हृदय पिळवटून टाकणारी घटना; डोक्याला चेंडू लागल्याने 17 वर्षीय युवा खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार सुरू झाला आहे. पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. याच दरम्यान एक दु:खद बातमी समोर आली असून नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना ऑस्ट्रेलियाच्या 17 वर्षीय युवा खेळाडू बेन ऑस्टिनचा (Ben Austin) डोक्याला चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे.

Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी (28 ऑक्टोबर 2025) 17 वर्षीय बेन ऑस्टिन नेटमध्ये हेल्मेट घालून नेटमध्ये बॉलिंग मशीनच्या मदतीने फलंदाजीचा सराव करत होता. याच दरम्यान वेगवान चेंडू त्यांच्या डोक्याला आणि मानेला लागला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, बुधवारी (29 ऑक्टोबर 2025) त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटसह सर्वच हादरून गेले आहेत. 10 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू फिलिप ह्यूजचा सुद्धा अशाच अपघातामुळे मृत्यू झाला होता. असाच मृत्यू आता 17 वर्षीय बेन ऑस्टिन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

<p