BMC Election 2026 – वाई तालुक्यातील उळुंब गावच्या सूनबाई मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात

महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. वाई तालुक्यातील उळुंब गावच्या सूनबाई सौ. पुष्पा रमेश कळंबे या सुद्धा मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 39 मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

पुष्पा कळंबे यांनी ग्रामीण भागातून येऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवल्यामुळे उळुंब गावासह वाई तालुक्याचे लक्ष या प्रभागाकडे  लागून आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संधीचं सोने करण्यासाठी आणि आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. 

दिंडोशी विधानसभा क्षेत्रात येणारा प्रभाग क्रमांक 39 हा लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या प्रभागातील नागरी सुविधा, पायाभूत विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व वाहतूक यासारखे मुद्दे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. आगामी काळात प्रचाराचा वेग वाढण्याची शक्यता असून, प्रभागातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!