Pratapgad Fort – दिव्यांच्या प्रकाशात तरुणांची कल्पनाशक्ती, चला किल्ले प्रतापगड पाहूया

प्रतापगड (Pratapgad Fort) म्हणजे अफजलखानाचा वध आणि आदिलशाहीला घडलेली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋतेस 13 किमी. च्या अंतरावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात प्रतापगड वसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकले आणि प्रतापगड स्वराज्यात दाखल झाला. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांना किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली होती. त्याचबरोबर तुळजा भवानी मातेचे मंदिर सुद्धा शिवरायांनी गडावर स्थापले होते.

दीपावलीचे औचित्य साधत शिवतेज मित्र मंडळ मुक्तीनगर चेंबूरच्या तरुणांनी एकत्र येत प्रतापगड किल्ला उभा केला आहे.

Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी