Stock Market हा शब्द उच्चारला की हर्षद मेहता आणि राकेश झुनझुनवाला यांची नावे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ट्रेडर्सच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. दोघांनीही स्टॉक मार्केटवर अधिराज्य गाजवत मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवली. म्हणूनच त्यांचा उल्लेख आजही “Big Bull” असा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय शेअर बाजाराचे पहिले बिग बुल कोण होते? ज्या शेअर बाजाराचं आज मोठं वटवृक्ष झालं आहे, त्या शेअर बाजाराचं पहिल रोपटं कोणी लावलं होतं? कोण होते Premchand Roychand? जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
बिग बुल, बुलियन किंग आणि कॉटन किंग
जमशेदची टाटा, जमशेदजी जेजीभॉय आणि डेव्हिड ससून या दिग्गज उद्योगपतींच्या नावांमध्ये प्रेमचंद रॉयचंद जैन यांच्या नावाचा सुद्धा समावेश मुंबईतील चार मोठ्या व्यावयासिकांमध्ये केला जात होता. उच्च बुद्धिमत्ता, इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धाडसी वृत्ती, यामुळे प्रेमचंद रॉयचंद जैन यांचा बिग बुल, बुलियन किंग आणि कॉटन किंग अशा अनेक नावांनी आदरयुक्त दरारा होता. प्रेमचंद यांनीच 150 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये शेअर बाजाराचा पाया घातला. प्रेमचंद हे शेअर आणि Stock Broker Association चे संस्थापक आहेत. याचेच नामांतरण पुढे Bombay Stock Exchange झाले. तुम्ही सुद्धा BSE संदर्भात कुठे ना कुठे वाचल किंव ऐकलं असेल की, 22 स्टॉक ब्रोकर्सचा एक ग्रूप मुंबईतील टाऊन हॉलजवळ असणाऱ्या एका झाडाखाली एकत्र जमायचा. हे साल होतं 1855, आणि या 22 जणांमध्ये प्रेमचंद यांचा सुद्ध समावेश होता. पुढील 10 वर्षांत ब्रोकर्सची संख्या झपाट्याने वाढत गेली, त्यामुळे दलाल टाऊन आता हॉलमधून मीडोज स्ट्रीटवर स्थलांतरित झाले.
9 जुलै 1875 रोजी स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनचे रुपांतर Bombay Stock Exchange मध्ये झाले. विशेष बाब म्हणजे BSE हे तेव्हा आशियाचील पहिले स्टॉक एक्सचेंज होते. भांडवली बाजाराव्यतिरिक्त, प्रेमचंद यांना कापूस आणि सराफा व्यपारामध्ये विशेष रुची होती. एप्रिल 1861 साली अमेरिकन गृहयुद्ध सुरू झाले. त्यामुळे या काळात कापसाच्या व्यापार तेजीत होता. या संधीच प्रेमचंद यांनी सोन केलं आणि 1865 पर्यंत प्रचंड नफा कमवला. त्यांची व्यापारातील चालाकी पाहूनच त्यांना कॉटन किंग हे नाव पडले असावे.
बलात्काऱ्यांना ठोकणारे Encounter Man Of India, कोण आहेत VC Sajjanar?
लाकूड व्यापाऱ्याच्या घरात जन्म ते यशस्वी ब्रोकर
प्रेमचंद रॉयचंद यांचा जन्म मार्च 1832 मध्ये रॉयचंद दीपचंद नावाच्या लाकूड व्यापाऱ्याच्या घरामध्ये झाला. रॉयचंद दीपचंद हे सुरतमधील एक प्रसिद्ध व्यापारी होती. त्यांचे कुटुंब श्वेतम्बर जैन भिक्षू मोहनलालजी महाराज यांना आपले गुरू मानत होते. मात्र पुढी काही कारणांमुळे प्रेमचंद यांचे संपूर्ण कुटुंब सुरतहून मुंबईत स्थलांतरित झाले. त्यामुले प्रेमचंद यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. अभ्यासात हुशार असल्यामुळे उत्तम इंग्रजी बोलायला, लिहायला आणि वाचायला त्यांना जमत होतं. त्यामुळेच 1849 मध्ये त्यांचा एक सुशिक्षीत स्टॉक ब्रोकर म्हणून यादीत प्रवेश झाला. मात्र, त्यांच्या स्टॉक ब्रोकर म्हणून प्रवासाला खऱ्या अर्थाने 1852 मध्ये सुरुवात झाली.
