गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी, पाहा Photo
गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी. (सर्व फोटो – आयुष जाधव)
गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी. (सर्व फोटो – आयुष जाधव)
“कागदाच्या फुलांतून उमललेली भक्ती, बाप्पाच्या आरासीतून झळकते अनंत प्रीती” ही पर्यावरणपूरक आरास साकारलीये संस्कार शंकर जाधव यांनी. “शांततेत दडलेलं सौंदर्य, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज।” पालवे कुटुंबाचा लाडका गणराया “शुभ्रतेतली पावित्र्याची अनुभूती, गणरायाच्या सान्निध्यातील शांती।” पाटील कुटुंबाची सुंदर आणि सुबक मूर्ती. “पंढरपुराच्या भावभूमीत, संतांच्या सहवासात गणरायाची भक्तिरसाने न्हालेली आरास।” ही सुदंर आरास साकारलीये दिपक मोरे … Read more
घरगुती गणपती (Ganeshotsav ) आणि मातीपासून कागदापर्यंतच्या सुंदर देखाव्यांची झलक पाहूया. “जुना कागद, नवी कल्पनाशक्ती – पर्यावरणपूरक गणेश सजावट.” हा सुंदर देखावा आदित्य जाधव यांनी साकारला आहे. “मातीतून घडलेला, पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा बाप्पा – निसर्गाचा खरा सोबती!” ही सुंदर मूर्ती साकारलीये पाटील कुटुंबाने. “एका मूर्तीमध्ये अष्टविनायकांचे दर्शन – भक्तीचा अद्वितीय संगम.” विलास अजय पवार … Read more
घरगुती गणेशोत्सव (Ganeshotsav) दणक्यात साजरा करण्यासाठी बच्चे कंपनींसह तरुणांची लगबग सुरू असते. त्यामुळे देखावे सुद्धा चांगले बनवण्यासाठी हल्लीची मुलं सकारात्मक असतात. अशाच काही आकर्षक देखाव्यांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पांची वेगवेगळी रूपे आपण पाहणार आहोत. “गड-किल्ल्यांच्या साक्षीने, आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने — गणराय कात्रजकर कुटुंबाच्या घरी विराजमान झाले आहेत”. हा सुंदर देखावा साकाराला आहे … Read more
‘गणपती बाप्पा मोरया’ बुधवारी (27 ऑगस्ट 2025) वाजत गाजत सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav) आगमन झाले. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महिन्याभरापासून गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू होती. गणपतीचं आगमन म्हटलं की, विविध देखाव्यांमध्ये विराजमान होणारे बाप्पा आपसूकच सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यासाठी महिनाभर काम, कॉलेज या सर्व गोष्टी सांभाळून मेहनत घेतली जाते. घरोघरी तरुण मंडळी यासाठी जय्यत … Read more
गणेशोत्सवाला आता अवघे 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे रविवारी (17 ऑगस्ट 2025) मुंबईतील लालबाग, परळ आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गणरायांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्य, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा ओसंडून वाहणाऱ्या जल्लोषाने सर्व परिसर दणाणून गेला होता. जवळपास 60 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सवात भक्तांना … Read more
महाराष्ट्र गणरायाच्या (Ganeshotsav 2025) आगमनसाठी सज्ज झाला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी आणि मंडळांमध्ये विराजमान होईल. मात्र, मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यातला प्रत्येक रविवार गणेशभक्तांसाठी खास ठरणार आहे. दर रविवारी विविध मंडळांचे गणराया मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. याची सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट 2025 रोजी परळच्या महाराजा, … Read more
Shrawan Somvar मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर … Read more
श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीने जणू हिराव शालू पांघरून घेतल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी नेहमची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या Wai तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने नटलेल्या देवघराचे रूप येते. धुक्यात हरवलेली डोंगररांग, कमळगड किल्ला, धोम आणि बलकवडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, खळखळ वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणार असतं. त्यामुळे आपसूक पर्यटकांची पावलं महाबळेश्वर, पाचगणीसह … Read more
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम … Read more