False Complaint – पुण्यात तरुणीने अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली, अशा प्रकरणांमध्ये काय शिक्षा होते? वाचा…

पुण्यात एका 22 वर्षीय तरुणीने एक पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी तपास केला असता संबंधित पुरुष हा तरुणीचाच मित्र असल्याचं उघड झालं आहे. तसेच ही तक्रार सुद्ध खोटी (False Complaint) असल्याच तपासात समोर आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. आता खोटी तक्रा दाखल केल्यामुळे त्या तरुणीवर कारवाई होणार? त्याचे परिणाम काय होतात? कोणत्या IPC अंतर्गत तिच्यावर कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती आपण घेणार आहोत.

एक सुजाण नागरिक म्हणून कायद्याच्या संदर्भातील सर्व गोष्टी आपल्यालाही माहित असणं गरेजचं आहे. खोट्या तक्रारी दाखल केल्यामुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत.

Cryptocurrency Scam कसा केला जातो? यापासून वाचायचं कसं? फसण्यापूर्वीच जाणून घ्या

खोटी तक्रार दाखल केल्यानंतर काय होतं? 

खोटी तक्रार दाखल करणे ही एक गंभीर कायदेशीर चूक आहे. भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत, जर कोणी व्यक्ती जाणूनबुजून खोटी माहिती देत असेल किंवा चुकीचा आरोप करत असेल, तर त्याला शिक्षा होऊ शकते. कलम 182, 211, 499, आणि 500 अंतर्गत अशा व्यक्तींवर कारवाई केली जाऊ शकते.

उदाहरणार्थ

IPC कलम 182 नुसार, जर कोणी व्यक्ती सरकारी अधिकारीसमोर खोटी माहिती देतो आणि त्या आधारे कारवाई होते, तर त्याला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

कलम 211 नुसार, जर एखाद्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखवण्यात आला असेल, तर खोटी तक्रार करणाऱ्याला 2 वर्षांपासून ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, विशेषतः जर खोटा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल (उदा. बलात्कार, खून इत्यादी).

What is RTI – RTI म्हणजे काय? RTI अर्ज सादर कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दात स्टेप बाय स्टेप

खोटी तक्रार केल्यास त्या व्यक्तीची विश्वसनीयता कमी होते, आणि भविष्यात खऱ्या तक्रारीवरही पोलिसांचा विश्वास बसत नाही. तसेच, खोट्या तक्रारीमुळे दोषी नसलेल्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्याला समाजात बदनामी, मानसिक त्रास, नोकरी गमावणे, इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.