Pigeon Diseases – कबुतरांमुळे माणसांचा जीव जातोय! वेळीच सावध व्हा, कोणते आजार होतात? वाचा…

मागील काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखाने चर्चेमध्ये आले आहेत. त्याला कारणही तसच आहे. कबुतरखान्यांमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार वाढल्याने काही रहिवाशांचा मृत्यू झाल्याच उघडं झाल आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहिम राबवत सर्व कबुतरखाने (Pigeon Diseases) बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत 51 कबुतरखाने आहेत. यातले काही कबुतरखाने बंद आहेत तर, काही कबुतरखाने चालू आहे. .

कबुतरांमुळे कोणते आजार होतात?

कबुतरं दिसायला निरुपद्रवी वाटतात, पण त्यांच्या विष्ठेमुळे अनेक गंभीर आजार पसरण्याचा धोका असतो. विशेषतः शहरी भागात इमारतींवर, खिडक्यांवर किंवा घराच्या गॅलरीत कबुतरांची संख्या वाढल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या अंगावरील पिसांमध्ये बॅक्टेरिया, फंगस आणि विषाणू असतात, जे हवेतून पसरू शकतात आणि माणसांच्या शरीरात श्वासावाटे प्रवेश करू शकतात. यामुळे पुढील आजार होऊ शकतात,

1. हिस्टोप्लास्मोसिस (Histoplasmosis)

हा एक फंगल इंफेक्शन आहे जो फुफ्फुसांवर परिणाम करतो. कबुतरांच्या विष्ठेमधील फंगल स्पोअर्स श्वासावाटे शरीरात गेल्यास खोकला, ताप, थकवा आणि श्वास घेताना त्रास होतो.

2. क्रिप्टोकॉक्कोसिस (Cryptococcosis)

हा देखील एक फंगल आजार आहे. तो मेंदू व फुफ्फुसांवर परिणाम करतो. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना याचा धोका अधिक असतो.

3. सायटॅकोसिस (Psittacosis)

ही एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जी कबुतरांमधून माणसांमध्ये येऊ शकते. यामध्ये ताप, डोकेदुखी, खोकला आणि छातीत दुखणे असे लक्षणे दिसतात.

4. एलर्जीक रिअ‍ॅक्शन

कबुतरांच्या पिसांमधील धूळ व प्रथिने काही लोकांमध्ये श्वसनाचे विकार, त्वचेची खाज किंवा अ‍ॅलर्जी वाढवू शकतात.

नियंत्रणासाठी उपाय

  1. घराजवळ कबुतरांना अंडी घालू देऊ नयेत
  2. खिडक्यांना जाळ्या लावाव्यात
  3. नियमित स्वच्छता ठेवावी
  4. कबुतरांना अन्न टाकणे टाळावे

आरोग्यदृष्ट्या सुरक्षिततेसाठी कबुतरांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.