जावळी (Jawali News) तालुक्यातील केळघर गावात एक दुर्दैवी घटना घडली असून यामुळे तालुका हादरून गेला आहे. एका चार वर्षांच्या मुलीला साप चावला आणि ती ओरडलीही, परंतु आईला वाटले उंदीर चावला असावा, म्हणून दुर्लक्ष केलं. परंतु काही तासांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक माहिती अशी की, श्रीशा मिलिंद घाडगे (4) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. श्रीशाची आई तिला मांडीवर बसवून भात भरवत होती. याच दरम्यान श्रीशाच्या पायाला साप चावला. साप चावल्यामुळे ती जोरात ओरडली. परंतु आईला वाटले, उंदीर असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. काही वेळाने घरातील बिळातून साप बाहेर आल्याचे घरातल्यांना दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ श्रीशाला साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
साप चावल्यानंतर तात्काळ काय करावे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा