अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 9 सप्टेंबर पासून Asia Cup 2025 चा धमाका सुरू होणार आहे. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. 17 वी आशिया कप स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (UAE) खेळली जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताच ‘ऑपरेशन सिंदूर’ त्यामुळे भारत-पाकिस्तान संघर्ष चिघळलेला आहे. अशातच आशिया चषकामध्ये दोन्ही देश एकमेकांना भिडणार आहेत. अनेक माजी खेळाडूंनी भारताने हा सामना खेळू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे दोन्ही देशांसह जगाचं लक्ष लागलं आहे.
यंदाचा आशिय चषक टी-20 स्वरुपात खेळला जाणार असून 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आली असून भारत, ओमान, UAE आणि पाकिस्तान हे ग्रुप A मध्ये आहेत. तर बांग्लादेश, श्रीलंका, अफागाणिस्तान आणि हाँगकाँग हे चार संघ ग्रुप B मध्ये आहेत.
साखळी फेरीचे वेळापत्रक (सर्व सामने रात्री 8 वाजता खेळले जाणार आहेत)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान Vs हाँककाँग, अबू धाबी
10 सप्टेंबर – भारत Vs UAE, दुबई
11 सप्टेंबर – बांग्लादेश Vs हाँगकाँक, दुबई
12 सप्टेंबर – पाकिस्तान Vs ओमान, दुबई
13 सप्टेंबर – श्रीलंका Vs बांग्लादेश, अबू धाबी
14 सप्टेंबर – भारत Vs पाकिस्तान, दुबई
15 सप्टेंबर – श्रीलंका Vs हाँगकाँग, दुबई (सायं. 5.30 वाजता)
15 सप्टेंबर – UAE Vs ओमान, अबू धाबी (सायं. 5.30 वाजता)
16 सप्टेंबर – बांग्लादेश Vs अफगाणिस्तान, अबू धाबी
17 सप्टेंबर – पाकिस्तान Vs UAE, दुबई
18 सप्टेंबर – श्रीलंका Vs अफगाणिस्तान, दुबई
19 सप्टेंबर – भारत Vs ओमान, अबू धाबी
साखळी फेरी पार पडल्यानंतर सुफर फोरमध्ये होणारे सामने 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने सुद्धा रात्री 8 वाजता खेळले जातील. तर फायनलचा सामना 28 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता खेळला जाईल. भारतातल्या क्रिकेटवेड्या चाहत्यांना हे सर्व सामने सोनी स्पोर्ट्स आणि Sonylive Aap वर पाहता येणार आहेत.