Pharmacy Course म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. अपुरी माहिती आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी या अभ्यासक्रमाकडे बघण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला होता. या सर्व गोष्टींना पालक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. Pharmacy Course हा फक्त मेडिकल सुरू करण्यापुरता मर्यादीत नाही. फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. जगभरातील नामांकित फार्मसी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी विद्यार्थ्यांना मिळू शकते.
कोविडमध्ये संपूर्ण परिस्थिती बदलली होती. जीवन मरणाच प्रश्न निर्माण झाला होता. प्रत्येक मिनिटाला नव्हे तर सेकंदाला जगाच्या कानाकोपऱ्यात लोकं मृत्युमुखी पडत होते. या काळात डॉक्टर, नर्स, परिचारिका आणि फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. खऱ्या अर्थाने त्या नंतर फार्मसीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्याच बरोबर अनेक समज-गैरसमज समाजात निर्माण झाले. B Pharmacy म्हणजे काय? D Pharmacy म्हणजे काय? यातला फरक बऱ्याच जणांना माहित नाही. तसेच फार्मसी म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक गैरसमज समाजात पसरला आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हा ब्लॉग होय. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
फार्मसी म्हणजे काय? | What is Pharmacy Course
फार्मसीचा साधा सरळ अर्थ म्हणजे औषध निर्माणशास्त्र होय. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना औषधांची निर्मिती, त्याचे सेवन, त्याचा योग्य वापर कसा करावा या सर्व गोष्टींची मूलभूत माहिती दिली जाते. आरोग्यासाठी डॉक्टरांची ट्रिटमेंट जितकी गरजेची आहे, तितकीच औषध सुद्धा महत्त्वाची आहेत. त्यामुळेच ज्या विद्यार्थ्यांनी बी फार्मसी किंवा डी फार्मसी केली आहे. अशा विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. फक्त ती संधी विद्यार्थ्यांना शोधता यायला हवी.
फार्मसी कोर्सची विविध पैलूंमध्ये विभागणी करण्यात आली आहे. जसे की, Medicinal Science, Healthcare Role, Specialized Areas, Patient Education, Ethics and Regulation इ. अशा अनेक पैलूंच्या माध्यामातून औषध निर्माणशास्त्र या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. या सर्व पैलूंची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ.
1) औषधी विज्ञान (Healthcare Role)
Health Care म्हणजे काय तर आरोग्य सेवा होय. या भूमिकेमध्ये औषधांचा योग्य वापर कसा करावा, औषधांचे सेवन कशा पद्धतीने करावे तसेच त्या संदर्भात योग्य तो सल्ला देण्याचे काम फार्मसिस्टच्या माध्यमातून केले जाते. रुग्णाला चांगला फरक पडावा यासाठी डॉक्टर आणि संबंधित क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घेतला जातो.
2) आरोग्य सेवा (Medicinal Science)
फार्मसिस्ट आणि औषधी विज्ञान हे एक अतूट नाते आहे. यामध्ये विविध औषधांचा अभ्यास, त्याचे रसायनशास्त्र, त्याचे परिणाम, त्याचे उपयोग आणि संभाव्य दुष्परिणाम या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. त्याच बरोबर फार्मासिस्टला Pharmacology म्हणजे औषधे कशी कार्य करतात याची सविस्तर माहिती दिली जाते. तर, Pharmaceutics म्हणजे औषधे कशा पद्धतीने तयार केली जातात. या बाबात सविस्तर अभ्यास शिकवला जातो.
3) विशिष्ट क्षेत्र (Specialized Areas in Pharmacy)
फार्मसीमध्ये काही विशिष्ट क्षेत्र असून त्यांची स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. असे असले तरीही ही सर्व क्षेत्र एकमेकांना बांधलेल्या अवस्थे सारखी आहेत. म्हणजेच प्रत्येक क्षेत्राचा इतर विशिष्ट क्षेत्राशी काही ना काही संबंध आहे. या क्षेत्रांची प्रामुख्याने चार क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. रुग्णांच्या वैयक्तिक गरजांवर आधारित Clinical Pharmacy, औषधांचे वितरण, त्या संदर्भात सल्ला देणे म्हणजे Community Pharmacy, इंट्राव्हेनस औषधे तयार करणे, रुग्णालयात औषधांचा पुरवठा सुरळीत होत आहे का नाही ते पाहणे व त्यासाठी मेडिकल टीम सोबत रुग्णालयांमध्ये जाऊन त्याची तपासणी करणे म्हणजेच Hospital Pharmacy होय, या तीन घटकांच्या व्यतिरिक्त औषध उत्पादनांचे संशोधन, विकास आणि उत्पादनांशी संबंधित क्षेत्र म्हणजे Industrial Pharmacy होय.
4) शिक्षण (Patient Education)
रुग्णांची काळजी घेणे हे फार्मासिस्टचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार योग्य औषधे कशी द्यावीत किंवा रुग्णांनी औषधे कशी घ्यावीत, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत किंवा ते कसे ओळखावेत यासाठी फार्मासिस्टला प्रशिक्षित केले जाते.
5) नैतिकता (Ethics And Regulation)
डॉक्टर जेवढे रुग्णांची काळजी घेण्यासाठी जबाबदार असतात तितकेच जबाबदार फार्मासिस्ट सुद्धा असतात. औषधांची परिणामकारकता, गुणवत्ता आणि औषधांची सुरक्षितता यांचे सरकारच्या माध्यमातून नियमन केले जाते. त्याच गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन करणे फार्मासिस्टची जबाबदारी असते.
