Artificial Intelligence Course (AI) हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल. टीव्हीवर, मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर सर्वत्र सध्या AI ची चर्चा रंगताना पहायला मिळते. परंतु बऱ्याच जणांना कुत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाचं काम हलकं करणारं यंत्र आहे, असे वाटते. यामुळे जरी मानवाचं काम हलकं झालं असलं, तरी त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे कौशल्यपूर्ण काम करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात सध्या कंपन्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये वर्तमानात आणि भविष्यात चांगली संधी विद्यार्थ्यांना आहे. जगभरात AI मध्ये प्राविण्य मिळवलेल्या कुशल उमेदवारांच्या शोधात कंपन्या आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? what is artificial intelligence in Marathi
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्तेवर आधारित काम करणारे यंत्र किंवा संगणक. म्हणजेच मानवासारखी बुद्धिमत्ता असलेले यंत्र किंवा सॉफ्टवेअर होय. AI मध्ये प्रामुख्याने शिक्षण, तर्कशक्तीचा वापर करणे आणि भाषा ओळखून समस्येचे निराकरण करण्याची क्षमता असते. सध्या AI मुळे कामाचा भार थोड्या प्रमाणात का होईना हलका झाला आहे. त्यामुळे वर्तमानाचा विचार केला तर व्यवसाय, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र तसेच दैनंदिन जीवनातील कामांवर सुद्धा AI चा प्रभाव आपल्याला दिसून येतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कामामध्ये सुलभता आणि आधुनिकता आली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये त्याला वापर होऊ लागला आहे. यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्ता दोन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे. पहिल्या प्रकार हा सर्व सामान्य माणसांच्या हिताचा आहे. म्हणजेच या प्रकारामध्ये सामान्य माणूस, मुले, विद्यार्थी यांचा समावेश करावा लागेल. कारण या प्रकारात AI च्या मदतीने जगभरातील कोणत्याही भाषेचा अनुवाद आपल्याला हव्या त्या भाषेमध्ये करता येतो. लहान मुले तसेच तरुणांना विविध खेळांची प्रॅक्टीस करण्यासाठी सुद्धा AI ची मदत घेता येते. बुद्धीबळ सारखे खेळ खेळण्याचा सराव करण्यासाठी AI हे एक उत्तम माध्यम आहे. तसेच चेहरा ओळखणे यासारख्या गोष्टी सुद्धा AI च्या मदतीने करणे शक्य झाले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुसऱ्या प्रकारात प्रामुख्याने रोबोट्स सारख्या तंत्रज्ञानाच समावेश आहे. AI च्या मदतीने यंत्राची निर्मीती करून हे यंत्र मानवासारखे विचार करू शकते, निर्णय घेऊ शकते तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे सुद्धा देऊ शकते. प्रामुख्याने मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये मानवाच्या जागी AI यंत्रांचा वापर केला जात आहे. उदा. काही महिन्यांपूर्वी हैदराबाद मधील एका कंपनीने Made In India रोबोट लॉँच केला होता. केरळमधील एका शाळेमध्ये ‘Iris’ नावाची AI रोबोट शिक्षिका विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. ही दोन्हीही उदाहरणं भारतातील आहेत. यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा कशाप्रकारे विकास झाला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता का महत्त्वाची आहे? Why Artificial Intelligence is Important
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आजच्या आधुनिक जगात विविध कारणांमुळे महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये कामाची कार्यक्षमता वाढली आहे. त्याचबरोबर मानवाच्या जीवनात AI मुळे अनेक सोयीस्कर बदल झाले आहेत. बऱ्याच गोष्टी या सहज आणि सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे ज्याला AI तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येतो, त्याच्या काम करण्याच्या किंवा एखादे उत्पादन ऑनलाईन शोधायचे असेल तर त्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगभरातील अनेक प्रक्रिया या Automatic झाल्या आहेत. त्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतील या प्रगतीमुळे वेळेची आणि मानवाच्या श्रमाची मोठी बचत होण्यास मदत होत आहे. ज्याची उदाहरणे आपण वरती पाहिली. केरळमध्ये AI महिला शिक्षक आणि हैदराबादच्या एका कंपनीमध्यो रोबेट्सची निर्मीती. यामुळे काम करण्याची पद्धत वेगवान होण्यास मदत होते.
ज्या प्रकारे महिला रोबोट विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देते. त्यावरून अंदाज लावा की, AI सिस्टम किती मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करू शकते आणि त्याचे योग्य निर्णयामध्ये रुपांतरण करू शकते. या सर्व गोष्टी AI च्या मदतीने जरी होत असल्या तरीही हे सर्व शक्य झालंय ते मानवाच्या बुद्धिमत्तेमुळेच. त्यामुळेच याचा वापर करण्याची कला सुद्धा संबंधित व्यक्तिला असली पाहिजे. यासाठीच कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तिला मोठी मागणी आहे. कारण व्यवसाय, आरोग्य, वित्तीय सेवा, बँकिंग क्षेत्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये जलद, अचूक आणि कंपनीच्या हिताचा निर्णय घेण्याचे काम AI च्या मदतीने करणे शक्य होते.
