IPL 2026 – 19 आणि 20 वर्षांच्या खेळाडूला घेण्यासाठी चढाओढ, कोणत्या संघाने मारली बाजी? किती लागली बोली?

IPL 2026 चे बिगुल वाजले आहे. आबू धाबीमध्ये मिनी लिलाव प्रक्रियेमध्ये खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी संघांची चढाओढ पाहायला मिळत आहे. परदेशी खेळाडूंपेक्षा देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुरळा करणाऱ्या खेळाडूंना घेण्यासाठी संघ मालकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याच दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने 20 वर्षीय प्रशांत वीर आणि 19 वर्षीय कार्तिक शर्मा या खेळाडूवर पैशांचा पाऊस पाडला आहे.

प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत त्यांना चांगली किंमत मिळाली. दोघांनीही लिलाव प्रक्रियेसाठी 30 लाख रुपये ही मुळ किंमत ठेवली होती. मात्र, CSK ने दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. लखपती होण्याची स्वप्न पाहणारे हे दोघे खेळाडू एका क्षणात करोडपती झाले आहेत.

error: Content is protected !!