी यासाठी हा ब्लॉग लिहीण्यात आला आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

काही दिवसांपूर्वी इयत्ता 10वी चा निकाल जाहीर झाला. या निकालात सुद्धा दरवर्षी प्रमाणे मुलींनी बाजी मारली. शैक्षणिक, क्रिडा तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी आपल्या बुद्धीच्या जोरावर वर्चस्व निर्माण केले आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मुलींना आपल्या करिअरच्या कक्षा उंचावण्यात यश आले आहे. पण आजही समाजामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचीत ठेवल्याचा घटना ग्रामीण भागांमध्ये घडत आहे. तसेच मार्गदर्शना अभावी पारंपारीक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे रस्ता भरकटण्याची शक्यता निर्माण होते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर फक्त मुलींसाठी असे काही कोर्स आहेत, ज्यामुळे मुलींना भविष्यामध्ये चांगले करिअर घडवण्यासाठी त्याचा फायदा होईल.

After 10th courses list for girl

10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर विविध डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसच्या माध्यामातून मुलींना आपला आवडता कोर्स निवडता येणार आहे. प्रत्येक कोर्सची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेऊ.

Diploma Courses for girl’s After 10th

Diploma in Computer Science (डिप्लोमा इन कंप्युटर सायन्स)

Computer Science हा एक व्यावसायिक डिप्लोमा कोर्स आहे. संगणक आणि सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये या क्षेत्रातील कलाकुशल उमेदवारांना मोठी मागणी आहे. Computer Science मध्ये आवश्यक असलेली प्रोग्रामिंग भाषेची सखोल माहिती या कोर्समध्ये उमेदवारांना दिली जाते. प्रामुख्याने एक ते तीन वर्ष हा कोर्सचा कालावधी आहे. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थीनींसाठी Computer Science मधील डिप्लोमा पूर्ण करून सॉफ्टवेअर आणि हार्डिवेअर उद्योगांमध्ये काम करण्याची संधी निर्माण होते.

पात्रता – Diplome in Compute Science ला प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थीनीने 45 ते 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण केले असावी.

Diploma in computer science करण्यासाठी अव्वल दर्जाच्या संस्था

Government Polytechnic, Nashik
Government Polytechnic, Pune
PSG Polytechnic College, Coimbatore
Government Polytechnic, Lucknow

Diploma in Graphic Design(डिप्लोमा इन ग्राफिक डिझाइन)

आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देणारे अनेक कोर्सेस विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. अशाच कोर्स पैकी एक कोर्स म्हणजे Diploma in Graphic Design. Digital Media, Video Editing, 2D Design त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी फोटोग्राफी सारखी कौशल्य विकसीत करण्यासाठी हा कोर्स फायदेशीर ठरणार आहे. ज्या मुलींना ग्राफिक डिझाईनची आवड आहे अशा मुलींनी 10 वी झाल्यानंतर ग्राफीक डिझाईनमध्ये डिप्लोमा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर Game Development, Design Studio आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी निर्माण होते.

पात्रता आणि कोर्सचा कालावधी – Diploma in Graphic Design ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीनीने 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच या कोर्सचा कालावधी चार महिने ते एक वर्ष इतका असतो.

Top Colleges

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, मुंबई
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

Diploma in Home Science (डिप्लोमा इन होम सायन्स)

Home Science म्हणजे घर, कुटुंब, राहणिमान आणि मालमत्ता या घटकांशी संबंधित सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास. हा अभ्यासक्रम करण्यासाठी संबंधित विद्यार्थी कल्पक, घरगुती कामांची आवड असणारा तसेच नियोजन करण्यामध्ये सक्षम असणे गरजेचे आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये अन्न प्रक्रिया आणि संरक्षण विभागात काम करण्याची संधी निर्माण होते. त्याचबरोबर फुड कॅटरींग विभागांमध्ये सुद्धा करिअरची दार खूली होतात. ज्या मुलींना घरगुती कामांची आवड अशा मुलींसाठी 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर Home Science मध्ये डिप्लोमा करण्याची चांगली संधी आहे.

पात्रता आणि कालावधी – Home Science ला प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. या कोर्सच्या कालावधीचा विचार केला तर Home Science करण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो.

