सध्याचं जग हे सोशल मीडियाचं जग आहे. पैसे कमवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ज्याच्याकडे कला आहे, त्याला या क्षेत्रात मरण नाही. व्हिडीओच्या माध्यमातून आपली कला सर्वदूर पोहोचवण्याच साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जात आहे. मोबाईल, कॅमेरा आणि आता ड्रोनच्या (Drone Pilot Training) मदतीने तरुण आपली कला सादर करतना दिसत आहे. ड्रोनमुळे वेगवेगळ्या अँगलने आणि अवघड ठिकाणांवरील व्हिडीओ आणि छायाचित्रे सुद्धा काढता येतात. परंतू ड्रोन उडवणं आणि व्हिडीओ शुट करणं तितकं सोप नाही. यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे.
तुम्हाला सुद्धा ड्रोन उडवायला आवडतो का? ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे का? तुम्ही मोफत प्रशिक्षणाच्या शोधात आहात का? तर तुम्ही योग्य माहिती वाचत आहात. कारण राज्य सरकारच्या संशोधन, उन्नती व प्रशिक्षण संस्थेद्वारे (अमृत) खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपलब्ध आहे.
किती दिवसाचे प्रशिक्षण आहे?
राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारं हे प्रशिक्षण 10 दिवसांचे असणार आहे. या 10 दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. 10 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत रिमोट पायलट लायसन्स दिले जाणार आहे.
कोणकोणत्या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे?
- कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर
- मध्यम व लघू वर्गातील ड्रोन पायलट प्रशिक्षण
- प्रशिक्षक प्रशिक्षण
- आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण
- नकाशांकन व सर्वेक्षण
- छायाचित्रण आणि व्हिडीओ निर्मिती
- व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रशिक्षण
- ड्रोन देखभाल व दुरुस्ती
मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी पात्रता काय आहे?
- प्रशिक्षनार्थी उमेदवाराचे वय (तरुण-तरुणी) 18 ते 55 वर्षादरम्यान असावे
- उमेदवारानी 10 वी उत्तीर्ण केलेली असावी
- उमेदवाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
- उमेदवार राज्यातील खुल्या वर्गीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असावा
- उमेदवार इतर सरकारी योजनांचा लाभ घेत नसावा
- शेतकरी कुटुंबातील उमेदवारासा प्रथम प्राधान्य
कागदपत्रे कोणती लागणार आहेत?
- उमेदवाराचा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेस दाखला
- उमेदवाराकडे भारतीय पासपोर्ट/वाहन चालक परवाना/शिधा पत्रिका यापैकी जे उपलब्ध असेल त्याच्या दस्तऐवजाची स्वाक्षरी केलेली प्रत
- उमेदवाराचे आधार संलग्न बँक खात्याचा संपूर्ण तपशील (बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, खाते प्रकार, IFSC कोड)
अर्ज कुठे करायचा?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये अमृतच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तसेच अर्जाची एक प्रिंट स्वाक्षरी करून आवश्यक दस्तऐवज स्वसाक्षंकित करून अमृतच्या कार्यालयास विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
तुम्हाला या संदर्भात काहीही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा.