Aniket Verma biography – वयाच्या तिसऱ्या वर्षी आई गमावली, कर्ज काढून काकांनी घडवलं; आज IPL मध्ये गाजतोय!

Who is Aniket Verma?
Aniket Verma हा भारतीय टी-20 क्रिकेटमधील एक उदयोन्मुख आणि स्फोटक फलंदाज म्हणून वेगाने पुढे येत आहे. Sunrisers Hyderabad कडून खेळताना RCB विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या दमदार फिनिशिंग क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Royal Challengers Bengaluru विरुद्ध त्याने अवघ्या 18 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी करत संघाला 200 पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अनिकेत वर्माचा धमाका क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा होता. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. संघर्षातून पुढे आलेला हा पठ्ठ्या सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्याच्या संघर्षाची चर्चा होतीये. आईच छत्र हरवल्यानंतर काकांनी वडिलांप्रमाणे जीव लावला आणि अनिकेत वर्मानं काकांच्या कष्टाचं चीज केलं. 
Early Life and Struggles | झाशी ते क्रिकेटर 

अनिकेतचा जन्म उत्तर प्रदेशातील झाशी येथे झाला, पण त्याचा क्रिकेट प्रवास मध्य प्रदेशातून घडला. लहानपणापासूनच त्याचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. तो अवघा तीन वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. या कठीण परिस्थितीत त्याच्या काकांनी त्याला आधार देत मोठं केलं आणि क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न जपलं.

Cricket Journey | क्रिकेटचा कसून सराव

लहान वयातच अनिकेतने मैदानावर स्वतःला झोकून दिलं. दररोज 8-10 तास सराव करत त्याने आपली कौशल्ये विकसित केली. भोपालमध्ये कोच नंदजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळाला योग्य दिशा मिळाली.

Domestic Career & Stats | देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मध्य प्रदेशकडून खेळतो. सुरुवातीला कमी संधी मिळाल्या, पण त्याने 25 टी-20 सामन्यांमध्ये 164.81 च्या स्ट्राइक रेटने 356 धावा करत आपली क्षमता सिद्ध केली.

Breakthrough in MPL & IPL Journey 

मध्य प्रदेश प्रीमियर लीग 2024 मध्ये Bhopal Leopards कडून खेळताना त्याने 5 डावांत 244 धावा (SR 205) करत मोठा प्रभाव पाडला. याच कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल 2025 मध्ये 30 लाख रुपयांत खरेदी केले.

IPL 2026 Performance | पहिलाच सामना अन्…

आयपीएल 2026 मध्ये त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने संघासाठी महत्त्वाचा फिनिशर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दबावाखाली शांत राहून मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता त्याला वेगळं बनवते.

Inspiration & Future | टीम इंडियाचा उगवता सितारा

संघर्षातून उभा राहिलेला अनिकेत वर्मा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. त्याची कहाणी ही मेहनत, जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यासाची खरी प्रेरणादायी गाथा आहे.

(Aniket Verma, IPL 2026, SRH, Sunrisers Hyderabad, Indian cricketer, cricket biography, T20 player, IPL rising star, cricket success story, Jhansi cricketer)

error: Content is protected !!