‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये (Bank Of Maharashtra Job) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिष्ठित बँकेत काम करून आपल्या करिअरच्या कक्षा उंचावण्याची संधी उमेदवारांना आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला आपल्या कामकाजाचा विस्तार आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक बळकट करायची आहे. यासाठी ‘रिक्रूटमेंट प्रोजेक्ट 2025-26 फेज II’ अंतर्गत विशेष अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये Scale II, III, IV, V आणि VI या स्तरांवरील विविध पदे भरली जाणार आहेत. पुढील पदांचा या भरती प्रक्रियेमध्ये समावेश आहे.
1) वित्तीय व्यवस्थापक – मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक
2) एकात्मिक जोखीम व्यवस्थापन – वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
3) विधी – वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
4) चार्टर्ड अकाउंटंट – वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
5) क्रेडिट – उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक
6) ट्रेजरी आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग – उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
7) माहिती व जनसंपर्क – सहायक महाव्यवस्थापक
8) आयटी, डिजिटल ट्रान्सर्फॉर्मेशन, स्ट्रॅटेजिक डेटा मॅनेजमेंट, आयएस ऑडिट, सीआयएसओ सेल – उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2025
अर्ज कुठे करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – Bank Of Maharashtra Job