Rain News – घरबाहेर पडण्यापूर्वी विचार करा; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याचा ‘Red Alert’

रविवारी सायंकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडसह विविध भागांमध्ये पावासाच्या सरी (Rain News ) बरसायला सुरुवात झाली होती. मात्र, आज (15 सप्टेंबर 2025) सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल उशीराने धावत आहेत. अशातच आता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.