Asia Cup 2025 – पाकड्यांचा फडशा पाडल्यानंतर सूर्यकुमार यादवने कोट्यवधी भारतीयांची मन जिंकली, भावना व्यक्त करताना म्हणाला…

Asia Cup 2025 मध्ये भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेटने फडशा पाडला आणि स्पर्धेतील आपला दुसरा विजय अगदी रुबाबात साजरा केला. पहिलं गोलंदाजांनी पाकड्यांना आपल्या तालावर नाचवलं आणि त्यानंतर फलंदाजांनी धुवून काढलं, त्यामुळे पाकिस्तानने दिलेल्या 128 धावांच्या माफक आव्हानाचा भारताने 7 गडी राखून पाठलाग केला आणि सामना जिंकला. विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हा ऐतिहासिक विजयावर भाष्य करताना कोट्यवधी भारतीयांची मन जिंकली.

सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या भावना व्यक्त केल्या. “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्ही आमची एकता व्यक्त करतो. आजचा विजय आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो ज्यांनी खूप शौर्य दाखवले. आशा आहे की ते आम्हाला सर्वांना प्रेरणा देत राहतील आणि जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांना आनंदी करण्याची संधी मिळेल तेव्हा त्यांना आनंदी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू ” असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.