भारतातील पहिली E-water taxi मुंबई ते नवी मुंबई या मार्गावर सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई-नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्यांचा बराच वेळ वाचणार आहे. मुंबईतील गेटवे आणि नवी मुंबईतील जेएपीए या दरम्यान ही ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. 22 सप्टेंबरपासून ई-वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ई-वॉटर टॅक्सीचे वैशिष्ट्य म्हणजे वॉटर टॅक्सीची बांधणी भारतात करण्यात आली आहे. गेटवे ते जेएनपीए मार्गावर दोन वॉटर टॅक्सी 22 सप्टेंबरपासून धावणार आहेत. या दोन वॉटर टॅक्सपैकी एक वॉटर टॅक्सी ही सौर ऊर्जेवर चालणारी असून दुसरी वॉटर टॅक्सी विद्युत आहे. टॅक्सीमध्ये 20 प्रवासी बसू शकतात. तसेच गेटवे ते जेएपीए हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 100 रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर लाकडी बोटींनी प्रवास केला जातो. परंतु या प्रवासासाठी प्रवाशांचा जवळपास एक तासाहून अधिक वेळ खर्ची होती. दुसरीकडे ई-वॉटर टॅक्सीने प्रवाशी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अवघ्या 40 मिनिटात पोहचू शकणार आहेत.
ई-वॉटर टॅक्सीची वैशिष्ट्य काय आहेत? Features of e-water taxi
पर्यावरणपूरक – इलेक्ट्रिक ऊर्जा वापरून प्रदूषण कमी करते.
शांत आणि गुळगुळीत प्रवास – कमी आवाज आणि कंपनामुळे आरामदायी अनुभव.
इंधन खर्च कमी – डिझेल/पेट्रोलवर अवलंबून नसल्याने ऑपरेशन खर्च कमी.
जलमार्गावर वेगवान सेवा – शहरांमध्ये वाहतूक कोंडी टाळून जलमार्गावरून जलद प्रवास.
स्मार्ट तिकीट प्रणाली – अॅप किंवा ऑनलाइन बुकिंग सुविधा.
शाश्वत शहरी वाहतूक पर्याय – भविष्यातील हरित शहरासाठी योग्य उपाय.
सुरक्षित आणि आधुनिक डिझाइन – प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आधुनिक सुविधा.
पर्यटन आणि प्रवासी सेवा दोन्हीसाठी उपयोगी – स्थानिक आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर.