Jobs in Israel for Indian – भारतीयांना इस्रायलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1600 पदांसाठी भरती सुरू

परदेशात चांगली नोकरी मिळवावी, अशी अनेक युवकांची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण संधीच्या शोधात असतात. ज्यांच्या हातात कला आहे अशा तरुणांसाठी इस्त्रायलमध्ये नूतनीकरण-बांधकाम क्षेत्रात (Jobs in Israel for Indian ) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तब्बल १६०० पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोणकोणती पद या भरली जाणार आहेत

नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात इमारतींची दुरुस्ती, बदल, नूतनीकरण, टाइल्स लावणे, भिंती उभ्या करणे, प्लास्टरिंग, रंगकाम, संरचनात्मक दुरुस्ती अशा विविध कामे या क्षेत्रामध्ये तुम्हाला करता येणार आहेत. सध्या या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी इस्रायलला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची मागणी आहे. 

पात्रता काय आहे?

  • इच्छूक उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी
  • वय 25 ते 50 वर्षांपर्यंत असावे
  • संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्ष काम करण्याचा अनुभव असावा
  • इंग्रजी भाषेचे मुलभूत ज्ञान आवश्यक असावे
  • इच्छुक उमेदवाराकडे 3 वर्षांची 2 वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. 
  • ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना वेळापत्रकानुसार व्यावसायिक चाचणीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे. 
  • उमेदवारांची चरित्र तपासणीसह पार्श्वभुमीही तपासली जाईल. 

कोणत्या पदासाठी भरती

  • ड्रायवॉल वर्कर 300 पदे 
  • मेसन 300 पदे
  • सिरेमिक टायलिंग 1000 पदे 

साधारणतः महिना 1.62 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी माहिती व नोंदणीसाठी maharashtrainternational.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!