Dowry Death – 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार हुंड्यात दिली; छळ सहन झाला नाही, नवविवाहितेने वडिलांना शेवटचा मेसेज केला अन्…

पुण्यात वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने ज्या प्रकारे सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले (Dowry Death) होते. तशीच घटना आता पुन्हा घडली आहे. लग्नामध्ये हुंडा म्हणून 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार दिली, तरीही सासरच्या हैवानांनी वारंवार 27 वर्षीय रिधान्याचा छळ केला. अखेर तिला छळ सहन झाला नाही आणि तिने वडिलांना शेवटचा ऑडिओ मेसेज करत माफी मागितली आणि मृत्यूला कवटाळलं.

तामिळनाडूतील तिरुप्पुरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सारा देश पुन्हा एकदा हादरून गेला आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात रिधान्याचे कविनकुमारसोबत लग्न झालं होतं. लग्नाच भरमसाट हुंडा देण्यात आला होता. एवढं करूनही सासरची मंडळी तिचा छळ करत होते. आणि हा छळ तिला असह्य झाला, ती मानसिक दबावाखाली गेली. रविवारी (29 जून 2025) ती मंदिरात जाते असं सांगून घराबाहेर पडली आणि वाटेतच तीने विषारी औषध प्राशन केलं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने वडिलांना व्हॉट्सअॅपर ऑडिओ मेसेज पाठवला आणि त्यांची माफी मागितली.

मला रोजचा मानसिक त्रास सहन होत नाही. हे मी कोणाला सांगावे हेही मला कळत नाही. ज्याला सांगाव, तर ते मला तडजोड करण्यास सांगत आहेत. आयुष्य असंच असत असं सांगतात. त्यांना माझं दु:ख समजत नाही, असे रिधान्याने वडिलांना पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटलं आहे.

51 तोळे सोनं, फॉरच्युनर… तरीही कमीच पडलं; Vaishnavi Hagawane प्रकरण आणि हुंड्याचा कधीही न संपणारा शाप, याला जबाबदार कोण?


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!