Trending Marathi – पंक्चरच्या दुकानात भरली मुलांची शाळा, शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांचा अनोखा उपक्रम; पाहा Video

ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. तसेच शिक्षक सुद्धा ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये शिकवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. परंतू अशाही परिस्थितीत महाराष्ट्रात आजही असे काही शिक्षक आहेत, जे ग्रामीण भागांमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या परीने होतील त्या शक्य अशक्य अशा सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी करत आहेत. … Read more

Rajgad Fort News – संजीवनी माचीवरून तरुणी खोल दरीत पडली; हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाने केली सुखरूप सुटका

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला राजगड (Rajgad Fort News ) किल्ला विविध रानफुलांनी बहरून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर राजगडाचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे दुर्ग प्रेमींची पाऊले आपसूक गडाच्या दिशेने वळत आहेत. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही पर्यटक गडाला भेट देण्यासाठी येत आहेत. परंतू गडाची अपूरी माहिती आणि ट्रेकींग करण्याचा अपूरा … Read more

D B Patil International Airport Navi Mumbai – नवी मुंबईकरांच्या इतिहासातील सुवर्ण पान, माहिती वाचा आणि Photo पाहा

दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (D B Patil International Airport Navi Mumbai) आज (08-10-2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासह गोंधळ, दहीहंडी, लावणी, आदिवासी नृत्यू आणि आगरी-कोळी नृत्य सुमारे 60 कलाकार सादर करणार आहेत. जवळपास 50 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था या रंगारंग सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर या … Read more

Coldrif Syrup अजिबात घेऊ नका, 17 चिमुकल्यांचा मृत्यू; महाराष्ट्र FDA ने केले सावध

Coldrif Syrup या औषधामुळे किडनी खराब होऊन 17 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 14 आणि राजस्थानातील 3 मुलांचा या कोल्ड्रिफ सिरप औषधामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे SR-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप अजिबात वापरू नका, असा इशारा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिला आहे. कोल्ड्रिफ सिरप घेतल्यानंतर 17 मुलांचा मृत्यू … Read more

Rajiv Pratap Journalist – भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या स्वतंत्र पत्रकाराचा खून? काय खरं आणि काय खोटं, वाचा…

स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. मुकेश चंद्राकर यांची अशाच प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. आता पुन्हा एकदा स्वतंत्र पत्रकार राजीव प्रताप (Rajiv Pratap Journalist) यांचा मृतदेह हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस म्हणतायत की हा अपघात असू शकतो. मात्र, कुटुंबाने हा खून असल्याच दावा केला आहे. गेल्या काही … Read more

Tuloni Biya – मासिक पाळी येताच मुलीचं लग्न केळीच्या झाडाशी लावलं जातं; अनोखी परंपरा जपणार गावं

आपला भारत विविध भाषा आणि जाती धर्मांच्या लोकांनी नटलेला आहे. त्यामुळे भारतामध्ये अनेक परंपरा, उत्सव, रीतिरिवाज, चालीरिती यांचं मिश्रण पाहायला मिळत. सर्व जाती धर्मातील लोकं एकमेकांच्या उत्सवामध्ये आवर्जून सहभागी होतात. त्याचबरोबर सर्व समुदायांमध्ये काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यातल्या त्यात मासिक पाळी (menstruation) बद्दलचे काही गैरसमज आजही महिलांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरत असल्याच पाहायला मिळत … Read more

Diwali 2025 Maharashtra – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून भाऊबीज भेट, 40.61 कोटींचा निधी मंजूर

दिवाळीचे (Diwali 2025 Maharashtra) औचित्य साधत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तशी घोषणा केली असून 40.61 कोटींचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाची सुरुवात अंगणावडीमधून होते. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी … Read more

Surekha Yadav- आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक आणि सातारची लेक सुरेखा यादव निवृत्त होणार

आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक मराठमोळ्या सुरेखा यादव (Surekha Yadav) या 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. Central Railway ने आपल्या सोशल मीडियावर त्यांचे काही खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुरेखा यादव यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून कायम ओळखला जाईल, असही पोस्टमध्ये म्हटलं … Read more

Navratri 2025 – भक्तांसाठी ST महामंडळाची झकास योजना, साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन घेता येणार; जाणून घ्या सविस्तर

सोमवारी (22 सप्टेंबर 2025) नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांसह सर्वांचीच सध्या लगबग सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व देवींची मंदिरे भक्तांनी फुलून निघणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठ आहेत. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु वेळ आणि पैशांची गणित जुळवताना सामान्यांची तारांबळ उडते. यासाठीच आता … Read more

Court News – वकिलाच्या पुढाकाराने 12 वर्षांनी दाम्पत्य पुन्हा एकत्र, दगडुशेट गणपतीचं दर्शन घेत नवीन आयुष्याला सुरुवात

मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात वेगाने वाढ झाली आहे. अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आलं आहे. पुण्यातील एक दाम्पत्य सुद्धा या सर्व प्रक्रियेतून जात होतं. कमल आणि सुरेश (बदलेली नावे) यांच्यात मागील 12 वर्षांपासून न्यायालयीन (Court News) लढाई सुरू होती. अखेर वकिलांच्या एका वाक्यामुळे या … Read more