Railway Job Vacancy – बेरोजगार तरुणांना नववर्षात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, रेल्वेत 22 हजार पदांची मेगा भरती

नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नवीन वर्षात नवीन गोष्टी आणि नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी बेरोजगार तरुणांची लगबग सुरू आहे. याच दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत भारतीय रेल्वेत तब्बल 22 हजार पदांची मेगा भरती (Railway Job Vacancy) जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. 

या भरतीअंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत?

RRB अंतर्गत ग्रुप ‘डी’ मध्ये असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनर ही पद भरली जाणार आहेत. 

शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय पास असणे आवश्यक आहे. 

अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2026 रोजी ऑनलाईन सुरू होणार आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2026 आहे. 

भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 

error: Content is protected !!