Satara News – देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना लष्कराच्या जवानाने गंडा घातला, पावणे चार लाखांची फसवणूक; पोलि‍सांनी बेड्या ठोकल्या

फौजींचा जिल्हा म्हणून साताऱ्याचा (Satara News) साऱ्या जगात नावलौकिक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक तरी व्यक्ती देशाच्या सेवेसाठी सीमेवर कार्यरत आहे किंवा सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहे. असचं देशसेवेचं स्वप्न दोन तरुणांनी उराशी बाळगलं होतं. भरतीची वय मर्यादा ओलांडण्याचे शेवटचे वर्ष असल्यामुळे क्लर्क पदावर भरती होण्यासाठी रितेश वे त्याचा भाऊ आयुष जाधव यांनी आरोपी … Read more

Satara News – बाप-लेकाची एकमेकांना कडकडून मिठी; चार वर्षांचा अबोला लोकन्यायालयात संपुष्टात, न्यायाधिशांचे डोळेही पाणावले

कराडमध्ये बाप-लेकाच्या नात्यात पुन्हा एकदा नवी पालवी फुटली आहे. लोकन्यायालयाच्या निमित्ताने दोघेही तब्बल चार वर्षांनी एकत्र आले आणि आपापली चूक मान्य करत एकमेकांना कडकडून मिठी मारली. मागील चार वर्षांत बाप-लेकाने एकमेकांच तोंडही पाहिलं नाही, दोघांमाधला वाद इतका विकोपाला गेला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल केले होते. परंतु आता दोघांनी सर्व खटले … Read more

Satara News – साताऱ्यात दुर्मीळ शस्त्रक्रिया; पहिली जुळी मुलं, नंतर मुलगी आणि आता महिलेने चार अपत्यांना दिला जन्म

साताऱ्यामध्ये (Satara News) एक दुर्मीळ घटना घडली असून एका महिलेने क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या 28 वर्षीय महिलेची ही तिसरी प्रसूती असून पहिल्या प्रसूतीवेळी जुळ्या मुलांना आणि त्यानंतर एका मुलीला जन्म दिला होता. मात्र, या मातेने आता तीन मुलींना आणि एका मुलाला जन्म दिला आहे. … Read more

Mahabaleshwar News – माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीवरून आपल्या गावी निघालेल्या पती पत्नीवर माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघाता पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवळी गावातील आनंद सखाराम जाधव (50) हे पत्नीसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास … Read more

Wai News – पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025; वयगांवसह सातारा जिल्ह्यातील 12 गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील अनेक गावांनी हिरहिरीने या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. अखेर 11 तालुक्यांमधील 12 गावं या उपक्रमात बाजी मारण्यात यशस्वी ठरली. या सर्व गावांचा सत्कार सोहळा पालकमंत्री शंभुराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी … Read more

Satara News – पर्यावरणपूरक गणेशोत्सव; वयगांवकरांच्या एकीचा विजय, वाई तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी, आज सत्कार होणार

वयगांव गावाने ‘पर्यावरणपूरक Ganeshotsav 2025’ या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत वाई तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आज (11 सप्टेंबर 2025) वयगांव गावासह सातारा (Satara News) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या गावांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 12 गावांची निवड करण्यात … Read more

Satara News – शाहुपूरी पोलिसांची धडक कारवाई, 9 लाख 20 हजार किंमतीचे दागिने हस्तगत; कोपरखैरणेतून आरोपीला अटक

शाहुपूरी पोलिसांनी घरफोडी प्रकरणी धडक कारवाई करत नवी मुंबईतील कोपरखैरणेमधून आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 9 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 13.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13.5 तोळे सोने लंपास करुन पसार झालेल्या आरोपीची तक्रार 4 सप्टेंबर रोजी शाहुपूरी … Read more

Satara News – वाई, खंडाळा, महाबळेश्वर भूमिगत विद्युत वाहिनीसाठी 39.83 कोटी रुपये मंजूर, मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे. 15 व्या वित्त आयोगातून 39.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य आपत्ती सौम्यीकरणांतर्गत मकरंद पाटील यांनी महावितरण कंपनीकडून वाई, महाबळेश्वर व खंडाळा … Read more

Satara News – सातारा तालुका हादरला; गर्भवती मातेने दोन मुलींसह विहिरीत उडी मारली

सातारा (Satara News) तालुक्यात भयंकल घटना घडली आहे. त्यामुळे दोन गावं शोकसागरात बुडाली आहेत. सातारा तालुक्यातील कारी गावात एका गर्भवती मातेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी मारली. यामध्ये आई व एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने एक मुलगी झुडपात अडकल्याने बचावली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी विशाल मोरे आणि … Read more

Satara Gazetteer – सातारा गॅझेट म्हणजे काय? लागू झाल्यास कोणाला आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यासह भारतात चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणि भारताच्या आर्थिक राजधानीत मराठ्यांचा मुक्त संचार साऱ्या देशाने पाहिला. हक्काच्या आरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोकं मुंबईत दाखल झाले होते. अखेर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) आणि सातारा गॅझेट (Satara … Read more

error: Content is protected !!