घरगुती गणपती (Ganeshotsav ) आणि मातीपासून कागदापर्यंतच्या सुंदर देखाव्यांची झलक पाहूया.

“जुना कागद, नवी कल्पनाशक्ती – पर्यावरणपूरक गणेश सजावट.” हा सुंदर देखावा आदित्य जाधव यांनी साकारला आहे.

“मातीतून घडलेला, पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा बाप्पा – निसर्गाचा खरा सोबती!” ही सुंदर मूर्ती साकारलीये पाटील कुटुंबाने.

“एका मूर्तीमध्ये अष्टविनायकांचे दर्शन – भक्तीचा अद्वितीय संगम.” विलास अजय पवार यांनी साकारलेला देखावा.

“गणरायाच्या सान्निध्यात शिवशक्तीचा देखावा – भक्तिभावाचा संगम.” गणेश जायगुडे यांनी साकारलेला देखावा

“शेषनागांच्या छत्रछायेखाली विराजमान श्रीगणेशा – शक्ती आणि शांतीचे प्रतीक.” रोहन हजारे यांनी साकारलेला देखावा.
या वर्षीच्या गणेशोत्सवात आपण आपल्या घरातील बाप्पाला कशा प्रकारे सजवलं आहे, हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या गणपतीची फोटो पुढील इमेल आयडीवर पाठवा. [marathichowkvishesh@gmail.com]
चला तर मग, या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाची झलक संपूर्ण जगासमोर आणूया!