पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या दोघांचा मृत्यू, 12 जखमी

मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे (प्रमोद विठ्ठल वाघ) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोर चाललेल्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर दोन्ही ट्रक दुभाजक तोडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आले आणि समोरून येणाऱ्या एर्टिगा व टाटा अल्ट्रोझ … Read more

बलकवडीचे सुपुत्र अशोक लक्ष्मण जाधव : एका संयमी, मनमिळावू आणि लोकाभिमुख नेतृत्वाची मनाला चटका लावणारी एक्झिट

वाई तालुक्यातील बलकवडी गावचे सुपुत्र आणि आपल्या संयमी, मनमिळावू स्वभावाने समाजमनावर अधिराज्य गाजवणारे अशोक लक्ष्मण जाधव यांचे ११ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू होते. त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने केवळ जाधव … Read more

Wai News – आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; ‘दंगा काबू’ तालीम आणि शहरातून रुट मार्च

आगामी ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधन या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाई (Wai News) पोलिसांच्या वतीने सोमवारी (२४ ऑगस्ट) ‘दंगा काबू’ योजनेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) आणि भव्य रुट मार्च आयोजित करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०:३० ते १२:२० या वेळेत ही कारवाई करण्यात आली. सण-उत्सवाच्या काळात … Read more

Wai News – रुग्णांच्या जिवाशी खेळ! सडलेल्या अन् ‘एक्स्पायरी डेट’ पुसलेल्या गोळ्यांचे वाटप; FDA कडे तक्रार

वाई (Wai News) येथील नामांकित सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना बुरशी लागलेल्या, सडलेल्या आणि एक्स्पायरी डेट पुसलेल्या गोळ्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार दाखल करत दोषींवर कडक कारवाईची … Read more

Wai News – कष्टाचे चीज झाले! बलकवडीचा वेदांत संजय जाधव बनला ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट’

अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘सीएमए’ (CMA – Cost and Management Accountant) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या अंतिम फेरीत वाई (Wai News) तालुक्यातील बलकवडी गावच्या सुपुत्राने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. बलकवडी येथील रहिवासी वेदांत संजय जाधव याने ‘सीएमए फायनल’ (CMA Final) परीक्षा उत्तीर्ण होत हे उत्तुंग यश संपादन केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स … Read more

Crime News Marathi – प्रेमाखातर सोडला संसार, अन् नशिबी आला भयानक अंत; बेवारस बॅगमधील मृतदेहाने उडाली खळबळ!

पती आणि कुटुंबाला सोडून प्रियकरासोबत नवीन संसार थाटणाऱ्या एका विवाहितेचा अत्यंत निर्घृणपणे खून (Crime News Marathi) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दमन येथे एका बेवारस ट्रॉली बॅगमध्ये या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिहारमधील नवादा जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोह पोलीस … Read more

Wai News – बावधनचा ‘सोन्या’ हरपला…! हा नैसर्गिक मृत्यू की आपल्या निष्काळजीपणाचा बळी? काय सांगते विज्ञान?

वाई (Wai News) तालुक्यातील बावधन येथे बेंदूर सणाच्या उत्साहाला अचानक शोकाकुळाची किनार लाभली. गावातील मिरवणूक पूर्ण करून ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना, बावधन येथील प्रसिद्ध ‘छोटा सोन्या’ या मानाच्या जातिवंत खिल्लार बैलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला. शरद कदम, देवराज कदम आणि ग्रामपंचायत सदस्य सूरज (काका) कदम यांच्या कुटुंबाने 2015 मध्ये … Read more

Wai News – सर्वसामान्यांना ‘नो एंट्री’, दलालांना ‘रेड कार्पेट’! वाईच्या महसूल दरबारात मलिदा गँगचा सुळसुळाट

वाई (Wai News) तालुक्याच्या महसूल विभागात सध्या दलालांचे साम्राज्य निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड अडवणूक होत असल्याचे चित्र समोर आले आहे. जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांना महसूलमधील काही कर्मचाऱ्यांचेच थेट पाठबळ मिळत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. ‘पुढारी’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, महसूलच्या विविध कार्यालयांमध्ये एजंट आणि दलालांना ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात आहे, तर दुसरीकडे आपल्या … Read more

Wai News – महिनाभरापूर्वी बांधलेला पूल वाहून गेला! वाईत ‘कागदावरचं काम’ पावसात उघड!

महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच वाई (Wai News) शहरातील फुलेनगर परिसरात किवरा ओढ्यावर उभारण्यात आलेला पर्यायी पूल रविवारी दुपारी पावसाच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. सार्वजनिक निधीतून अवघ्या महिनाभरापूर्वी बांधलेला हा पूल इतक्या लवकर कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण … Read more

Satara News – मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय; पालकांची घरपट्टी होणार माफ!

सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांसमोर अस्तित्वाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा (Satara News) जिल्ह्यातील कालगाव ग्रामपंचायतीने मराठी शाळांचे संवर्धन करण्यासाठी आणि विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी एक अत्यंत क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जे पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश मराठी शाळेत करतील, अशा पालकांची घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा एकमुखी ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत … Read more

error: Content is protected !!