Sakib Hussain Biography – जिया हो बिहार के लाला! राजस्थानची पळता भुई थोडी करणारा 21 वर्षांचा साकिब हुसैन आहे तरी कोण?

IPL चा रणसंग्रामा म्हणजे जुन्या दिग्गज खेळाडूंसह नवीन ताऱ्यांच्या उगमाचा महोत्सव. दरवर्षी नवे तारे स्पर्धेमध्ये चमकदार कागमगिरी करून जागतिक क्रिकेटच लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. असाच एक तरुण तडफदार खेळाडू म्हणजे 21 वर्षीय साबिब हुसैन (Sakib Hussain Biography). सोमवारचा (13 एप्रिल 2026) दिवस त्याच्यासाठी स्वप्नवत ठरला. आयपीएलमध्ये हैदराबादकडून त्याने पदार्पण केलं आणि पहिल्या सामन्यात राजस्थान सारख्या … Read more

Wai News – न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या यशदाची गरूड झेप; रौप्य जिंकले आता चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधीत्व

नाशिक येथे दि. 28 ते 30 मार्च 2026 दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत वाई (Wai News) तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावच्या यशदा मेघा वाडकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय जम्प रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशन तसेच नाशिक जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी … Read more

Aniket Verma biography – वयाच्या तिसऱ्या वर्षी आई गमावली, कर्ज काढून काकांनी घडवलं; आज IPL मध्ये गाजतोय!

Who is Aniket Verma? Aniket Verma हा भारतीय टी-20 क्रिकेटमधील एक उदयोन्मुख आणि स्फोटक फलंदाज म्हणून वेगाने पुढे येत आहे. Sunrisers Hyderabad कडून खेळताना RCB विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या दमदार फिनिशिंग क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Royal Challengers Bengaluru विरुद्ध त्याने अवघ्या 18 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी करत संघाला 200 पार नेण्यात … Read more

Maharashtra Kesari 2026 – महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात दिग्गजांचा जलवा; जखमी सिकंदरचा झंझावाती इशारा!

‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari 2026) स्पर्धेच्या आखाड्यात दुसऱ्या फेरीत माजी विजेत्यांनी आपला दबदबा ठळकपणे दाखवून दिला. हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील, सिकंदर शेख, शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दिग्गज मल्लांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत सहज पुढची फेरी गाठली. पाचही मल्ल पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरण्याच्या निर्धाराने मैदानात उतरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. गादी विभागातही … Read more

IPL 2026 – थाला पुन्हा राडा करणार! निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

आयपीएलमधील सर्वता यशस्वी कर्णधार आणि चाहत्यांच्या गळ्यातील ताईत महेंद्र सिंग धोनी IPL 2026 च्या हंगामात खेळणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली असून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के विश्वनाथन यांनी सांगितले की, ४४ वर्षीय धोनी आगामी हंगामातील सर्व सामने खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनी केवळ काही सामने … Read more

लेख – एक गाव – एक संघ! अंतिम फेऱ्यांचा बादशाह वयगांव; सलग 8 स्पर्धांमध्ये विजयी गुलाल

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< “आमची ऐकी हेच आमचं बळ” ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक वयगांवकराच्या मनात बसलेली भावना आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये राहून, वेगवेगळ्या भागात नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असूनही जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून मुलं एकत्र येतात आणि वयगांवचा झेंडा उंचावण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरतात. या एकीमुळेच आज वयगांव संघ … Read more

Tennis Cricket News – जन्नी कुंभळजाई चषक 2026 दिमाखात; वयगांव 11 चा विजयी जल्लोष, बोरगाव बुद्रुक उपविजेता

जगदंब स्पोर्ट्स, जोर आणि ग्रामस्थ मंडळ जोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जन्नी कुंभळजाई चषक जोर-२०२६ ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा (Tennis Cricket News) नवी मुंबईतील घणसोली येथे उत्साह, जल्लोष आणि क्रीडामय वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या निमित्ताने जोर परिसरातील तसेच बाहेरील अनेक संघ एकत्र आले आणि प्रेक्षकांना थरारक सामने पाहायला मिळाले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट संघभावना, शिस्तबद्ध … Read more

Wai News – मुंबईत अवतरणार बोरगांव! क्रिकेटच्या मैदानावर गावपणाचा जिव्हाळा; ‘बोरगांव प्रीमियर लीग पर्व 3’चा रणसंग्राम

धावपळीच्या, स्वप्नांच्या आणि संघर्षांच्या या जगात शिक्षणामुळे किंवा कामानिमित्त गावापासून लांब शहरांमध्ये येऊन रहाव लागतं. गाव दुरावलं असलं तरी मुंबई-पुण्यात राहूनही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपलं गाव (Wai News) सतत आठवत असतं. ती गावाप्रती असणारी ओढ कधी कमी होत नाही. पण जेव्हा मुंबईसारख्या महानगरात संपूर्ण गाव एकत्र येतं, तेव्हा काही काळासाठी मनातली मुंबई नाहीशी होते आणि … Read more

सामना पाहायला आला आणि नशीब फळफळलं; एका हातात झेल घेताच चाहता झाला कोट्याधीश! पाहा Video

स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो. टी20 क्रिकेटची फटकेबाजी स्टेडियममध्ये जाऊन अनुभवण्यासाठी चाहत्यांची लगबग पाहायला मिळते. असाच उत्साह SA T20 लीगमध्ये पाहायला मिळत आहे. एमआय कॅपटाऊन आणि डर्बन सुपय जायंट्स हा सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता एका झेलमुळे कोट्याधीश झाला आहे. जवळपास 1.8 कोटी … Read more

IPL 2026 – बारामुल्लाच्या डेल स्टेनला खरेदी करण्यासाठी बोलीयुद्ध! पठ्ठ्या लखपती नव्हे करोडपती झाला, ‘या’ संघाने मारली बाजी

IPL 2026 ची मिनी लिलाव प्रक्रिया अबु धाबीमध्ये सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर तगडी बोली लावली जात आहे. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आणि बारामुल्लाचा डेल स्टेन म्हणून प्रचलित असणारा औकिब दार याला लॉटरी लागली आहे. 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजपासून बोली सुरू झाली आणि दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी त्याला … Read more

error: Content is protected !!