‘गणपती बाप्पा मोरया’
बुधवारी (27 ऑगस्ट 2025) वाजत गाजत सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav) आगमन झाले. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महिन्याभरापासून गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू होती. गणपतीचं आगमन म्हटलं की, विविध देखाव्यांमध्ये विराजमान होणारे बाप्पा आपसूकच सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यासाठी महिनाभर काम, कॉलेज या सर्व गोष्टी सांभाळून मेहनत घेतली जाते. घरोघरी तरुण मंडळी यासाठी जय्यत तयारी करत असतात. अशाच काही सुंदर आणि पर्यावरणपूरक देखाव्यांमध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा आपण पाहणार आहोत.

सावळ्या पांडुरंगाच्या सानिध्यात विराजमान झालेले बाप्पा. हा सुंदर देखावा साकारला आहे दीपक किसन वाडकर यांनी.

मोरगाव (मयूरेश्वर), थेऊर (चिंतामणी), सिद्धटेक (सिद्धिविनायक), रांजणगाव (महागणपती), ओझर (विघ्नेश्वर), लेण्याद्री (गिरिजात्मज), महड (वरदविनायक), आणि पाली (बल्लाळेश्वर). हा सुंदर देखावा साकारला आहे तो पायल यशवंत बोराडे यांनी.

पर्यावरणपुरक देखावा वारली चित्रकला. आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला असून आदिवासी जमातीचे लोक त्यांच्या घरातील भिंतींना चित्रांनी सजवतात. त्यामुळे या चित्रांना वारली चित्र म्हणून ओळखले जाते. हा पर्यावरणपुरक देखावा साकारलाय वरळी कोळीवाड्यातील राम जंगम यांनी.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि गणपती बाप्पा. हा देखावा साकारलाय निशांत राजेंद्र जाधव यांनी.

शिवलिंग आणि गणपती बाप्पा. हा सुंदर देखावा साकारलाय तो पुण्यातील मनस्वी मंगेश खोपडे यांनी.
या वर्षीच्या गणेशोत्सवात आपण आपल्या घरातील बाप्पाला कशा प्रकारे सजवलं आहे, हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या गणपतीची फोटो पुढील इमेल आयडी किंवा मोबाईन नंबरवर पाठवा. [marathichowkvishesh@gmail.com]
चला तर मग, या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाची झलक संपूर्ण जगासमोर आणूया!