पुस्तकांना (Books For Women) माणसाच्या आयुष्यातील एक सच्चा मित्र म्हणून ओळखलं जातं. ज्या व्यक्ती दररोज न चुकचा पुस्तके वाचतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि सकारात्कमकतेचा भाव आपसूक पाहायला मिळतो. मोठं मोठे व्यावसायिक, समाजसेवक किंवा इतिहासकार सुद्धा पुस्तके वाचण्याचा सल्ला आवर्जून देतात. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात पुस्तके वाचण्यासाठी पुरेसा वेळ काही मिळत नाही. या सर्व धावपळीत ऑफीसमध्ये काम करून घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांची चांगलीच तारांबळ उडताना दिसून येते. मुंबई सारख्या शहरामध्ये रेल्वेचा धक्केमय प्रवास नकोसा वाटतो, परंतु आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी हे धक्के सहन करावे लागतात. या सर्व धावपळीत मानसिक शांतता सुद्धा तितकीच गरजेची असते. आणि अशावेळी मानसिक आधार देण्याच काम करतात ती पुस्तके.
ऑफीस, घरकाम आणि धावपळीचा प्रवास या सर्व गोष्टी सांभाळून दररोज एखाद्या पुस्तकाची पाच ते दहा पानं जरी वाचली तरी सकारात्मकतेच्या दिशेने तुमचा प्रवास नक्कीच सुरू होईल. त्यामुळे वाट पाहू नका खाली काही ठरावीक पुस्तकांची यादी दिली आहे. त्यातील कोणतंही एक पुस्तक खरेदी करा आणि वाचायला सुरुवात करा.
1) “सावित्रीबाई फुले चरित्र” – विविध लेखक
शिक्षणासाठी लढणाऱ्या पहिली भारतीय महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादाई आहे. त्यामुळे सावित्रिबाई फुले यांचा जीवनप्रवास प्रत्येक स्त्रीने वाचला पाहिजे.
प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासाची आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या प्रवासात लक्ष्मणाची पत्नी उर्मिला यांनी सुद्धा अयोध्येत एकांतवास भोगला. त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन या पुस्तकामध्ये केलं आहे. मी स्वत: हे पुस्तक वाचलं आहे तुम्ही सुद्धा आवर्जून वाचा.
3) “जिद्दीची कहाणी – अहिल्याबाई होळकर” – विविध लेखक
अहिल्याबाई होळकर यांचे जीवन, त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रशासन कौशल्याचा प्रेरक परिचय.
4) “आजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल” – सरश्री
महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक स्वावलंबन कसे साधावे यावर मार्गदर्शन करणारे पुस्तक.
5) “स्त्रीवाद आणि समाज परिवर्तन” – डॉ. वंदना महाजन
महिलांच्या समाजातील भूमिकेवर आधारित लेख संग्रह. शिक्षण, आरोग्य, नोकरी आणि नेतृत्व याबाबत सकारात्मक बदल घडवण्यासाठी विचार प्रवर्तक.
6) “आत्मविश्वासाची पायरी” – अंजली देशमुख
महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे मानसशास्त्रीय उपाय आणि प्रेरणादायी उदाहरणे.
7) “वुमन पॉवर, तिच्या कर्तृत्वाची सक्सेस स्टोरी” – संदीप रामराव काळे
समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या महिलांच्या वास्तव जीवनातील संघर्ष आणि यशाचे अनुभव.
8) “योगातून आरोग्य आणि रोगनिवारण” – डॉ. के. वि पानसे
महिलांसाठी शरीर आणि मन दोन्ही मजबूत ठेवण्यासाठी योग, आहार आणि मानसिक आरोग्य यावर व्यावहारिक मार्गदर्शन.
9) “महाराष्ट्रातील महिला उद्योजक” – प्रा. शैलजा सांगळे
महिलांनी व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेतील संधी ओळखून यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातील महिला उद्योजक.