Top Colleges

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, मुंबई
इंदिरा गांधी पॉलिटेक्निक फॉर वुमन, नवी दिल्ली
दयालबाग शैक्षणिक संस्था, आग्रा
महिलांसाठी सावित्री पॉलिटेक्निक, फरिदाबाद

Diploma in Nursing care Assistant (डिप्लोमा इन नर्सिंग केअर असिस्टंट)

ज्या विद्यार्थीनींना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थीनींनी नर्सिंग केअर असिस्टंट या क्षेत्रामध्ये डिप्लोमा करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने Community Diseases, Medical-Surgical Operations आणि नर्सिंगच्या मुलभूत गोष्टी शिकवल्या जातात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय, प्रशासकीय, आरोग्य आणि शैक्षणिक संस्थांमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थीनींना करिअर करण्याची संधी निर्माण होते.

Diploma in Architectural Engineering (डिप्लोमा इन आर्किटेक्चर इजिनीअरिंग)

करिअरच्या दृष्टीने Architectural Engineering हा मुलींसाठी एक चांगला डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थांना आर्किटेक्चरमध्ये आवश्यक असणारे विविध पैलू शिकवण्यास मदत करतो. या कोर्समध्ये व्यावसायिक तसेर रेसिडेन्शल इमारतींसहित सर्व प्रकारच्या इमारतींचे डिझाइन, नियोजन, अंमलबजावणी आणि बांधकाम कशा पद्धतीने करायचं याचा सखोल अभ्यास शिकवला जातो. तसेच अंतर्गत आणि बाह्य डिझाइनिंग कशा पद्धतीने केली पाहिजे हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवले जाते. Architectural Engineering चे सखोल ज्ञान या कोर्समध्ये विद्यार्थानींना दिले जाते. त्यामुळेच हा कोर्स यशस्विरीत्या पूर्ण केल्यानंतर करिअरच्या संधी देशात तसेच परदेशात निर्माण होतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्या नवीन विचारांच्या शोधात असतात. प्रामुख्याने या कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा असतो.

Management Courses (व्यवस्थापन अभ्यासक्रम)

एका सर्व्हेनुसार 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुली या Management Course ला प्रवेश घेण्यास पसंती देस असल्याचे समोर आले आहे. 6 ते 12 महिने या कोर्सचा कालावधी असल्यामुळे कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांना Management Course बद्दल सखोल माहिती मिळते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पार्ट्या, गेट टुगेदर, कार्यक्रम अशा गोष्टींमध्ये आवश्यक असणारे व्यवस्थापन कसे करावे हे शिकवले जाते. त्यामुळे या कोर्सला मुलीं व्यतिरिक्त मुल सुद्धा मोठ्या संख्येने प्रवेश घेताना दिसता आहेत.

Yoga Instructor (योग प्रशिक्षक)

शहरी भागांमध्ये वाढते प्रदुषण आणि बैठ काम करण्याच्या पद्धतीमुळे तरुण मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्याकडे तरुण तसेच वयस्कर व्यक्तींचा सुद्धा झुकता कल असल्याचे चित्र आहे. वयस्कर व्यक्ती प्रामुख्याने योगा करण्याकडे जास्त भर देत आहेेत. त्यामुळे योगा प्रशिक्षणार्थींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढ आहेत.

10 वी नंतर Yoga Instructor हा मुलींसाठी एक सर्वोत्तम करिअर पर्यायापैकी एक आहे. या कोर्समध्ये विविध प्रकराची आसने, ध्यान तंत्र, शरीरविज्ञान आणि मानसिक आरोग्याचे सखोल ज्ञान शिकवले जाते. या कोर्सचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षक बनून एक चांगला व्यवसाय उभा करता येईल.

https://marathichowkvishesh.com/list-of-courses-after-10th-commerce-science-and-arts/

Fine Arts (ललित कला)

कलेची आवड असणाऱ्या मुलींनी Fine Arts हा एक वर्षांचा डिप्लोमा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. या कोर्समध्ये Fine Arts मध्ये आवश्यक असणारी अनेक कौशल्य शिकवली जातात, जसे की पेंटींग, स्केचिंग, डिझायनिंग इ. सारख्या घटकांचा यामध्ये समावेश असतो. ज्या विद्यार्थ्यांना कला आणि हस्तकलेची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांना आवर्जून या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे.

Leave a comment