IPL 2026 – बारामुल्लाच्या डेल स्टेनला खरेदी करण्यासाठी बोलीयुद्ध! पठ्ठ्या लखपती नव्हे करोडपती झाला, ‘या’ संघाने मारली बाजी

IPL 2026 ची मिनी लिलाव प्रक्रिया अबु धाबीमध्ये सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर तगडी बोली लावली जात आहे. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आणि बारामुल्लाचा डेल स्टेन म्हणून प्रचलित असणारा औकिब दार याला लॉटरी लागली आहे. 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजपासून बोली सुरू झाली आणि दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू केली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबात संघ सुद्धा या बोलीयुद्धात सामील झाले. अखेर दिल्ली कॅपिटल्सने या बोली युद्धात 8.40 कोटी रुपये मोजले आणि औकिब दारला आपल्या संघात घेतलं. दिल्लीमध्ये मिचेल स्टार्कचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीच्या वेगवान गोलंदाजीला आणखी धार आली आहे.

error: Content is protected !!