हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला आणि इतर सामान्य आजारांचा (Health Tips in Marathi) धोका निर्माण होतो. अंगातून पुरेसा घाम न गेल्यामुळे तहान कमी लागते. तहान कमी लागल्यामुळे आपण पाणी पित नाही. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. हिवाळा असो अथवा उन्हाळा, तहान लागो अथवा न लागो, शरीराला आवश्यक पाणी मिळणे गरजेचे असते. शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. किडनीच्या फिल्टरींग क्षमतेवर ताण निर्माण होतो आणि यामुळे किडनीचे नुकसान होण्याची शक्यता बळावते.
जर तुमच्या शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर?
- डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो
- रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता बळावते
- किडणीवर ताण येतो
- मेंदूवर परिणाम होऊ शकतो
- बद्धकोष्ठता
- कोरडा खोकला
- सांधेदुखी
- स्किन इन्फेक्शन्स
- मायग्रेनचा धोका वाढतो
पुरेसे पाणी न पिल्यास अशा आजारांना तुम्ही स्वत:हून आमंत्रित कराल. जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पीत नाही. तेव्हा होतं काय तर, रक्ताभिसरणामधून कचरा आणि विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी किडनीला आवश्यक असलेला द्रव कमी पडतो.
कधी आणि कितीवेळा पाणी पिलं पाहिजे?
- दर एक ते दोन तासांनी पाणी प्या
- हिवाळ्यात प्रौढ व्यक्तींनी किमान 2.5 ते 3 लिटर पाण प्यावे
- जे लोकं कष्टाची कामे करतात त्यांनी 3.5 लिटरपर्यंत पाणी पिलं पाहिजे
- पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सूप किंवा ज्यूस सुद्धा पिऊ शकता
गरजेपेक्षा जास्ती पाणी पिल्यासही धोका वाढतो
जेव्हा तुम्ही शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त पाणी पिता, तेव्हा सोडियम लेव्हल कमी होते आणि हायपोनेट्रेमियाचा धोका वाढतो, चक्कर येते, किडणीवर अधिकचा ताण येतो.
(टीप – ही फक्त जनजागृतीपर माहिती आहे. शरीरावर कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे)