Indian Diet Plan – युट्युबवर व्हिडीओ पाहून डाएट सुरू केला अन् जीवाला मुकला, माहिती खरी आहे का खोटी कशी ओळखायची?

Indian Diet Plan सोशल मीडियाच्या या युगात सगळ्याच गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कोणतेही कठीण काम लगेचच शिकता येतेय. तुमच्या एका क्लिकवर तुम्हाला कोणतीही माहिती आणि व्हिडीओ सहज उपलब्ध होतो. मात्र ही माहिती जितकी आपल्यासाठी उपयुक्त तितकीच ती जीवघेणी ठरत आहे. कारण यूट्युबवर पाहून वेटलॉससाठी डाएट केल्यामुळे तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील कोलाचेल येथे राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाएटच्या नावाखाली तीन महिने केवळ ज्यूसचे सेवन केले.

सोशल मीडियावर पाहून डाएट करणे बरोबर की चूक?

व्यक्तिनिष्ठ गरजांनुसार प्रत्येकाचा डाएट प्लॅन वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक बाधा, वय, आरोग्यस्थिती, जीवनशैली, वर्कआउटचा प्रकार, आणि वैद्यकीय इतिहास वेगळा असतो. यूट्युबवरील डाएट टिप्स “वन साइज फिट्स ऑल” प्रकारच्या असतात, त्या सर्वांसाठी योग्यच असतीलच असे नाही. त्यामुले सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून डाएट करणं तुमच्याही जीवावर बेतू शकतं. 

तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

आहारात मोठे बदल करताना नूट्रिशनिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. चुकीच्या डाएटमुळे कुपोषण, कमजोरी, हॉर्मोनल बॅलन्स बिघडणे, थकवा आणि गंभीर आरोग्यविषयक धोके संभवतात.

अविश्वसनीय व अपूर्ण माहिती

यूट्युबवरील अनेक व्हिडिओ वैज्ञानिक आधाराविना किंवा फक्त अनुभवाच्या आधारे तयार केलेले असतात. अशा माहितीवर आधारित डाएट केल्यास शारीरिक हानी होऊ शकते.

त्वरीत परिणाम मिळवण्याचा मोह घातक ठरू शकतो

“जलद वजन कमी करा” अशा आकर्षक दाव्यांना भुलून लोक कोणत्याही प्रकारचा डाएट फॉलो करतात, जे दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. अशा पद्धतीमुळे तुम्ही एकप्रकारे गंभीर आजारांना आमंत्रित करता. 

मानसिक आरोग्यावर परिणाम

चुकीच्या डाएटमुळे भूक, थकवा, चिडचिड, उदासीनता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.

कुठलाही वैद्यकीय तपास न करता आहार बदलणे धोकादायक

एखाद्या व्यक्तीला मधुमेह, थायरॉईड, अ‍ॅनिमिया किंवा इतर आजार असतील तर काही विशिष्ट आहार घातक ठरू शकतो. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर अशी माहिती विचारात घेतली जात नाही.

महत्ताचे

यूट्युबवरील माहिती केवळ प्राथमिक ज्ञानासाठी वापरावी. आहार बदलायचा असेल तर प्रमाणित नूट्रिशनिस्ट, आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या आरोग्याशी तडजोड करून कोणताही धोका पत्करणे योग्य नाही.

सोशल मीडियावरील माहिती ही सहज उपलब्ध असली तरी ती नेहमीच खरी असेलच असे नाही. यामुळे ती वाचताना, पसरवताना आणि अमलात आणताना सतर्कता ठेवणे आवश्यक असते.

  1. स्रोत तपासा – माहिती कोणी टाकलीये? अधिकृत आहे का?
  2. डॉक्टर/तज्ज्ञांचा सल्ला घ्या: विशेषतः आरोग्य, डाएट, औषधे यांसंबंधी.
  3. शंका असल्यास शेअर करू नका: माहिती खरी नसल्यास ते इतरांचे नुकसान करू शकते.

डोळ्यांना दिसणाऱ्या सर्वच गोष्टी चांगल्या असतातच असं नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची फक्त व्हिडीओ पाहून सुरुवात करणार असाल तर पुढच पाऊल टाकताना हजारवेळा विचार करा.