Krishna River – तरुणांना लाजवणारा आजोबांचा उत्साह, गुरुदत्तांच नाव घेत कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रात झेपावले; पाहा Video

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरही पावसाचा तडखा सुरूच आहे. त्यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. कृष्णा नदी (Krishna River) परिसरातही पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. याच कृष्णा नदीमध्ये पोहण्याच्या आनंद घेत असताना एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही आजोबांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रात पोहण्याचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर असणारा उत्साह आणि समाधान पाहण्यासारख आहे. गुरुदत्तांच नाव घेत त्यांनी कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रात अगदी मनसोक्त उडी मारत पोहण्याचा आनंद घेतला आहे. 

<p

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satish Rajmane (@satish.rajmane)