IND Vs UAE – संजू आणि रिंकूच्या निवडीवर टांगती तलवार; UAE विरुद्ध या खेळाडूंसह मैदानात उतरेल भारताचा संघ!

Asia Cup 2025 चा धमाका सुरू झाला आहे. पहिल्यात सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगला धुळ चारत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तर आज टीम इंडियाचा पहिला सामना UAE विरुद्ध (IND Vs UAE) होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची यंग ब्रिगेड मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. दुबई च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

दुबईच्या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे या मैदानावरील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी देताना दिसून आली आहे. त्यामुळे एक दर्जेदार सामना चाहत्यांना पाहयाला मिळण्याची शक्यता आहे. UAE च्या तुलनेत टीम इंडियाचा संघ तुल्यबळ आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे एक चांगला सामना पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत. टीम इंडियाचा सर्वच 15 खेळाडू दर्जेदार आहेत. त्यामुळे अंतिम 11 मध्ये जागा पक्की करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळ लीगमध्ये संजू सॅमसनने धमाकेदार फलंदाजी करत आपली दावेदारी सिद्ध केली आहे, त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाची संभाव्य 11 सदस्यीय टीम

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

UAE ची संभाव्य 11 सदस्यीय टीम

मोहम्मद वसीम (कर्णधार), राहुल चोपडा (यष्टीरक्षक), अलीशान शराफू, मोहम्मद फारूक, मोहम्मद जोहेब, आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, सगीर खान, जुनैद सिद्दीकी, मोहम्मद रोहिद