Marathi News – पोटच्या मुलींनी अपमान केला, बापाने थेट 4 कोटींची संपत्तीच केली मंदिरात दान

Marathi News

भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने पोटच्या मुलींना अपमान केला म्हणून आपली संपूर्ण 4 कोटी रुपयांची संपत्ती एका मंदिरात दान केली आहे. त्यांच्या या कृतीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. वडिलांच्या या निर्णयामुळे मुलींच्या पायाखालची जमीन सरकली असून संपत्ती परत मिळवण्यासाठी त्यांच्यात आता संघर्ष सुरू झाला आहे.

तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातीत निवृत्त लष्करी अधिकारी एस. विजयन हे पत्नीशी मतभेद झाल्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून एकटेच राहत आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून त्यांच्या मुली त्यांच्यावर संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण करत होत्या. तसेच त्यांचा वेळोवेळी अपमान करत होत्या. याच रागातून त्यांनी थेट आपली संपूर्ण 4 कोटी रुपयांची संपत्ती अरुलमिघू रेणुगंबल अम्मान या मंदिरातील दानपेटीत दान केली आहे. “माझ्या मुलींनी मी करत असलेल्या स्वत:च्या खर्चावरून मला टोमणे मारले. त्यामुळे आता मी ही मालमत्ता त्या देवीला सोपवत आहे जिने मला आयुष्यभर साथ दिली.” असे विजयन म्हणाले. तसेच मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याच सुद्धा ते म्हणाले आहेत. 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!