Mahatma Phule Jan Arogya Yojana आणि Ayushman Bharat Card; दोन्ही योजनांचा लाभ एकाच कार्डवर, 5 लाखांपर्यंतचे आरोग्य कवच

कोरोना महामारीनंतर नागरिकांच्या आरोग्यामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे. तसेच मागील काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वंनाच याचा फटका बसला असून अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती यामध्ये गमावल्या आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सुद्धा सामान्यांना सहन करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये माणुसही वाचत नाही आणि कर्जाचा बोजा सुद्धा वाढतो. आपली जवळची व्यक्ती वाचावी म्हणून सरकारी योजनेच्या माध्यमातून किंवा धर्मादाय संस्थेकडून पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतू हीच प्रक्रिया तुम्ही जर आधीच करून ठेवली तर… 

गरजू रुग्णांचे उपचार मोफत व्हावेत किंवा त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat Card) आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (Mahatma Phule Jan Arogya Yojana) राबल्या जात आहेत. पूर्वी या दोन्ही योजनांचे कार्ड वेगवेगळे दिले जात होते. मात्र, आता या दोन्ही योजना एकाच कार्डवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर मोहिम सुरू करण्यात आली आहे. 1 ते 20 डिसेंबर दरम्यान ही व्यापक मोहिम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान पात्र लाभार्थ्यांना ‘को-ब्रँडेड कार्ड’ तयार करून दिले जाणार आहे. म्हणजेच एकाच कार्डवर दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे. दोन्ही योजनांमधून प्रतिकुटुंब 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच मिळणार आहे. त्यामुळे हे कार्ड सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील की, को-ब्रँडेड कार्ड म्हणजे काय? कार्ड काढायचं कसं आणि कुठे? कागदपत्रे कोणती लागणार? चला सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…

को-ब्रँडेड कार्ड म्हणजे काय? 

आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यो दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेण्याचं ओळखपत्र म्हणजे को-ब्रँडेड कार्ड होय. हे एक डिजिटल आणि स्मार्ट ओळखपत्र आहे. यामध्ये एका बाजूला आयुष्मान भारत आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे स्वतंत्र लोगो आणि माहिती समाविष्ट आहे. हे कार्ड तुमच्याकडे असेल तर, तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रे घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. या कार्डमुळे रुग्णालयामध्ये उपचार घेताना जलद प्रक्रिया पार पडणार आहे.

https://marathichowkvishesh.com/category/schemes-information-in-marathi/

कार्ड काढायचे कुठे? how to get Ayushman Bharat card  

कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपजिल्हा रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य कार्यालयात जावं लागणार आहे. याच ठिकाणी तुम्हाला तुमचे कार्ड मिळणार आहे. 

कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?  How to Apply for Ayushman Bharat Card

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड, मोबाईल नंबर आणि फोटो आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. 

किती रुपयाचे आरोग्य कवच मिळणार?

ज्या लाभार्थ्यांकडे को-ब्रँडेड कार्ड असेल अशा लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य कवच मिळेल. या कार्डच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया, ICU, कर्करोग उपचार, प्रसुतिगृह सेवा, आपत्कालिन सेवा, हृदयविकार, डायलिसीस सारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. 

1 ते 20 डिसेंबर या काळात राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेमध्ये आरोग्य केंद्रांमध्ये मदत कक्ष, गावोगावी शिबिरे आणि डिजिटल नोंदणी केंद्रे उभारण्यात येत आहेत. लाभार्थ्यांना कार्ड काढताना कोणतीही अडचण येऊ नये आणि वेळेवल कार्ड मिळावे यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षांचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा आणि कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

error: Content is protected !!