बऱ्याच वेळा चुकीच्या निर्णयामुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा कंपनीला मोठे नुकसान होते. पंरतु AI ची मदत घेऊन हे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच ऑनलाईन खरेदी करताना AI च्या मदतीने आपल्या आवडीचे प्रोडक्ट शोधणे सुद्धा सोपे झाले आहे. आपल्या पसंती क्रमानुसार अनेक उत्पादने आपल्याला ऑनलाईन पाहता येतात. अलिकडे AI तंत्रज्ञानाचा वापर संशोधनात सुद्धा होऊ लागला आहे. वैद्यकीय संशोधनात नवीन उपचार पद्धती शोधणे किंवा अंतराळ संशोधनासाठी AI ची मदत घेतली जात आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवनात चांगले बदल होण्यास सुरुवात झाली आहे. याचे काही धोके सुद्धा आहेत. परंतु आपल्याला कला कुशल, कार्यक्षम होण्यासाठी AI वर आधारित अभ्यासक्रम आणि त्याचा वापर करण्याची पद्धत शिकणे काळाची गरज आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी शैक्षणिक पात्रता | Artificial Intelligence course eligibility
कृत्रिम बुद्धितमा (AI) शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे इयत्ता 12 वी नंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. तसेत जर एखाद्या विद्यार्थ्याला पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश घ्यायता असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्राविण्य मिळवण्याची संधी आहे.
12 वी नंतर AI या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांने 12 विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. त्याबरोबर PCM विषयांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे. PCM म्हणजे Physics, Chemistry And Mathematics हे विषय अभ्यासक्रमामध्ये असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्याला गणित या विषयाचं सखोल ज्ञान असावं. जसे की, Algebra, Calculus And Probability Theory याची ज्ञान असले पाहिजे. हे सर्व महत्वाचे निकष पूर्ण केल्यानंतर प्रवेशाचा महत्वाचा टप्पा सुरू होतो. त्यासाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांच्या माध्यमातून केले जाते. प्रामुख्याने JEE Mains आणि VITEE या प्रसिद्ध प्रवेश परीक्षा आहेत.
12 वी नंतर पुढील प्रवेश परीक्षा या देशभरात प्रसिद्ध असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या प्रवेश परीक्षांना दरवर्षी बसतात. राष्ट्रीय स्तरावर JEE Main आणि JEE Advanced तसेच राज्य स्तरावर AP EAMCET आणि KEAM या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.
ज्या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण झाल्यानंतर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदवी पूर्ण केलेली असावी. विशेष म्हणजे विद्यार्थ्याने Computer Science, Mathematics, Engineering अशा फिल्डमधून आपले पदवीचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केलेले असावे. त्याचबरोबर काही शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांची वेगळी नियमावली सुद्धा असू शकते. या नियमावलीमध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, Machine Learning या सारख्या विषयांचे मूलभूत ज्ञान असावं, अशी अट असू शकते. तसेच प्रवेश परीक्षा सुद्धा घेतल्या जातात. राष्ट्रीय स्तरावर GATE आणि राज्य स्तरावर AP PGECET या प्रवेश परीक्षा देशभरात प्रसिद्ध आहेत.
AI आणि करिअरच्या संधी | Career in Artificial Intelligence
तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय याची सखोल माहिती आता मिळाली असेल. तुम्ही नीट वाचलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्तमानात ज्या प्रकारे सर्व क्षेत्रांमध्ये ट्रेडिंग आहे. त्या प्रकारे भविष्यात सुद्धा ट्रेडिंगमधे असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत. तुम्ही यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील पदांवर काम करण्याची संधी तुमची वाट पाहत आहे. जसे की, AI Specialists, Machine Learning Engineers आणि Data Scientists या प्रोफाईलवर काम करणाऱ्या उमेदवारांची कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या जॉब प्रोफाईल व्यतिरिक्त Software Engineer, AI Engineer या प्रोफाईलवर सुद्धा कौशल्यपूर्ण उमेदवारांची मागणी आहे.
ज्या प्रकारे जागतीक कंपन्यांमध्ये AI मध्ये प्राविण्य मिळवलेल्या उमेदवारांना मागणी आहे. त्याप्रमाणे मोठ मोठ्या कंपन्या सुद्धा कुशल उमेदवारांच्या शोधात आहेत. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने Amazon, Google, Reliance Jio, Facebook आणि Microsoft Corporation या जगातील बाप कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांची नावं पाहून पगार किती मिळणार यांचा अंदाज आता तुम्हीच लावा आणि ठरवा कोणती कंपनी निवडायची.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.