बारावी नंतर फार्मसी | Pharmacy Courses After 12th
ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर फार्मसी कोर्स करायचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी बारावी PCMB म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तसेच B Pharmacy करण्यासाठी संबंधित विद्यार्थी 50 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. या दोन महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणारी MHT-CET ही पूर्वपरीक्षा. ज्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून आपले करिअर घडवायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना MHT-CET ही पूर्वपरीक्षा सुद्धा उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा फार्मसीमध्ये प्रवेश निश्चित होतो.
B Pharmacy आणि D Pharmacy म्हणजे काय?
बऱ्याचदा बी फार्मसी आणि डी फार्मसी हे कोर्स विद्यार्थ्यांना एकच वाटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा सुद्धा गोंधळ उडतो. अपुऱ्या माहितीमुळे दोन्ही कोर्स एकच असल्याचा विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो. मात्र, दोन्ही कोर्स वेगवेगळे आहेत. B Pharmacy म्हणजे Bachelor Of Pharmacy आणि D Pharmacy म्हणजे Diploma In Pharmacy होय. दोन्हींचा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक कालावधी वेगवेगळा आहे. या दोन्ही कोर्सची सविस्तर माहिती आपण घेऊ.
बी.फार्मसी | B. Pharmacy
बी फार्मसी हा प्रामुख्याने चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बी फार्मसीला प्रवेश घेता येतो. बी फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने वरती दिलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला 8 सत्रांमध्ये परीक्षा द्यावी लागते. सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी खाजगी तसेच सरकारी कंपन्यांमध्ये निर्माण होतात.
बी फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी M.Pharma, Pharma.D किंवा MPB in Pharmaceutical Management मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतात.
बी फार्मसी केल्यानंतर करिअरच्या काय संधी आहेत
बी फार्मसीचा अभ्यासक्रम यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दार खुली होतात. खाजगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये विद्यार्थी चांगल्या पगाराची आणि चांगल्या पदावर नोकरी करू शकतात. याची सविस्तर माहिती आपण पाहू.
फार्मास्युटिकल उद्योग
औषध उत्पादन
संशोधन आणि विकास (R&D)
गुणवत्ता हमी/गुणवत्ता नियंत्रण
क्लिनिकल आणि हॉस्पिटल फार्मसी
क्लिनिकल फार्मासिस्ट
हॉस्पिटल फार्मासिस्ट
फार्माकोव्हिजिलन्स
कम्युनिटी फार्मसी (Retail)
शैक्षणिक आणि संशोधन
अध्यापन (Teaching)
संशोधन शास्त्रज्ञ (Research Scientist)
सरकारी क्षेत्र
औषध निरीक्षक
सरकारी रुग्णालयातील फार्मासिस्ट
अन्न आणि औषध प्रशासन (FDA)
हेल्थकेअर आणि कन्सल्टन्सी
वैद्यकीय लेखक
वैद्यकीय प्रतिनिधी (MR)
आरोग्य सेवा सल्लागार
या सर्व क्षेत्रांव्यतिरिक्त तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता.
डी. फार्मसी | D. Pharmacy
D Pharmacy म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी होय. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. मात्र, फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगली नोकरी मिळवायची असेल तर तीन ते सहा महिन्यांची इंटर्नशीप कंपल्सरी करावी लागते. त्याच बरोबर डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने बारावी 40 ते 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण करावी लागते. त्याच बरोबर प्रवेश परीक्षा सुद्धा द्यावी लागते. डी फार्मसीच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने पुढील विषयांचा समावेश असतो.
डी फार्मसीमध्ये पहिल्या वर्षी प्रामुख्याने फार्मास्युटिक्स-1, फार्मास्युटिकल केमेस्ट्री-1, फार्माकग्रोसी, बायोकेमिस्ट्री आणि क्लिनिकल पॅथॉलॉजी, मानवी शरीरशास्त्र आणि क्लिनिकल पॅथॉलॉजी, मानवी शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान आणि आरोग्य शिक्षण आणि कम्युनिटी फार्मसीचा समावेश असतो.
त्याच बरोबर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला फार्मास्टुटिक्स-2, फार्मास्युटिकल केमिस्ट्री-2, फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी, फार्मास्युटिकल न्यायशास्त्र, औषध दुकान आणि व्यवसाय व्यवस्थापन आणि हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी या विषयांचा समावेश आहे.
डी फार्मसी केल्यानंतर करिअरच्या काय संधी आहेत
विद्यार्थ्याने डी फार्मसी पूर्ण केल्यानंतर देशभरातली नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीची संधी असते. प्रामुख्याने पुढील पदांवर उमेदवार काम करू शकतात. यामध्ये पदांमध्ये फार्मासिस्ट, फार्मसी टेक्निशियन, वैद्यकीय प्रतिनिधी, उद्योजग, सरकारी नोकरीमध्ये सुद्धा डी फार्मसी केलेले विद्यार्थी नोकरी करू शकतात.
बी फार्मसी आणि डी फार्मसी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्स सुद्धा उपलब्द आहेत. सर्व कोर्सचा कालावधी वेगवेगळा आहे. काही कोर्स हे तीन ते सहा महिन्यांचे किंवा काही कोर्स हे सहा महिने ते एक वर्ष अशा कालावधीमध्ये पूर्ण करावे लागतात.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.