घरगुती गणेशोत्सव (Ganeshotsav) दणक्यात साजरा करण्यासाठी बच्चे कंपनींसह तरुणांची लगबग सुरू असते. त्यामुळे देखावे सुद्धा चांगले बनवण्यासाठी हल्लीची मुलं सकारात्मक असतात. अशाच काही आकर्षक देखाव्यांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पांची वेगवेगळी रूपे आपण पाहणार आहोत.

“गड-किल्ल्यांच्या साक्षीने, आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने — गणराय कात्रजकर कुटुंबाच्या घरी विराजमान झाले आहेत”. हा सुंदर देखावा साकाराला आहे तो हृषिकेश कात्रजकर यांनी.
सुंदर आणि आकर्षक मूर्तीला साजेसा देखावा साकराला आहे तो कुणाल माने यांनी.

“महादेवाच्या शक्तीचे प्रतीक, त्रिशुळ व शिवलिंगाच्या पवित्र सान्निध्यात विराजमान झालेले श्री गणेश” हा सुबक आणि सुंदर देखावा साकारला आहे सुरज शिंदे यांनी.

“आकाशाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या विज्ञानशक्तीचे प्रतीक, इस्रोच्या प्रेरणेने उड्डाण घेणाऱ्या गणरायांचे स्वागत केलं आहे ते घाडगे कुटुंबाने” हा देखावा साकारला आहे संकेत रामदास घाडगे यांनी.
या वर्षीच्या गणेशोत्सवात आपण आपल्या घरातील बाप्पाला कशा प्रकारे सजवलं आहे, हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या गणपतीची फोटो पुढील इमेल आयडीवर पाठवा. [marathichowkvishesh@gmail.com]
चला तर मग, या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाची झलक संपूर्ण जगासमोर आणूया!