अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ सोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता महामंडळाच्या (Annasaheb Patil Economically Backward Development Corporation ) विविध योजनांचा लाभ CSC केंद्रामध्ये घेता येणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आणि CSC सोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या या सामंजस्य करारानुसार, संबंधित लाभार्थी हा त्याच्या जवळ असलेल्या कोणत्याही CSC केंद्रावर जाऊन योजनेची माहिती घेऊ शकतो किंवा ऑनलाईन अर्ज भरू शकतो. CSC केंद्रावर संबंधित लाभार्थ्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची सुद्धा सविस्तर माहिती घेता येणार आहे. कागदपत्रांपासून ते पात्रतेपर्यंतची सर्व माहिती तुम्हाला CSC केंद्रावर मिळू शकणार आहे. या सामंजस्य करारावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजसिंह देशमुख आणि CSC केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या कराराचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सुद्धा स्वागत केले आहे.
PM-KMY – शेतकऱ्यांना मिळणार 36 हजारांची पेन्शन! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर…
70 रुपये शुल्क आकारले जाणार
तुमच्या गावाच्या जवळ असणाऱ्या CSC केंद्रामध्ये तुम्हाला महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यानुसार पात्रता प्रमाणपत्र (LOI) निर्माण करण्यासाठी, बँक कर्ज मंजूरीची कागदपत्रे अपलोड करण्यासाठई आणि बँकेत हफ्ता भरल्यानंतर Bank Statment अपलोड करण्यासाठी प्रत्येकी 70 रू. शुल्क आकारले जाणार आहे. ही सेवा राज्यातील सर्व CSC केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. सध्या राज्या 72,000 हून अधिक सीएससी केंद्र कार्यरत आहेत.
(सोर्स – महास्वयम)