प्रेमचंद रॉयचंद यांची ओळख स्टॉक मार्केट आणि व्यापारातील प्रभावी स्मरणशक्ती असलेला व्यक्ती अशी होती. त्यांच्या बद्दल सांगितलं जातं की, त्यांनी कधीही पेन आणि पेपरचा वापर केला नाही. तसेच त्यांनी आपले सर्व व्यवहार लिहिण्याऐवजी लक्षात ठेवण्याला प्राधान्य दिले. ऐकप्रकारे आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी शेअर बाजारातून प्रचंड यश मिळवलले. त्यामुळे त्यांनी फक्त सहा वर्षात 1858 मध्ये एक लाख रुपयांची मालमत्ता जमवली होती. तेव्हाच्या तुलनेत ही रक्कम खूप जास्त होती. पुढचे काही वर्ष प्रेमचंद यांच्यासाठी पैशांचा पाऊस पाडणारे ठरले. 1861 साली अमेरिकन नागरी युद्ध झाले. त्यामुळे भारतातून कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. याचा प्रेमचंद यांनी भरपूर फायदा घेत मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात केली आणि भरपूर पैसा कमावला.
1861 ते 1865 या काळात प्रेमचंद यांनी प्रचंड नफा कमावला. मात्र 1865 साली नागरीयुद्ध संपूष्टात आले आणि कापसाची मागणी सुद्धा घटली. तसेच बॅकबे रिक्लेमेशन स्कीम आणि अशाच इतर उपक्रमांमध्ये त्यांनी आपली बहुतांशी संपत्ती गमावली. याचा प्रेमचंद यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. काही प्रमाणात त्यांचे नुकसान सुद्धा झाले. मात्र लढाऊ वृत्तीच्या प्रेमचंद यांनी माघार घेतली नाही. त्यांनी पुन्हा एकदा दणक्यात पुनरागमन केले आणि आर्थिक घडी सावरत बक्कळ संपत्ती कमावली.
चढ-उतारांचा सामना केल्यानंतर प्रेमचंद यांनी आपला मोर्चा परोपकाराच्या दिशेने वळवला. मुंबई विद्यापीठातील राजाबाई क्लॉक टॉवरला त्यांनी निधी देला, त्यांच्या आईचे नाव या टॉवरला देण्यात आले. त्याचबरोबर ते काही काळ बॉम्बे प्रेसिडेन्सिमधील सर्वात मोठ्या असलेल्या Bank OF Bombay चे संचालक होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक शाळांमध्ये गुंतवणूक करून त्यांना आर्थिक सहाय्य केले. ज्यात मुलींसाठी असलेल्या जेबी पेटिट हायस्कूल फॉर गर्ल्स सारख्या अनेख शाळांचा समावेश आहे. तसेच एशियाटिक सोसायटीलाही त्यांनी देणगी दिली आहे. कोलकाता विद्यापीठात कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रेमचंद रॉयचंद पुरस्कारा’ची स्थापना केली. तसेच 1866 मध्ये त्यांनी प्रेमचंद रॉयचंद शिष्यवृत्ती पुरस्काराची स्थापना केली होती.
प्रेमचंद हे मुंबईमध्ये भायखळा येथील प्रमोदयन नावाच्या बंगल्यामध्ये राहत होते. 1906 मध्ये भारताच्या पहिल्या ‘Big Bull’ चे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बंगल्याचे रुपांतर अनाथाश्रम आणि शाळेत करण्यात आले. प्रेमचंद यांची चौथी पिढी आता Premchand Roychand And Sons (PRS) चालवते.
Bombay Stock Exchange विषयी थोडक्यात
Bombay Stock Exchange हे BSE या नावाने प्रचलित आहे. हे फक्त भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे. 9 जुलै 1875 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी केली. हे सर्वात मोठ्या सिक्युरिटीच मार्केटपैकी एक मार्केट आहे. मुंबईमध्ये स्थित असलेल्या या दलाल स्ट्रीटमध्ये 6000 हून अधिक कंपन्यां लिस्टेड आहेत. BSE च्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना Equity, Mutual Fund, स्टॉक्स इत्यादीमध्ये व्यापार करता येतो.
National Stock Exchange
राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange – NSE) भारतातील एक प्रमुख शेअर बाजार आहे. याची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. NSE चे मुख्याल मुंबईमध्ये आहे. भारतीय भांडवली बाजाराचा विकास करणे आणि बाजाराला पारदर्शक आणि जलद करण्यासाठी प्रयत्न करणे हे NSE चे मुख्य उद्दीष्ट आहे. NSE मध्ये ऑनलाईन ट्रे़डिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांनी संख्या झपाट्याने वाढली आहे. NSE चा मुख्य निर्देशांक म्हणजे Nifty 50 होय. त्याचबरोबर NSE मध्ये Futures आणि Options चा व्यापार करता येतो.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.